हवं असलेलं मातृत्व.. भाग - ७

कीर्तीला तिच्या आईची खुप आठवण येत असते.

भाग - ७


कीर्ती " चांगल आहे विकास, नवरा म्हणुन तु मला अशी साथ देशील हे वाटल नव्हत. "

विकास " तु तरी मला किती साथ दिलीस? "

कीर्ती " म्हणजे ! साथ नाही दिली का ? "

विकास " नाही !"

कीर्ती खुप रडु लागते. तिला विकास च वागणं असह्य होतं.

आई " तुला काय म्हणायचं कीर्ती ? "

कीर्ती " आई दोष माझ्यात नाही ! विकास मध्ये आहे.!"

आई " काय बोलतेय ही विकास ? मला नीट कळेल का ? "

आई विकास ला खरं काय ते विचारते.

विकास " सोड तुला तिच्या वर विश्वास ना ! मग मी काय बोलु ? "

आई " मी असं थोडी म्हटलं ? पण ति जे बोलतेय ते खरं कि खोटं मी कस समजायचं ? "

कीर्ती " आई माहित आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही बसणार ते ! कारण शेवटी मी सुन ना . दोष कितीही मुलात असला तरी तोह कधीच मान्य केला जात नाही. " कीर्ती च्या डोळ्यांत बोलताना पाणी येत असत.

कीर्ती विकास कडे तिरस्कारा ने पाहते. आणि तिथुन ति रूम मध्ये निघुन जाते.

आई विकास कडे पाहते.

आई " खरं काय ते समजल्यावर ही असच बोलणार.!"

विकास " सोड ना , तुला खरं काय ते समजलंय ना आता ? "

आई " हो... "

विकास " चल मी जातो माझं काम आहे जरा !"

आई " आज तर रविवार मग आज कसलं काम काढल ? "

विकास " आहे काही...!" असं बोलुन विकास बाहेर निघुन जातो.

बराच वेळ कीर्ती रूम मध्ये बसून असते. ति सतत विकास च्या वागण्याचा विचार करत असते. तिला ह्या सगळ्याचा जाब विकास ला विचारायचा असतो.

दुपार होते ति विकास ला कॉल लावते. पण विकास सतत तिचे कॉल कट करतो.

कीर्ती काही वेळा नंतर खोली बाहेर येते. आई बाहेरच्या रूम मध्ये बसलेल्या असतात. स्वयंपाक च आवरण्या साठी ति किचन मध्ये जाते. जेवणाचं ताट वाढून ति आईनं समोर ठेवते.

आई " मला नकोय जेवण !" आई रागात बोलतात.

कीर्ती " काय झालं आई ? अहो किती वाजले पहा. जेऊन घ्या मी थांबते विकास साठी !"

आई " मला नकोय तुझ्यावर हातुन !"

कीर्ती ला खुप रडु येत पण ति कस बस स्वतःला आवरते.

कीर्ती " काही काय बोलताय आई ? मी इतकं काय केल. निदान सासु नाही पण एक आई म्हणुन तरी समजुन घ्या ! "

आई " किती समजायचं अजुन मी ? लग्नाला इतके वर्ष झाली घरात अजुन पाळणा नाही हलला. मी अजुन किती उत्तर द्यायची लोकांना ? "

कीर्ती " अहो ह्यात लोकांना उत्तर द्यायची काय गरज.? आणि इतका काही मोठा गुन्हा नाही केला मी !"

आई " तुला बोलायला काय गं, तुम्ही आज काल च्या मुली. तुम्हाला नाही वाटत गरज कोणाला उत्तर द्यायची !"

कीर्ती " आई तुम्ही चुकीचं समजतायत ! "

आई " आज काल काय आलीये ति मेली फॅशन म्हणे , तेच काय ते करत होतात म्हणुन आता मुलं नाही होतं तुला !"

आईंना कस समजावू हे कीर्तीला समजत नव्हत. तिला आज खऱ्या अर्थाने तिच्या आईची आठवण येत होती.

तिला तिच्या आईला हे सार काही सांगुन टेन्शन द्यायचं नव्हत. तिला मायेने डोक्यावर हात फिरवण्या साठी आई जवळ असायला हवी होती.

कीर्ती रूम मध्ये जाते. तिला रडु आवरेना ति खिडकीत उभी राहुन कळवळून रडते.


..... क्रमश..



🎭 Series Post

View all