हवं असलेलं मातृत्व..भाग -12

आई विकास ला खुप समजावते.

भाग -12


विकास " खेळ तु केलंयस.. " विकास चिडत म्हणतो.

कीर्ती " अरे प्रत्येक प्रॉब्लेम वर सोलुशन असतो. "

विकास " सोलुशन...? "

कीर्ती " एकदा डॉक्टर कडे चल, आपण बोलु त्यांच्याशी !"

कीर्ती खुप विनवण्या करते.

"पण आपल्या ह्या प्रॉब्लेम वर घटस्फोट हा काही पर्याय नाही."कीर्ती रडत रडत म्हणते.

आई " विकास असा पटकन निर्णय घेऊ नकोस ! निदान एकदा ति काय म्हणते हे तर पहा ? "

विकास " आई तुला नाही माहित !"

आई " विकास, मी सासु असली म्हणुन काय झालं मला सगळं माहित आहे !"

विकास आई कडे आश्चर्याने पाहतो.

" मुलगा आहेस म्हणुन मी तुझी चुकीची बाजू नाही घेणार ! "

कीर्ती ला समजत नसत कि आईंना नक्की काय म्हणायचंय.

विकास " हे बघ आई !!"

कीर्ती " त्यांना बोलु द्या ना ? हं बोला आई !"

आई " मला माहित आहे प्रॉब्लेम कोनात आहे ते, तेही खरं खरं !"

विकास " खरं खरं म्हणजे ? "

आई " मी आज च कीर्ती आणि तुमच्या डॉक्टर च बोलणं ऐकलंय !"

विकास " वाह,,, छान कीर्ती !"

आई " विकास तु चुकतोयस आणि त्या दिवशी तु माझ्याशी खोटं बोललास ! तु कीर्ती ला ह्यात दोषी ठरवलंस ! आणि मी सतत कीर्ती ला दोष देत राहिले. तिला घाडून पाडून बोलले."

कीर्ती " आई प्लीज तुम्ही असं नका बोलु ! मी बायको म्हणुन माझं कर्तव्य केल.!" विकास कडे पाहत कीर्ती म्हणते. तिच्या डोळ्यांत आईच बोलणं ऐकुन पाणी येत.

आई " तु बायको म्हणुन कर्तव्य केलस पण, नवरा म्हणुन तुझं ही काही कर्तव्य आहे का नाही विकास ? "

विकास " झालं तु मलाच विचार आई!"

आई वर चिडत विकास म्हणतो.

आई " मी गेले कित्येक दिवस कीर्ती च वागणं बघतेय, तिची आई होण्यासाठी ची धडपड मला कळतेय ! तु ही तितकंच मनावर घे राग तुझा पुरशी अहंकार बाजुला ठेव नि तिला साथ दे !"

कीर्ती रडु लागते. तिला खुप दिवसांनी बरं वाटत कि सासु आई म्हणुन माझा विचार करतायत.

विकास " तु मलाच समजावं !"

आई " आता पर्यन्त समजावत होती तुला पण आता, एक स्त्री एक आई म्हणुन सांगतेय.!"

आई चा राग पहिल्यांदा विकास साठी होता. त्याला माहित ही नव्हत कि आई कीर्ती ची बाजू घेईल.

कीर्ती " आपण उद्याच जाऊ डॉक्टर कडे आणि काही मार्ग भेटतोय का ते पाहू . " विकास ला समजावत बोलते.

आई आणि कीर्ती एकमेकांच्या चेहऱ्या कडे पाहतात.

आई " जातोयस ना ? " आई पुन्हा विकास ला विचारते.

विकास " हो गं जातो !" वैतागत विकास म्हणतो.

कीर्ती " थँक्स विकास !"

विकास " इट्स ओके!"

आई " बरं आता जेवून घेऊ या!"

तिघ ही रात्री जेवायला बसतात. काही वेळ वातावरण शांत असत. वातावरण व्यवस्थित करण्यासाठी आई मुद्दाम विषय काढते.

आई " बरं मग उद्या लवकर जा , आणि कीर्ती तु सांगितलं आहेस ना येतायत करून.!"

कीर्ती " हो आई मी तसा मॅसेज केलाय त्यांना !"

आई " मग ठीक आहे ! बरं विकास उद्या काही तरी स्पेशल बनवूया जेवायला ? "

विकास " हो !"

आई " अरे मग व्यवस्थित बोल कि हो करून!"

आणि आई हसायला लागतात.

विकास जेऊन रूम मध्ये जातो. कीर्ती आणि आई एकमेकींन कडे पाहतात.

आई " सगळं ठीक होईल. कसंय ना दोष त्याच्यात निघाल्यामुळे त्याचा पुरशी अहंकार थोडा दुखावलाय. दोष बाई मध्ये निघाला कि बाई ही सौंसार करायच्या लायकीची नसते. " आई कीर्तीला समजावत म्हणतात.

कीर्ती " पण आई हे असं का ? "

आई " अगं सुनबाई हा समाजाचा नियमच आहे. त्याला तु काय मी काय काहीच करू शकत नाही. "

कीर्ती " पण ह्यात प्रत्येक वेळेस बाईची चूक असते अस नसत ना !"

आई " जाऊदे, ह्याला आपण नाही काही बदलू शकत. "

" तु आवरून झोप शांत. "

कीर्ती " हो आई.. "

कीर्ती आवरा आवर करायला स्वयंपाक घरात जाते.

कीर्ती " आई तुम्ही जाऊन आराम करा मी घेते आवरून. "

आई आराम करायला रूम मध्ये जातात. कीर्ती सुद्धा आवरून रूम मध्ये जाते. रूम चे दिवे बंद असतात. कीर्ती दिवे लावते रूम चे. विकास झोपलेला असतो.

कीर्ती त्याच्या जवळ जाते त्याला आवाज देते.

कीर्ती " विकास... ऐक ना...!" ति त्याला आवाज देऊन उठवते.

विकास कूस वळवून झोपतो. कीर्तीला विकास शी बोलायचं असत. पण तोह झोपून जातो.


...... क्रमश....



🎭 Series Post

View all