Feb 26, 2024
नारीवादी

* हास्य खत्रा*

Read Later
* हास्य खत्रा*
हास्य खत्रा.

आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते.ते छान शिकवायचे.त्यांच्या तासाला कधी बोअरिंग व्हायचो नाही आम्ही.मला चांगले आठवते की ते चांगले फळा भरून लिहायचे.मग आम्हाला लिहायला लावायचे.आणि आमचे लिहून होईपर्यंत वर्गा मधून चकरा मारायचे.आम्ही त्यावेळी सातवी आठवीत असू कदाचित.

मधुरा तिच्या हातामध्ये नेहमी लेडीज रुमाल ठेवायची.सुंदर ,छोटा,छान रंग अन डिझाईन असलेला रुमाल...!!
सर रांगे मधून चकरा मारत असताना,त्यांना मधुराच्या हातामध्ये असणारा रुमाल दिसला की,सर जवळ येऊन उभे राहायचे.आणि लिखाणाचं चेक करता आहेत असं आम्हाला वाटतं असतानाच पटकन मधुराच्या हातातील रुमाल ओढून घ्यायचे.आणि स्वतःचा खडूने पांढरा झालेला हात रुमलाला चोळून चोळून पुसायचे.
मग मधुराने ," ओ सरsss"असा आवाज दिला की,हसायचे.
हसायचे का खीजवायचे माहित नाही.
त्यावेळी मधुराला राग फक्त ह्यासाठी यायचा की तिचा स्वच्छ रुमाल हे सर असून सुध्दा खराब का करून देतात.?
ही टिन एज ची अवस्था फार वाईट असते नाही का? काही कळत नाही.अन् काही बोलता आणि विचारता ही येत नाही.

सरांनी असे एक दोन वेळा वागल्यानंतर मधुरा शहाणी झाली.आणि रुमाल लपवून ठेवू लागली.
पण आता वाटतेय की,त्यावेळी सर तिचा रुमाल घेतायत यापेक्षा मधुराने बोलल्यानंतर सर हसतात याचाच आम्हाला भयंकर राग यायचा.

*****
त्याकाळात वय वर्ष आठरा ला गाड्यांचे लायसन्स मिळत नव्हते.जास्त करून तरुणाई पी.एम.टी. बस नेच प्रवास करायची.मग ठरलेल्या वेळेत आपण रोजच हजर असलो की,बस चे कंडक्टर वाहक चालक ओळखीचे होत जायचे.अन जाणीव पूर्वक रोजच्या प्रवाशांची ची नोंद ठेवायचे.
कॉलेजच्या वेळेची ची बस तर जवळ जवळ कॉलेजच्या तरुणाईने भरलेली असायची .जणू काय कॉलेज साठी कॉलेज बस ,असल्यासारखे वाटायचे.
घरी परतताना ही तोच प्रकार.परतीच्या वेळी आपला स्टॉप येई पर्यंत ईतर बस स्टॉप ला गर्दी कमी व्हायची.बस कंडक्टरला कोणाचा स्टॉप कोणता हे समजून जायचे.

ईशा ,"तिचा स्टॉप आला की.बसलेल्या सीट वरून उठून बाहेर उतरण्याच्या तयारीला लागली की,बसचा कंडक्टर बरोबर त्याच वेळेत ती उभ्या असलेल्या जागेपर्यंत यायचा.नेमके त्याच वेळेत रस्ता वरील ट्रॅफिक मध्ये काहीतरी कमी जास्त व्हायचे आणि आमची बस बऱ्यापैकी हेलकावे खायची.सगळ्यांनाच स्वतःचा बॅलन्स सांभाळावा लागायचा.

त्यासाठी ईशा ज्या दुसऱ्या सीटच्या रॉडला घट्ट पकडून उभी असायची ,नेमका असा क्षण यायचा की ,बस कंडक्टरला पण त्या बसच्या हेलकाव्या मध्ये तोल सांभाळण्यासाठी नेमका त्याच बसचा खांब पकडावा लागायचा.काहीतरी करून ,तरुण मुलींच्या हाताचा स्पर्श होईल असा तो प्रयत्न असायचा.आणि तसे झाले की मग " सॉरी हां" असं बोलायचा.आणि बोलताना बऱ्यापैकी हसायचं.
ईशा फक्त " ठीक आहे" अशा आविर्भावात नुसते बघायची....
पण आता वाटतेय की,ड्रायव्हर च्या मिलीभगतमध्ये हे बसचे हेलकावे घडवून आणायचा....याच्या रागासोबतच त्या नंतर तो सॉरी हां,म्हणताना हसणे....ह्या त्या विचकट हसण्याचा जास्त राग येत होता....

