Login

हवं असलेलं मातृत्व... भाग - ८

अखेर विकास दारू पियुन आई समोर येतो.

भाग - ८


ति फोन उचलते, विकास ला कॉल लावते.

कीर्ती " अजुन आला नाही नि कॉल ही घेत नाही !" कीर्ती स्वतःशी वैतागून बोलते.

दुपार होऊन जाते, संध्याकाळ होते. तरी विकास चा पत्ता नसतो.

आई " हे काय, अजुन आला नाही का हा ? " कीर्ती ला विचारते.

कीर्ती " नाही !"

आई त्याला मोबाईल वरून स्वतःच्या कॉल लावते. विकास कॉल उचलतो.

आई " अरे आहेस कुठे ? सकाळी जो गेलायस अजुन आला नाही !"

कीर्ती आई कडे पाहते. विकास आई चा कॉल उचलतो.

विकास " हो येतो !"

आई " ये बरं लवकर ! वाट पाहतेय. वाजले बघ किती.?"

असं बोलुन आई कॉल कट करते.

" पाहिलस माझे कॉल उचलले ना ? तुझेच बरे उचलले नाही.!"

आई कीर्ती ला टोमन्याने बोलते.

कीर्ती " ठीक आहे !" कीर्ती शांतपणे बोलते.

काही वेळा नंतर विकास येतो.

आई " आलास अरे होतास कुठे ? "

विकास च्या तोंडून शब्द नसतो. त्याचे कपडे ही विस्कटलेले असतात. आई त्याच्या जवळ जाते. तितक्यात आई ला त्याच्या अंगातून दारूचा भकभकीत वास येतो.

आई " हे काय तु दारू पियाला आहे ? " आई रागात त्याला विचारते.

तरीही विकास च्या तोंडून शब्द नसतात.

कीर्ती " आई राहूद्या ना, आपण नंतर बोलूया!"

आई " असं कस, नंतर का ! पियुन आता आलय ना. मग नंतर का बोलायचं.!" आई कीर्ती ला बोलते.

" मी काय विचारतेय विकास ? " आई रागारागाने विकास ला विचारते.

विकास " ते.. मी.. ते... खुप टेंशन मध्ये...!"

विकास नशे मध्ये बोलतो. आणि धडपडतो. कीर्ती त्याला सावरायला जाते. तितक्यात आई बोलते.

आई " थांब कीर्ती ! काही गरज नाही त्याला सावरायची. "

कीर्ती " अहो आई त्यांना शुद्ध नाहीये.!"

आई " असुदे, पिताना शुद्ध होती ना कि नव्हती ? आणि किती ही टेन्शन असलं तरी त्यावर पिणे हे काही सोलुशन नाही !"

काही वेळा पूर्वी कीर्ती ला टोमने मारणारी आई, चक्क मुलगा पियुन आला म्हणुन त्याच्या वर चिडतायत. त्याची बाजू घेत नाही. हे पाहुन कीर्तीला आश्चर्य वाटत. काही वेळा पूर्वी विकास साठी काळजीत होत्या.

विकास " तु माझ्यावर का... चिडतेयस.. आ आ.. आई...? " विकास धडपडत उठत स्वतःला सावरत आई ला बोलतो.

आई " मला आता नाही तुझ्याशी बोलायचं ! तुझी उतरली कि बोलु आपण ? "

आणि आई रूम मध्ये निघुन जातात. कीर्ती विकास ला सावरण्यासाठी त्याच्या जवळ जाते.

विकास तिचा हात झटकतो.

विकास " हात... लावू नकोस.. मला..! हो बाजुला..!"

आणि विकास त्याच्या रूम मध्ये जातो.

कीर्ती खुप रडते. ति स्वतःच्या नशिबाला कोसते.

रात्रीचे नऊ वाजतात. घरात शांतता असते. कीर्ती रूम मध्ये जाते विकास ला पाहते. रूम अस्थाव्यस्त असतो. आणि विकास बेड वर आडवा पडलेला असतो. त्याला शुद्ध च नसते. कीर्ती रूम ची लाईट बंद करते.

एका ताटात जेवण वाढून ति आईला रूम मध्ये घेऊन जाते.

आई रूम च्या बाल्कनीत आराम खुर्चीत डोळे बंद करून विकास चा विचार करत असतात.

कीर्ती " आई , जेवण आणलय. रात्र झालीये भूक लागली असेल ना, जेऊन घ्या."

आई " मला नकोय, तु परत घेऊन जा.!"

कीर्ती " अहो, आई असं नका करू. जेवणावर राग काढून काय होणार ? " कीर्ती आई ची समजूत काढत बोलते.

आई " मी जेवणावर राग काढत नाही आहे! आणि तु नको सांगुस मला ग्यान. "


...... क्रमश....

🎭 Series Post

View all