हवं असलेलं मातृत्व. भाग - २

डॉक्टर च बोलणं ऐकुन विकास रागाने निघुन जातो.

भाग -२


कीर्ती " ह्म्म्म नाही हो, त्यांना असं सतत वाटत कि मी कमी पडते कुठे तरी. "

विकास " तु चुकीचं समजते. ति असं तुला नाही काही समजत. तिला तुझी काळ्जी असते सतत.!"

कीर्ती " काळ्जी ! ह्म्म्म. " कीर्ती च्या बोलण्यातुन राग दिसत होता. आणि म्हणूनच कदाचित तिची चिडचिड होत असावी.

विकास " बस कि किती चिडशील.! " विकास तिला शांत करत बोलतो.

काही वेळातच विकास ची गाडी हॉस्पिटल खाली येऊन थांबते.

विकास " घे आलोच, उत्तर आता. "

कीर्ती " बरं ऐक ना नीट असेल ना सगळं. " घाबरतच त्याला विचारते.

विकास " हे काय असं घाबरतेयस का ? होईल सगळं नीट.!" असं बोलुन विकास कीर्ती ला धीर देतो.

कीर्ती गाडीतून उतरते. कीर्ती नि विकास हॉस्पिटल च्या आत जातात.

हॉस्पिटल च्या एन्ट्री ला गणपतीची लहानशी मूर्ती असते. कीर्ती थांबते आणि कळवळून हात जोडते.

कीर्ती " निदान आता तरी मला असं रिकामी पाठवू नकोस.!" बाप्पा च्या समोर हात जोडून म्हणते.

विकास " कीर्ती नको गं टेन्शन घेऊस रिपोर्ट चांगले येतील ! चल जाऊ लेट झालाय आधीच. " कीर्ती ला धीर देत म्हणतो.

कीर्ती " हो ! "

विकास नि कीर्ती डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये जातात.

कीर्ती " आत येऊ डॉक्टर.!" कॅबिनचा दरवाजा नोक करत कीर्ती बोलते.

डॉक्टर " हो कीर्ती प्लीज आत ये. मी तुझी च वाट पाहत होते. "

विकास " सॉरी डॉक्टर लेट झाला आम्हाला. "

डॉक्टर " इतका काही लेट नाही झाला आणि रिपोर्ट सुद्धा आता च मला भेटले. "

कीर्ती " काय आहे डॉक्टर ! रिपोर्ट ok ना ? " कीर्ती च्या चेहऱ्यावर भीती होती.

विकास " अगं कीर्ती थांब त्यांना बोलु दे आधी !"

"डॉक्टर बोला तुम्ही !" विकास डॉक्टर ला बोलतो.

कीर्ती " सॉरी डॉक्टर !"

डॉक्टर " हे बघ कीर्ती, मला माहित आहे तु खुप टेन्शन मध्ये आहे ते. आपण तुझ्या नि विकास च्या काही टेस्ट केल्या.? बरोबर ! आणि त्यात असं समजलंय कि..! "

कीर्ती " काय डॉक्टर प्लीज बोला.? "

डॉक्टर " हे बघ मी जे सांगेल ते नीट ऐक नि त्यावर पुढे काय निर्णय घ्यायचा ह्याचा नीट विचार कर. " डॉक्टर कीर्तीला समजावत बोलतात.

विकास " हिच्यात काही प्रॉब्लेम आहे का.? डॉक्टर. "

कीर्ती " एक मिनिट विकास तु असं डायरेक्ट कस विचारू शकतोस. प्रॉब्लेम तुझ्यात ही असू शकेल ना.? "

कीर्ती खुप चिडलेली असते विकास च्या बोलण्यावर. तिला चीड आलेली असते ति विकास च्या अशा प्रश्नांची.

डॉक्टर " कीर्ती तु शांत हो आधी ! आणि मिस्टर विकास तुम्ही हे असं डायरेक्ट विचारणं चुकीचं आहे. दोष तुमच्यात ही असू शकतो. बाई म्हणुन प्रत्येक वेळेस दोष बाई त असणं गरजेचं नाही. "

विकास " सॉरी डॉक्टर.!"

डॉक्टर " बरं ऐक कीर्ती मी तुझे रिपोर्ट पाहिले आधी. रिपोर्ट तुझे बऱ्यापैकी नॉर्मल आहेत."

कीर्ती " थँक्स डॉक्टर ! मग मी आई का होत नाही.? "

कीर्ती च्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न असतात.

डॉक्टर " होऊ शकतेस,, पण....! " डॉक्टर थोडा वेळ शांत बसतात.

विकास " पण काय डॉक्टर ?"

डॉक्टर " हे बघ विकास मी तुझे ही रिपोर्ट पाहिले ! त्यात स्पष्ट लिहलंय. मुलं तुझ्या पासून नाही होऊ शकणार. "

हे ऐकतच कीर्ती नि विकास च्या पायाखालची जमीनच सरकते.

विकास " काय ?? कस शक्य आहे. डॉक्टर तुम्ही नीट पाहिले का रिपोर्ट माझे.? " विकास खुप भडकलेला असतो.

त्याला जराही डॉक्टरांच बोलणं सहान झालेलं नसत. तोह मान्य च करत नसतो.

कीर्ती " डॉक्टर तुम्ही नीट सांगा, नीट चेक करा पुन्हा एकदा रिपोर्ट. कदाचित समजण्यात चूक झाली असेल.?"

डॉक्टर " नाही गं कीर्ती मी पुन्हा पुन्हा पाहिलेत रिपोर्ट. हे बघ ह्या वर खुप सारे मार्ग आहेत. मेडिकल आता खुप पुढे गेलंय. " कीर्ती नि विकास ला समजावत डॉक्टर बोलतात.

विकास " पुढे गेलंय! मग माझ्या रिपोर्ट मध्ये दोष कसा.? "

डॉक्टर ना जाब विचारात विकास म्हणतो.

कीर्ती " काही काय विचारतोस, आता जे कळलं त्यातून मार्ग काढायला हवा ना. " विकास ला समजावत म्हणते.

डॉक्टर " हो आहे मार्ग. तु शांत होऊन बस.! "

विकास " मला नाही काही बसायचं !" असं बोलुन विकास रागाने तिथुन निघुन जातो.

...... क्रमश......




🎭 Series Post

View all