भाग - ५
आई रागाने उठुन जातात. कीर्ती विकास कडे रागाने बघते.
विकास " माझ्या कडे पाहुन काय होणार . तुझ्यावर मुळे झालं. " विकास कीर्तीला दोष देतो.
कीर्ती " तु मलाच काय दोष देतो. तु बोलायचं होतं ना आईंशी !"
विकास " काय सांगू तिला तुझ्यावर सुने मुळे माझा अपमान झाला ते! "
कीर्ती " तु अपमान अपमान काय नाचवतोय ! ह्यात कसला झाला तुझा इतका अपमान ? "
आई " काय चाललंय तुमचं ! इतकं जोर जोरात भांडतायत कशाला ? "
आई कीर्ती नि विकास च जोरात आवाज ऐकुन किचन मधुन बाहेर येते.
आई " कीर्ती जरा आवाज कमी कर ! किती जोर जोरात बोलशील ? "
कीर्ती " ठीक आहे सॉरी !" कीर्ती आई ला सॉरी बोलते.
विकास " हिचाच आवाज वाढलेला असतो !"
कीर्ती स्वतःचा राग आवरून शांत पणे रूम मध्ये जाते.
तिला अश्रु अनावर होईना तिच्या डोळ्यांतून पाणी येत.
ति खिडकीत शांतपणे बसलेली असते. तिला एकांत हवा असतो.
तितक्यात विकास आत येतो.
विकास तिला रडताना पाहुन म्हणतो.
विकास " आता रडुन काय होणार ? "
कीर्ती " आता रडायला पण तुला विचारावं लागणार का ? कि रडते म्हणुन तुला त्रास होतोय.? "
विकास " मला का होईल त्रास ? "
कीर्ती " बरोबर आहे !"
विकास कीर्तीला मनाला येईल तस बोलुन, तवातवा ने बाहेर निघुन जातो. कीर्तीच्या मनाला विकास च्या गोष्टी लागलेल्या असतात. तिला वाटल ही नव्हतं कि विकास असं वागेल बोलेल. ति काही वेळ एकांतात रूम मध्ये बसली होती.
आई आत रूम मध्ये येतात.
आई " जेवायला चल आणि विकास कुठे आहे ? त्याला ही बोलाव. "
कीर्ती " तोह बाहेर गेलाय मी कॉल लावते त्याला.!"
आई ला कीर्ती चे डोळे रडुन लाल झालेले दिसतात. पण त्या तिला कारण विचारत नाही.
आई " हम्म्म्म !"
कीर्ती बराच वेळ विकास ला कॉल लावते. पण तोह सतत तिचा कॉल कट करत असतो.
कीर्ती बाहेर येते रूम च्या.
कीर्ती " आई तुम्ही जेऊन घ्या मी थांबते विकास साठी त्याला उशीर होईल !" असं बोलुन कीर्ती आत रूम मध्ये जाते.
आई ला समजलेलं असत कि कीर्ती नि विकास मध्ये काही झालाय. तिला अंदाज होता आज च्या रिपोर्ट वरून काही झालं असणार.
बराच वेळ होतो रात्रीचे अकरा वाजतात. विकास घरी येतो. कीर्ती त्याची वाट पाहत खिडकीत उभी असते.
विकास आत रूम मध्ये येतो. त्याच्या अंगातून दारूचा घमघमाट येत होता. त्याला साधं उभ रहायची ही शुद्ध नव्हती.
कीर्ती " हे काय ! तु दारू पियुन आलायस ? "
कीर्ती त्याला जाब विचारते.
विकास च्या तोंडून शब्द फुटत नव्हता.
कीर्ती " काय विचारतेय मी ! विकास. "
....... क्रमश.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा