हवं असलेलं मातृत्व.. भाग - ३

कीर्ती विकास च्या वागण्याने खुप दुखावते.

भाग - ३


कीर्ती " सॉरी डॉक्टर ! विकास च असं वागणं साहजिकच होत." कीर्ती डॉक्टर ची माफी मागत बोलते.

डॉक्टर " असुदे कीर्ती मी समजू शकते. पण जर त्याच्यात दोष नसता आणि तोह तुझ्यात असता तर. त्याने तुला समजून घेतलं असत का ? "

कीर्ती " नसत घेतलं! पण बायको म्हणुन मला समजुन घेणं गरजेचं आहे. " डॉक्टर ला म्हणते.

डॉक्टर " प्रत्येक वेळेस बाईनेच का माघार घ्यायची ? "

कीर्ती " बाईचा जन्म माघार घेण्यासाठीच असतो डॉक्टर ! जाऊदे डॉक्टर मी निघते. " असं बोलुन कीर्ती निघते.

कीर्ती घाई घाई मध्ये खाली उतरते. तिला विकास दिसत नाही.

कीर्ती विकास ला कॉल लावते.

कीर्ती " अरे आहेस कुठे विकास ? " फोन वर विकास ला विचारते.

विकास " मला काही वेळ एकटं सोड प्लीज ! " विकास कीर्ती वर चिडत म्हणतो.

कीर्ती " काही काय बोलतोयस ! माझा तरी विचार कर. "

कीर्ती त्याला समजावत म्हणते.

विकास " ह्यात तुझा काय विचार करू ? आणि दोष तुझ्यात असेल माझ्यात नाही. " विकास अजुन चिडतो.

कीर्ती " माझ्यात, तुला नक्की म्हणायचंय काय ? "

विकास " हेच कि रिपोर्ट चुकीचे असतील !"

कीर्ती " वाह ! छान. आता तुझ्यावर आलं म्हणुन रिपोर्ट चुकीचे. " कीर्तीच्या डोळ्यांत पाणी येत.

विकास " होय !"

कीर्ती " ठीक आहे. तु बोलशील तस.! तुला वाटत असेल तर भेट मी जिथे टाकुन गेलायस तिथेच उभी आहे. "

विकास कॉल कट करतो. बऱ्याच वेळा नंतर विकास हॉस्पिटल जवळ येतो. कीर्ती कडे पाहतो तिचे डोळे रडुन रडुन लाल झालेले असतात. तोह गाडीचा दरवाजा उघडतो. आणि कीर्ती ला बसायला सांगतो. गाडी हॉस्पिटल बाहेर पडते. विकास कीर्ती शी काही च बोलत नाही. त्या दोघांमधली शांतता ही वादळा पूर्वीची शांतता आहे भासत होती.

कीर्ती " काही तरी बोल विकास ? " डोळे पुसत कीर्ती म्हणते.

विकास कीर्ती च्या प्रश्नांच उत्तर देत नाही. तोह शांत पणे गाडी चालवत राहतो.

कीर्ती काही न बोलता समोरच्या आरशातून त्याला एकटक पाहत राहते.

विकास चा पुरशी अहंकार दुखावलेला असतो. हे त्याच्या बोलण्यातुन वागण्यातून सिद्ध होत होतं.

विकास ची गाडी बिल्डिंग खाली येऊन थांबते.

कीर्ती " घर आलय विकास, घरी आईनी काही विचारलं तर काय सांगायचं. " कीर्ती विकास ला विचारते.

विकास काहीच बोलत नाही. ति पुन्हा त्याला विचारते.

कीर्ती " अरे मी काही तरी विचारलंय तुला. निदान हो नाही काही तरी बोल. " ति पुन्हा पुन्हा त्याला विचारते.

विकास " काय बोलु.! तुला विचारणार तु उत्तर दे !"

कीर्ती " मला विचारणार म्हणजे, अरे डॉक्टर कडे आपण दोघ गेलेलो ना. मग ! असं विचित्र बोलु नकोस. "

ति स्वतःच राग कंट्रोल करत म्हणते.


.... क्रमश....


🎭 Series Post

View all