हवं असलेलं मातृत्व.. अंतिम भाग..

कीर्तीला गौरी मुळे मातृत्व लाभत..

भाग -17  अंतिम भाग..


अनाथ आश्रम फार सुंदर असत. चहू बाजूनी झाडे लावलेली त्याला छानसे लहान लहान रंगीबेरंगी फुले आलेली. जणु ति हवेने गाणी गात झुलत आहे असे वाटत होते. कीर्ती तिथलं वातावरण पाहुन खुप भावुक होते.

कीर्ती " किती छान आहे हे सगळं ! विकास. "

विकास " हो गं !"

कीर्ती आणि विकास जसं आत प्रवेश करतात. एका रूम मधुन लहान मुलांच्या रडण्याचा, हसण्याचा आणि बोबडे बोलत बोलण्याचा आवाज ऐकू येतो. ति बाळे काही आत्ताच जन्मलेली, काही महिन्यांची तर काही वर्षा पर्यन्त ची होती.

तर एका रूम मध्ये थोडी फार मोठी दुडू दुडू चालणारी. तर एका रूम मध्ये थोडी फार मोठी अशी मुले होती.

कीर्ती त्या मुलांकडे पाहुन हसत म्हणते.

कीर्ती " किती गोड आहेत ना ही सगळी !"

विकास " हो हो कीर्ती बाई, पाहतोय मी !"


कोणाला भेटायचं आहे तुम्हाला ? समोरून आवाज येतो.

विकास च्या समोर एका साडी घातलेली, डोळ्यांना जाड भिंगाचा चषमा लावलेली बाई उभी होती. कदाचित ह्या आश्रमाच्या हेड असतील.

विकास " ह्म्म्म मला इथल्या इन्चार्ज ला भेटायचंय !"

हेड बाई " मीच आहे. बोला! काय काम होत. "

विकास " ते आम्हाला दत्तक घेण्याबद्दल विचारायचं होत !"

हेड बाई " बरं!! ह्या कोण? " कीर्ती कडे पाहुन त्या बाई बोलतात.

विकास " ही माझी बायको ! कीर्ती . " कीर्ती कडे पाहत विकास म्हणतो.

हेड बाई " बरं ! चला आपण माझ्या कॅबिन मध्ये बसून बोलु !"

विकास नि कीर्ती त्या बाई च्या पाठी पाठी त्यांच्या कॅबिन मध्ये जातात.

हेड बाई " बसा !"

विकास नि कीर्ती त्या बाई च्या समोर बसतात.

हेड बाई " बरं , मग राहायला कुठे.? "

कीर्ती " आम्ही मुंबई मध्येच राहतो. बोरिवली !"

हेड बाई " अच्छा! घरी कोण कोण असत. "

विकास " मी, कीर्ती आणि माझी आई !"

हेड बाई " बरं ! दोघ काम काय करता ? "

विकास " मी खाजगी कंपनी मध्ये आहे आणि ही सुद्धा खाजगी कंपनी मध्ये चांगल्या हुद्द्यावर आहोत. "

हेड बाई " बरं म्हणजे घरात पैशाची चंचन नाही ! "

विकास कीर्ती " नाही !"

हेड बाई " बरं लग्नाला किती वर्ष झाली ? "

विकास " सहा वर्ष !"

हेड बाई " मग मुलं का नाही ? "

बाई चा प्रश्न ऐकल्यावर विकास नि कीर्ती एकमेकांकडे पाहतात.

हेड बाई " काय झालं ? कसंय मुलं दत्तक देण आणि घेणं खुप सोप्प नसत. तुम्ही दत्तक घ्यायला परिपूर्ण आहात कि नाही आम्हाला पाहावं लागत. आणि मगच आम्ही मुलं द्यायचं कि नाही हे ठरवतो. "

विकास " बरोबर आहे मॅडम तुमचं !"

हेड बाई " बघा काही प्रोसेस असते. म्हणजे कि आम्ही तुमच्या घरी येऊ आणि पाहू मगच ठरवू. "

कीर्ती " चालेल !"

हेड बाई " बरं मुलगा कि मुलगी दत्तक घ्यायचा विचार आहे तुमचा ? "

कीर्ती " मुलगी "

हेड बाई " छान , मला तुमच्या घराचा ऍड्रेस पुर्ण लिहून द्या आम्ही उद्या परवा मध्ये येऊन घराची भेट घेऊ.!"

विकास " ठीक आहे ! "

विकास घरचा पत्ता लिहून देतो. कीर्ती त्या बाळांकडे पाहुन भावुक होते.

विकास " चल कीर्ती निघू आपण !"

अस बोलुन विकास कीर्तीला तिथून घेऊन निघतो. घरी येतो. कीर्ती तिथुन आल्या पासून खुप शांत असते.

रात्र होते. कीर्ती एकटीच बाल्कनीत उभी असते.

विकास " काय गं काय झालं ? अशी शांत का? "

कीर्ती " विचार करते !"

विकास " कसला ? "

कीर्ती " हेच कि आपल्याला निदान मुलं तरी दत्तक देतील ना ? "

विकास " तुझा बाप्पा वर विश्वास आहे ना ? मग सगक तुझ्यावर मनासारखं होईल !"

कीर्ती " होईल ना रे !" आणि विकास ला घट्ट मिठी मारते.

सकाळ होते. कीर्ती स्वयंपाक घरात असते ऑफिस ला जायची तयारी करत असते. तितक्यात विकास कीर्ती ला जोर जोरात आवाज देत बाहेर येतो.

विकास " कीर्ती,,,अगं कीर्ती,,, "

कीर्ती " काय झालं ? इतकं काय झालं आवाज देतोयस ? "

विकास " तु आज ऑफिस ला जाऊ नकोस, त्या हेड बाई येतायत !"

कीर्ती " काय ? अरे अजुन काहीच तयारी झाली नाही आहे, नि अस अचानक. सगळंच बाकी आहे ? "

विकास " शांत हो आधी. आणि काय तयारी बाकी आहे ? "

कीर्ती " अरे घर बघ कस नीट करायचं राहिलय! त्या येणार घर बघणार !"

विकास " अरे मग काय झालं. तु नीट तयार हो जा नि आईला सुद्धा सांग तयार व्हायला.!"

अस बोलुन विकास आत रूम मध्ये जातो. काही वेळा नंतर हेड बाई नि त्यांची काही माणसे घरी येतात.

हेड बाई " मिस्टर विकास ! आत येऊ का. "

विकास " येस प्लीज मॅडम !"

विकास नि त्याचे घरचे हेड बाई च स्वागत करतात.

तिला साफ सोफ्यावर बसायला सांगतात. आई फ्रिज च गार पाणी हेड बाई नि तिच्या माणसांना देतात.

हेड बाई " तुमचं स्वतःच घर आहे का हे ? "

आई " हो !"

हेड बाई " ह्या कोण मिस्टर विकास? "

विकास " सो सॉरी मॅडम, ओळख करायची राहिली. ही माझी आई !"

हेड बाई " ओह्ह,,, तुम्हाला कल्पना आहे का मिस्टर विकास नि कीर्ती बाळ दत्तक घेतायत ते ? "

आई " हो,, माहित आहे मला.!"

हेड बाई " ठीक आहे मग !"

कीर्ती " मॅडम काही अजुन विचारायचे असेल तर विचारा ? "

हेड बाई " नाही ठीक आहे . मिस्टर विकास मी आता निघते.!"

विकास " पुन्हा कधी भेटू येऊन, म्हणजे कस काय ते ?? "

हेड बाई " ते मी कळवेन !"

आणि हेड बाई नि तिची माणसे निघुन जातात.

कीर्ती " विकास तुला काय वाटत रे, काय बोलतील ते !"

विकास " काहीच तर्क वितर्क लावता येत नाही !"

कीर्ती " तरी पण !"

विकास " बघ आपण तर जे आहे ते सांगितलं. आता त्यांनी काय विचार केलाय माहित नाही.!"

आई " तुमचं झालय ना बोलणं, आणि आपण खरं तेच सांगितलं आहे. मग होईल नीट " आई कीर्ती ला धीर देत म्हणते. काही दिवस कीर्ती त्या हेड बाईंच्या कॉल ची आतुरतेने वाट पाहत होती. सतत विकास ला विचारपूस करायची. 

काही दिवसांनी कीर्ती आणि विकास ला हेड बाईंचा कॉल येतो. त्या दोघांनाही हेड बाई भेटायला आश्रमात बोलवतात. कीर्ती आणि विकास तातडीने आश्रमात जायला निघतात. विकास नि कीर्ती आश्रमा जवळ पोहचतात.

कीर्ती " बाप्पा त्या मॅडम चा होकार असुदे ! प्लीज प्लीज प्लीज बाप्पा...!" कीर्ती बाप्पा ला कळवळून हाक मारते.

विकास " सगळं नीट होईल !" कीर्तीला धीर देत विकास बोलतो.

विकास नी कीर्ती आत हेड बाईंच्या ऑफिस मध्ये जातात.

विकास " मे आय मॅडम? "

हेड बाई " येस प्लीज विकास & कीर्ती "

विकास " तुम्ही बोलावलं होत आम्हाला कॉल करून !"

हेड बाई " हो, थोडं बोलायचं होत !"

कीर्ती हेड बाईंच बोलणं ऐकुन टेन्शन मध्ये येते.

कीर्ती " काय झालं मॅडम ? "

हेड बाई " मी तुमच्या घरी आले पाहिलं सगळं काही लोकांना विचारपूस ही केली. तुमच्या सोसायटी मध्ये. तर मी अस ठरवलंय कि ? "

विकास " कि मॅडम ? "

हेड बाई " तुम्हाला मुलगी दत्तक द्यायची कायद्या नुसार !"

