हवं असलेलं मातृत्व.. भाग - ६

जरा ही विकास ला कीर्ती बद्दल हेवा नव्हता.

भाग - ६


विकास " हो आलोय ! का तुला काही प्रॉब्लेम ? "

कीर्ती " प्रॉब्लेम आहे कारण ! दारू पिणे हे काय सोलुशन नाही आहे ! "

विकास " दारू तुझ्यावर मुळे प्यावी लागली, तूच ही वेळ आणली माझ्यावर !" आणि तितक्यात विकास गडबडून बेड वर पडतो.

कीर्ती त्याला सावरण्या साठी साठी पुढे जाते. तोह दुखावलाय म्हणुन त्याला सावरण्याचा प्रयत्न करते.

विकास " ये... हात लावू नकोस मला... चल हो तिथे... " आणि तोह तिला बाजुला ढकलून देतो.

कीर्ती बेडच्या बाजुला असलेल्या लहानशा कपाटावर आदळते. तिच्या हाताला मार लागतो. ति जोरात कळवते. तिच्या डोळ्यांतून पाणी येत.

कीर्ती " आई गं... "

विकास " पुन्हा हात लावू नकोस मला, बायको म्हणुन कमी पडलीयेस तु. "

आणि विकास दारूच्या नशेत गार होतो. कीर्ती त्याला बेड वर नीट झोपवते, त्याच्या डोक्यावरून अलगद हात फिरवते. तिला विकास ची ही अवस्था पाहवत नसते.

रात्रीचा 1 वाजतो कीर्ती जागीच असते. ति खिडकीत बसून खुप विचारत मग्न असते. पोठात अन्नाचा एक ही कण नसतो.

सकाळ होते.

विकास " आई.. गं.. डोकं नुसतं सुन्न झालंय..! " डोक्याला हात लावत विकास बोलतो.

कीर्ती " होणार च ना ! काल घेतली जी होती तु.. घे हे पी...!" त्याच्या पुढ्यात भरलेला ग्लास देत.

विकास " काय आहे हे ? "

कीर्ती " घाबरू नकोस बाकी काही नाही, निंबु पाणी आहे पी बरं वाटेल डोकं उतरेल. "

विकास " नकोय मला !"

कीर्ती " नाही पियालास तर अजुन त्रास होईल आणि नाईलाजाने आई ना खरं काय ते सांगाव लागेल. "

विकास " ठीक आहे दे !"

विकास तिच्या हातुन ग्लास घेऊन पितो.

कीर्ती " आज तरी आईंशी बोलुन घेऊया ! किती दिवस असं लपवणार ? "

विकास " झालं सुरु सकाळी सकाळी, तुझं ऐकलं काय तर तुझं सुरु झालं. " सकाळी सकाळी तिच्यावर तडकतो.

कीर्ती " सुरु नाही झाली, पण किती दिवस असं लपवणार ? "

विकास " हा मग !"

कीर्ती " बरं तु बाहेर ये फ्रेश होऊन ! रात्री काय जेवलास नाही, नाश्ता करून घे.. "

विकास " ह्म्म्म.. "

कीर्ती आवरून बाहेर जाते. आई तिची स्वयंपाक घरात वाट पाहत असते.

कीर्ती " आता आई कालच विचारणार !" कीर्ती स्वतःशीच मनातल्या मनात बोलते.

आई " उठला का तोह ? "

कीर्ती " हो, फ्रेश व्हायला गेलेत.!"

आई " ह्म्म्म... "

काही वेळा नंतर विकास फ्रेश होऊन बाहेर येतो. आज रविवार असतो. सुट्टीचा दिवस.

आई ने विचारच केलेला असतो कि आज काही करून ह्या दोघांना विचारणार काल काय झालं ते.

कीर्ती चहा आणून विकास समोर ठेवते. सोबत छानसा शिरा ही ठेवते.

आई " शिरा खा नि कालची काही चांगली बातमी असेल तर सांगा !" आई टोमन्याने दोघांना बोलते.

कीर्ती " चांगली बातमी म्हणुन नाही केला. खावंसं वाटल म्हणुन केला. " आईंना कीर्ती उत्तर देते.

आई " अरे वाह म्हणजे डोहाळे लागले कि काय तुला ? "

विकास " काय बोलतेयस आई ? नॉर्मली शिरा नाही का खाऊ शकत कोणी ? " चिडून बोलतो.

आई " काल पासून इतकं चिडतोयस कशाला ? आणि स्पष्ट सांग ना काय आहे ते ? "

कीर्ती " आई... आई... सांगतो. चिडू नका.!"

विकास कीर्ती कडे रागाने बघतो. त्याला माहित होतं कीर्ती कदाचित नाही बोलणार कि नक्की काय आहे ते.

आई " मग सांग....मी पुन्हा थोडी विचारणार ? "

कीर्ती " आम्ही काल डॉक्टर कडे गेलेलो ! त्यांनी पुन्हा चेकअप केल... रिपोर्ट पाहिले विकास नि माझे.. तर..!"

ति अडखळत बोलते, चेहऱ्यावर असलेला घाम ति हाताने फुसते.

आई " मग.. पुढे काय..? "

कीर्ती " पुढे असं कि ..!"

विकास " असं कि ति आई नाही होऊ शकत.!"

आई " काय?? काय बोलतोयस हे ? " आईला ऐकुन शोक लागतो. ति कीर्ती कडे रागाने पाहते.

कीर्ती " काही काय बोलतोयस विकास ? " कीर्तीच्या डोळ्यांत पाणी येत. ति विकास कडे रागाने पाहते. तिला खरंच वाटत नाही कि विकास पुर्ण दोष कीर्ती वर लावेल ते.

विकास " आहे तेच बोलतो आहे ! "

विकास च्या चेहऱ्यावर जरा ही कीर्ती बद्दल हेवा नव्हता.


...... क्रमश....

🎭 Series Post

View all