Login

हवं असलेलं मातृत्व.. भाग -13

आईच ऐकुन विकास डॉक्टर कडे जायला तयार होतो.

भाग -13


कीर्ती बराच वेळ जागी असते. तिला डॉक्टर उद्या काय बोलतील ह्याची चिंता असते. ति अनेक वेळा कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करते. ति पुन्हा उठते, रूम च्या बाल्कनीत जाते. काही वेळ ति आकाशात असणाऱ्या ताऱ्यांकडे एकटक पाहते. आणि तिच्या डोळ्यांतून अश्रु बाहेर येतात. अश्रूचा थेंब ति बोटांवर घेऊन विचारते.

कीर्ती " तु वाहिलास डोळ्यांतून तर निदान तुला विचारू तर शकते. काय झालं ? पण माझ्या मनात असणाऱ्या दुःखाला विचारणार कोणीच नाही. ज्याला मी आपलं मानलं तोह मात्र रुसून बसलाय.!" आणि ति विकास कडे पाहते.

विकास गाढ झोपेत असतो. ति त्याच्या कडे पाहुन हसते.

सकाळ होते. कीर्ती लवकर उठुन सगळं आवरायला घेते. चहा नाश्ता बनवून ति विकास ला उठवायला रूम मध्ये येते.

कीर्ती " विकास अरे उठ ना, बघ वाजले किती. उशीर होईल परत!"

विकास ला तिच्या आवाजाने जाग येते.

विकास " उठतो !"

कीर्ती " बरं आवर लवकर वाट पाहते बाहेर.!"

अस बोलुन कीर्ती बाहेर जाते. विकास मात्र काही वेळ बेडवरच विचारात गुंग असतो.

कीर्ती पुन्हा त्याला आवाज देते.

कीर्ती " अरे झालं का ? "

विकास तिच्या आवाजाने गडबडीत आवरायला जातो.

काही वेळा नंतर विकास आवरून बाहेर येतो.

विकास " आई पटकन नाश्ता दे!"

कीर्ती विकास कडे पाहते त्याचा मुड काल पेक्षा खुप बरा असतो.

आई " हं घे !"

त्याच्या पुढ्यात नाश्ता ठेवत. आईला ही विकास चा मुड काल पेक्षा बरा दिसतो.

" बरं संध्याकाळी जेवणाचा चांगला बेत बनवते. "

विकास कडे पाहत आई म्हणते.

कीर्ती " हो आई चालेल !"

आई कडे पाहत कीर्ती म्हणते. आई आणि कीर्ती एकमेकींकडे पाहतात. आणि खूणवाखूनवी करतात.

आई " चालेल ना विकास ? "

विकास " हो!!" शांत पणे विकास म्हणतो.

कीर्ती " आई चला आम्ही निघतो. आधीच खुप उशीर झालंय !"

आई " बरं,,, सगळं घेतलं ना ? "

कीर्ती " हो आई..!"

विकास पुढे जातो. कीर्ती मागे येऊन आई ला गच्च मिठी मारते. तिच्या डोळ्यांतून पाणी येत. आणि ति हॉस्पिटल ला जायला निघते.

बिल्डिंग खाली विकास गाडीत तिची वाट पाहत असतो. नेहमी प्रमाणे तोह गाडीचा दरवाजा उघडून देतो. कीर्ती गाडीत बसते. विकास कडे आरशातून पाहते.

विकास गाडी सुरु करतो. आणि गाडी हॉस्पिटल च्या दिशेने चालु लागते.

कीर्ती विकास चा माईंड फ्रेश करण्यासाठी गाणी लावण्याचा आग्रह करते.

कीर्ती " अरे छान शी गाणी लाव कि !"

विकास निमूटपणे गाणी लावतो. कीर्ती डोळे बंद करून गाणी गुणगुणते. विकास तिच्या कडे हळुच पाहतो. आणि हालत खुदकन हसतो.

विकास च कीर्ती वर अत्यंत प्रेम असत. पण डॉक्टर च्या शब्दाने पुरशी अहंकार दुखावला जातो.

गाडी हॉस्पिटल खाली येते. कीर्ती दरवाजा खोलून गाडी खाली उतरते. आणि दरवाजा लावते. ति पुढे हॉस्पिटल ची पायरी चढते. समोर असलेल्या गणपती बाप्पा ला नेहमी प्रमाणे हात जोडते.

कीर्ती " बाप्पा आज कस ही करून मी विकास ला इथे आणलाय. गेल्यावेळेस तोह डॉक्टरांच्या बोलण्याने दुखावून इथून निघाला होता. आता मात्र काही करून तु पाठीशी उभा रहा.!" आणि कीर्ती बाप्पाच्या पाया पडून 

डॉक्टरच्या रूम मध्ये जाते.

कीर्ती दरवाजा वर नोक करते.

कीर्ती " आत येऊ का डॉक्टर ? "

डॉक्टर " ओह्ह्ह ये कीर्ती !"

कीर्ती नि विकास आत रूम मध्ये जातात.

डॉक्टर " ओह्ह,,, हाय विकास. हाउ आर यू..? "

विकास " गुड डॉक्टर...!"

मी तुम्हा दोघांची वाट पाहत होती.

कीर्ती " येस डॉक्टर..!"

डॉक्टर " बरं आधी तुम्ही दोघ कॉफी घेणार का ? मी मागवते ?!"

विकास " नो डॉक्टर थँक्स !"

कीर्ती " डॉक्टर कस करायचं पुढे सविस्तर सांगाल का ? म्हणजे थोडं टेन्शन कमी होईल ? "

विकास " हा म्हणजे क्लिअर च बोलू!"

डॉक्टर " कीर्ती आणि विकास तुम्ही दोघंही शिकलेले आहात ? त्या मुळे तुम्हाला मेडिकल काय आहे नि ते कितपत काम करत बऱ्या पैकी माहित आहे ! बरोबर? "

विकास & कीर्ती " हो डॉक्टर!"

डॉक्टर " मी तुझे रिपोर्ट पाहिले चांगल्या पैकी पुन्हा पुन्हा पाहिले ! आणि विकास ह्या वर मार्ग ही आहे. फक्त तुम्हाला वेळ आणि खर्च तेवढा मात्र येईल.!"

कीर्ती " ह्म्म्म "

विकास " मी तयार आहे डॉक्टर, कीर्ती च्या आनंदा साठी मी करेन.!"

हे ऐकुन कीर्ती विकास कडे आश्चर्याने पाहते.

डॉक्टर " ग्रेट !"

विकास " तुम्ही सांगा कि काय कराव लागेल.? "

कीर्ती " साधारण किती खर्च येईल डॉक्टर ? "

विकास " तु नको घेऊ खर्चाचा टेन्शन ! मी पाहतो काय ते !"

डॉक्टर " बघ विकास मी तुझ्याशीच क्लिअर बोलते. आपल्या मेडिकल जगात जर नैसर्गिक रित्या बाळ होत नसेल तर, आपण काही दोन गोष्टींनी बाळ आपल्या आयुष्यात आणू शकतो.!"

विकास " काय डॉक्टर ?"

कीर्ती विकास चा हात दाबते. तिला टेन्शन येत विकास काय बोलेल ह्याचा.

.... क्रमश...







🎭 Series Post

View all