कीर्ती नि विकास " खरंच ! "

कीर्ती " थँक्स मॅडम ! मी खुप खुश आहे हे ऐकुन !"

आणि कीर्तीच्या डोळ्यांत पाणी येत. ति खुप खुश होते. विकास ही कीर्तीला पाहुन खुश होतो.

हेड बाई " बरं तुम्ही इथेच बसा आपण फॉर्मॅलिटी करून घेऊ.!"

विकास कीर्तीला बाहेर बसवून तोह इतर फॉर्मॅलिटी करून घेतो.

हेड बाई कीर्ती आणि विकास ला नुकत्याच जन्माला आलेल्या दहा दिवसाचं बाळे दाखवते.

हेड बाई " हम्म हे सगळे दिवसाचे बाळ आहेत. तुम्हाला जे बाळ आवडेल ते दत्तक घेऊ शकतात."

विकास " किती गोड आहेत. "

कीर्ती " हो तर !"

कीर्ती ला समोर एक गोंडस बाळ दिसत. दिसायला सावळी, चिमुकले नाक, इवले इवले डोळे, गुलाबी कपड्यात तिला बांधलेली..

कीर्ती त्या बाळा जवळ जाते. तिला अलगद प्रेमाने उचलून जवळ घेते.

कीर्ती " विकास ही बघ आपली गौरी.. "

विकास " अरे वाह नाव पण ठेवलस. " विकास कौतुकाने बोलतो.

कीर्ती " हो ,,, हेड बाई आम्ही हिला दत्तक घेतो. "

हेड बाई " हो नक्की ... चला मी सगळं तुम्हाला देते. "

अस बोलून कीर्ती नि विकास सगळी फॉर्मॅलिटी करून निघतात.

विकास " हॅल्लो आई आनंदाची बातमी आहे.!"

आई " काय रे ? " आई आनंदाने विचारतात. 

विकास " आम्ही लक्षमी ला घेऊन येतोय.!"

आई " खरंच ? " चला देव पावला.

विकास " बरं तु तयारी कर आम्ही पोहचतो.!"

आई " ठीक आहे !" आणि आई खुश होऊन फोन ठेवते.

आई घराची सर्व तयारी करते. तिच्या स्वागतासाठी रांगोळ्या आणि फुलांनी घर सजावते. गोड धोड करते. विकास आणि कीर्ती ची रूम खुप साऱ्या फुलांनी प्रफुल्लित करते.

सार स्वागताची तयारी करून आई विकास नि कीर्ती ची वाट पाहत खिडकीत उभी राहते.

तुटक्यात विकास आणि कीर्ती येतात. आई बाळाचं खुप छान प्रकारे स्वागत करतात. बाळाचं औक्षण करतात. सफेद कापडावर बाळाच्या पायाचे ठसे घेतात.

आई "ये गं ये सोन्याच्या पावलांनी ये, ये गं ये सोन्याच्या पावलांनी ये !!" अस बोलुन आई तिचं छान स्वागत करते.

कीर्ती "माझी लक्ष्मी!!!"

गौरी गौरी म्हणुन आई, कीर्ती आणि विकास तिचे खुप लाड करतात...गौरी लाडात आणि प्रेमात वाढते. सगळं काही छान चालत. गौरी ला घरी आणुन काही महिने होतात. गौरी आठ महिन्यांची होते.

काही दिवसांनी ****

कीर्ती " आई गं sssss... " आणि रूम मधुन कोसळण्याचा आवाज येतो.

विकास रूम मध्ये जाऊन पाहतो तर कीर्ती जमिनीवर कोसळून पडलेली असते.

विकास तिला शुद्धी वर आणायचा प्रयत्न करतो.

आई " एक काम कर तु डॉक्टरांना बोलाव. आई काळजीने बोलते.

विकास डॉक्टरांना फोन लावतो. आणि डॉक्टरांना घरी येतात.

डॉक्टर " काय झालं ? " डॉक्टरांना विचारतात.

विकास " अचानक चक्कर आली, मी रूम मध्ये आलो तेव्हा ति खाली पडली होती.!"

डॉक्टर कीर्तीला चेक करतात.

डॉक्टर " मिस्टर विकास!"

विकास " येस डॉक्टर काय झालं कीर्तीला ? सगळं नीट आहे ना ? "

डॉक्टर " मिस्टर विकास अभिनंदन कीर्ती आई होणार आहे. !"

विकास ऐकुन खुश होतो. त्याला विश्वास बसत नव्हता.

विकास " खरंच डॉक्टर !" विकास खुप खुश होतो. आई बातमी ऐकुन देवा समोर साखर ठेवतात.

डॉक्टर निघुन जातात. विकास कीर्ती च्या रूम मध्ये जातो.

कीर्ती डोळे बंद करून असते.

विकास तिचा हात हातात घेतो. " थँक्स "

कीर्ती हसते.

......

.. समाप्त...
🎭 Series Post

View all