********
फायनल इअर च्या परीक्षा पास साठी फोटो लागतो.म्हणून आम्ही मैत्रिणी ,आमच्या मार्केट मधील फोटो शॉप मध्ये गेलो होतो.तेव्हा एका मागून एक फोटो काढून घेत असताना,फोटो ग्राफर नेहमीच्याच सूचना देत होता.परीक्षांच्या दिवसांमध्ये फोटो लागतच असतात. त्या मुळे त्यांचा सराव चांगलाच असतो.

शरयू , चा नंबर आला तशी ती पुढे सरसावली.आणि त्या स्टुल वर जाऊन बसली.
फोटो ग्राफर थोडा तिच्या जवळ आला,आणि...." आपण तुझा थोडासा तिरका फोटो काढू" असं म्हणाला.मग त्याचा एक हात त्याने शरयू च्या डोक्यावर अन दुसरा हाताने तिच्या हनुवटीला धरून ,थोडे उजव्या दिशेला ...थोडेसे डा व्या दिशेला किंचितसा तिचा चेहरा थोडा खाली अन् वर आडजस्ट करून, आता हलू नकोस हा अजिबात ." असं म्हणत हसत हसत कॅमेरा पर्यंत गेला....
झालं....काय झालं माहीत नाही पण टाळकचं फिरले शरयू च अचानक...फोटो ग्राफर तिच्या पासून कॅमेऱ्या पर्यंत जाऊ पर्यंत तिने पटकन हलली ,आणि त्याने दिलेली पोज बदलून सरळ समोर होऊन बसली. कॅमेऱ्याकडे गेल्या नंतर त्याने तिच्या कडे बघितलं,त्याला काय समजायचे ते समजले असेल.मग ती होती तसा फोटो त्याने पटकन काढून घेतला....
" आता हलू नकोस आजिबात ".... असे सांगताना तो का हसला...??? याचाच विचार तिच्या डोक्यात आला होता.आणि म्हणून त्याचेही ,ते हसणे, आम्हाला विचकट वाटले होते......

......स्त्रियांच्या आणि मुलींच्या आयुष्यात येणारे असे कितीतरी प्रसंग असतात.ज्या त्या फक्त स्वतःच फिल करत असतात अनुभवत असतात....
समोरच्या माणसांची एखादी कसलीही छोटीशी कृती एखादी विचित्र विकृती असते.....
लोकांना दिसत असणारी आणि साधीशी च कृती,त्या माणसांच्या मनातील विकृत भावनांना स्पष्ट पणे उघडकीस दिसू देत नाही......
पण अशी माणसे जेव्हा त्यांच्या मनातील विकृतीना लपवून निरागसपणे हसण्याचा आव आणतात ना.तेव्हा मुलींना त्यांची शिसारी येते.
प्रत्येक वेळा हसून जिरवणे म्हणा किवा ," हसणे म्हणजेच फसवणे" असते....
स्वतःचीच चूक लपवणे असते...
** त्यावेळी आपण त्यांचा चेहरा आणि त्या चेहऱ्या वरील खोटे हास्य बघत असतो....पण त्या हसण्यामागील खरा चेहरा ओळखता येणे ही फार आवश्यक आहे....!!!**हास्य खत्रा.

पण आता वाटतेय की,ड्रायव्हर च्या मिलीभगत(मराठी शब्द वापरा) मध्ये हे बसचे हेलकावे घडवून आणायचा....याच्या रागासोबतच त्या नंतर तो सॉरी हां,म्हणताना हसणे....ह्या त्या विचकट हसण्याचा जास्त राग येत होता....

** त्यावेळी आपण त्यांचा चेहरा आणि त्या चेहऱ्या वरील खोटे हास्य बघत असतो....पण त्या हसण्यामागील खरा चेहरा ओळखता येणे ही फार आवश्यक आहे....!!!**
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sush

Writer.Blogger.

Something Different

//