हवं असलेलं मातृत्व.. भाग -16

विकास आणि कीर्ती त्यांचा निर्णय आई ला कळवतात..

भाग -16


विकास आई च्या रूम मध्ये जातो तेव्हा आई झोपलेल्या असतात. विकास रूम चे दिवे लावतो.

विकास " आई sss,,, झोपली आहेस का ? "

आई " नाही रे बोल ना ? हे काय दोघ ही आलात. काय झालं असे दोघे आलात ? "

कीर्ती " आई बोलायचं होत तुमच्याशी!"

आई " काय झालं बोला ना !"

विकास " आम्हाला तुला काही सांगायचंय, ते आम्ही,,, "

विकास अडखळतो बोलताना.

कीर्ती " ते आम्ही निर्णय घेतला आहे, तोह सांगायचंय तुम्हाला! "

आई " अरे मग बोला ना ? "

विकास " आम्ही मुलं दत्तक घ्यायचं ठरवलंय !"

आणि विकास एक मोठा श्वास घेतो.

विकास ने निर्णय सांगितल्या नंतर काही क्षण रूम मध्ये शांतता पसरली असते.

कीर्ती नि विकास खुप टेन्शन मध्ये येतात. आई ऐकल्यावर काय बोलेल ह्याच टेन्शन असत.

कीर्ती नि विकास एकमेकांन कडे पाहतात.

विकास " आई काही तरी बोल ? "

आई " खरं तर माझी इच्छा होती कि तुम्ही ट्रीटमेंट घेऊन मुलं होण्याचं प्रयत्न कराव ! "

विकास " आणि नाही च झालं तर ? ट्रीटमेंट मध्ये पैसे घालण्यापेक्षा मी मुलं दत्तक घेऊन त्याच्या साठी काही तरी करेन !"

कीर्ती " हो आई !"

विकास " आणि मी दत्तक मुलगी घेईन, मुलगा नाही.!"

अस बोलून विकास कीर्ती चा हात घट्ट पकडतो.

आई पुन्हा शांत बसते. काही वेळा नंतर आई विकास कडे पाहुन हसतात. आई च हसन पाहुन विकास नि कीर्ती ला आश्चर्य वाटत.

आई " आवडलं मला तुमचा निर्णय !"

विकास नि कीर्तीच्या निर्णयाने आई खुप खुश होती.

आई " तु प्रॅक्टिकली विचार केलास ह्याचा मला अभिमान आहे. आणि आजच्या काळात मुलगी दत्तक घेणं अभिमानाची गोष्ट आहे. "

कीर्ती आणि विकास आई खुश झाल्या मुळे खुप खुश होतात.

रात्रीच जेवण उरकून विकास नि कीर्ती रूम मध्ये जातात. चंद्राच्या मंद प्रकाशात आज कीर्ती चा चेहरा आनंदाने खुलून दिसत होता. विकास तिच्या जवळ जातो. तिला पाठून घट्ट मिठी मारतो. तिच्या नाजूक अशा कमरेला तोह अलगद स्पर्श करतो.

कीर्ती " हे काय आज झालंय काय ? "

कीर्ती त्याला लाडात विचारते.

विकास " काही नाही गं, आज अस वाटतंय तुझ्यावर खुप प्रेम कराव. तुला माझ्या मिठीतुन कधीच दूर जाऊ देऊ नये.!"

कीर्ती " हो हो, अस केलात तर चांदण्या ही लाजतील !"

विकास " लाजू दे कि !"

कीर्ती त्याच्या मिठीतुन स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते. तोह पुन्हा तिला घट्ट जवळ घेतो. तिला दोन्ही हातांनी उचलून बेड वर न्हेतो. आणि तिच्या नाजूक ओठांवरून अलगद बोट फिरवतो. चांदण्याच्या लख्ख प्रकाशात त्यांच सुंदर अस मिलन होत.

सकाळ होते. कीर्ती लवकर उठुन सगळं आवरून घेते.

विकास ही लवकर उठतो.

कीर्ती " हे काय आज लवकर कसे उठलात ? "

विकास " आज ऑफिस ला सुट्टी !"

आई " का रे बरा आहेस ना ? " आई काळजीने विचारते.

विकास " हो गं जरा दमायला झालेल ना ! म्हणुन. " आणि कीर्ती कडे पाहुन विकास डोळा मारतो.

कीर्ती ला कालच आठवत ति हळुच लाजते. आणि स्वयंपाक घरात पळते.

आई " बरं आजचा काय प्लॅन ? "

विकास " बघ मी आणि कीर्ती काही अनाथआश्रमात जाऊन येतो. चौकशी करून येतो. "

आई " ठीक आहे. "

विकास " चल मी आवरतो आणि तु ही आवरून घे कीर्ती !"

अस बोलुन विकास आवरायला जातो.

आई कीर्ती कडे पाहते.

आई " मग कीर्ती बाई खुश आहात ना ?" हसत हसत आई विचारते.

कीर्ती " हो आई खुप !"

आई " बरं जा आवर, निघायचंय ना !"

कीर्ती " हो आई !"

काही वेळा ने कीर्ती नि विकास अनाथ आश्रमात जायला निघतात.

कीर्ती " थँक्स विकास !"

विकास " त्यात थँक्स कशाला ? "

कीर्ती " तु माझ्यासाठी इतकं काही करतोयस.!"

विकास " मला ही तर बाबा व्हायचंय !"

" चल उशीर होतोय , निघूया आता. " अस बोलुन विकास नि कीर्ती ची गाडी आश्रमा ला जायला निघते.

काही वेळातच गाडी एका आश्रमा बाहेर येऊन थांबते.

विकास " कीर्ती आलं गं आश्रम !"

कीर्ती " हो , पण थोडं टेन्शन आलय ? "

विकास " कसलं ? आणि प्रत्येक वेळेस का घेते बरं टेन्शन तु ? "

कीर्ती " हेच कि ते देतील ना आपल्याला बाळ ? "

विकास " देतील !" बरं उत्तर गाडीतून मी गाडी पार्क करतो एका ठिकाणी.

कीर्ती गाडी तुन उतरते. विकास गाडी पार्क करायला जातो. विकास गाडी पार्क करून येतो.

विकास " हम्म चल... जाऊ आत !\"

कीर्ती नि विकास आश्रमाच्या आत येतात.



..... क्रमश...




🎭 Series Post

View all