भाग -11
संध्याकाळ होते विकास घरी येतो. कीर्ती आणि आई त्याची वाट पाहत असतात.
कीर्ती " आलास ये ! बरं मी पाणी घेऊन येते तुला. "
कीर्ती आतून पाणी आणून देते.
विकास " नकोय मला !"
कीर्ती " अरे असा काय करतोस ? "
विकास तिला बाजुला करून आत जातो.
कीर्ती उदासी चेहऱ्याने आई कडे पाहते.
आई काही च बोलत नाही.
विकास फ्रेश होऊन बाहेर येतो.
कीर्ती आत स्वयंपाक घरात जाऊन विकास साठी चहा नाश्ता करते. आणि त्याला आणून देते.
कीर्ती " हे घे भूक लागली असेल ना ? असाच तु डब्बा घेऊन गेला नव्हता !"
विकास " तु का इतकी काळ्जी दाखवते ! मला नकोय काही तुझ्यावर हातुन !"
कीर्ती " लहान आहेस का रे तु ? उगाच हट्टपणा करतोयस . लहान मुलं तरी ऐकतात. "
विकास " तुला एकदा सांगितलेल कळत नाही का ? " असं बोलुन विकास चहा चा कप बाजूला सारतो. आणि उठुन रागाने रूम मध्ये निघुन जातो.
कीर्ती सुद्धा हार मानणार नसते. तिला काही करून विकास ला डॉक्टर कडे घेऊन जायचे असते.
कीर्ती विकास ला मनवण्यासाठी रूम मध्ये जाते. पण रूम चा दरवाजा आतून लोक केलेला असतो. कीर्ती दरवाजा ठोठावते.
कीर्ती " अरे विकास दरवाजा उघड ? "
विकास " मला एकटं बसू दे प्लीज तु जा इथून ? "
कीर्ती " हे बघ, आई सुद्धा तुझी सकाळ पासून काळजीत आहेत. "
विकास " ति माझी आई आहे ? मी पाहुन घेईन काय करायचं ते !"
कीर्ती " हो बाबा, मी कुठे काय म्हणतेय. पण आता बाहेर तर ये.!"
कीर्ती बराच वेळ विकास ला समजावत होती.
आई " कीर्ती... " आई कीर्ती ला आवाज देते.
कीर्ती " काय आई ? "
आई " त्याला नसेल यायचं तर राहूदे उगाच पाठी लागून काय फायदा ? "
कीर्ती " हो आई !"
आई " तु स्वयंपाक च आवरून घे !"
बऱ्याच वेळा नंतर विकास रूम बाहेर येतो.
कीर्ती " जेवण झालं आहे तु मी आई जेवायला बसुया!"
विकास " मला नको तुझ्यावर हातच !"
कीर्ती " हे बघ निमूटपणे जेव नाही तर आई चिडतील, ऐक माझं !"
विकास " तुझा शहाणपणा तुझ्यावर जवळ ठेव. मला नको शिकवूस !"
कीर्ती " तु उगाच भांडतोयस!"
विकास " सगळं नीट चाललं होत . तुला च जायचं होत ना त्या डॉक्टर कडे.!"
कीर्ती " अरे मग त्यात काय झालं , उलट कळलं तरी ? "
विकास " नसते आरोप माझ्यावर लावू नकोस, कीर्ती !"
कीर्ती " तुझ्यातला दोष तु लपवून का ठेवतोयस ? सांग ना जे कळलं ते आई ना !"
विकास " हळु बोल !"
कीर्ती " का बरं जे खोटं आहे ते खोटं आहे !"
कीर्ती नि विकास चे खुप वादावाद होतात. तरी सुद्धा विकास स्वतःवरचा दोष कबूल करायला तयार नसतो. तोह सतत कीर्तीला दोष देत असतो.
विकास " आई ला हे सांगुन तु अजुन त्रास देऊ नकोस ! आणि तिला काही झालं ना तर कीर्ती ? "
कीर्ती " तर काय विकास ?"
विकास " मला घटस्फोट हवाय !"
कीर्ती " छान,, काय बोललास? घटस्फोट...!"
कीर्ती च्या रागाचा परत तुटतो विकास चे शब्द ऐकल्यावर.
विकास " हो, तोही लगेच.!"
कीर्ती " नाही शक्य ! खेळ वाटलं का तुला सौंसार म्हणजे विकास ? " कीर्ती रडत रडत म्हणते.
...... क्रमश....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा