अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले
हरवलेले प्रेम नव्याने गवसले
दोघांचीही नजरानजर झाल्यापासून डॉक्टर आणि देवची आई अस्वस्थ झाले होते.
तेवढ्यात..
"डॉक्टर देवच्या उपचारासाठी किती खर्च लागेल साधारणपणे?" अंकुश
"डॉक्टर देवच्या उपचारासाठी किती खर्च लागेल साधारणपणे?" अंकुश
"फार नाही. तरी तीन चार हजार लागतीलच.
"ठीक आहे. मी देवच्या आईजवळ देऊन ठेवतो. आता मी जाऊ शकतो डॉक्टर."
"हो , तुम्ही पण काळजी घ्या. औषधे वेळेवर घ्या आणि काही गरज वाटली तर नक्की भेटा."
"हो डाॅक्टर."
असे म्हणून तो घाईघाईने निघून गेला.
थोड्या वेळाने डॉक्टर माधव देवच्या आईला भेटायला बोलावतात.
डॉक्टर माधव देवचा एक्सरे परत चेक करत असतात.
तेवढ्यात देवची आई आत येते.
तेवढ्यात देवची आई आत येते.
तो तिच्या कडे न बघताच या मिसेस... साॅरी आपलं नाव.
तो मान वर करून बघतो. तर एकमेकांची नजरानजर होताच रागिणी "तू "
"डॉक्टर, मी देवला घेऊन जाऊ का?"
"रागिणी कशी आहेस? तू इथे कशी ? तू तर ..
"थांब माधव, पुढे काहीच बोलायचे नाही. हा तुझा दवाखाना आहे. हे जर माहिती असते तर मी देवला इथे घेऊन आलीच नसती."
"रागिणी , तू अजुनही नाराज आहेस का माझ्यावर? आणि तू तुझा चेहरा का लपवते आहेस? काहीच बोलणार नाही का?"
"नाही, माझ्याकडे काहीच नाही. तुला सांगण्यासारखे."
"माधव प्लीज, नको आता तो विषय. मी आणि माझे नशीब सोडून दे विषय. आता बोलून काय फायदा?"
"पण, रागिणी. किती वर्षांनंतर तू आज मला भेटली आहेस."
"पण, रागिणी. किती वर्षांनंतर तू आज मला भेटली आहेस."
पण, रागिणी काहीही न बोलता निघून गेली. माधव मात्र अस्वस्थ झाला होता. संध्याकाळी तिच्या मुलाला सुट्टी झाली आणि ती देवला घेऊन निघाली.
रागिणीला बघीतल्यापासून माधव मात्र पुर्णपणे अस्वस्थ झाला होता. दोन तीन दिवसांनंतर त्याने देवच्या फाईल मधून तिचा पत्ता आणि फोन नंबर शोधून काढला. तिला फोन केला.
"हॅलो, रागिणी. प्लीज फोन नको ठेवूस. मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. प्लीज मला भेटशील का एकदा."
पण काहीही न बोलता तिने फोन ठेवून दिला.
माधवने परत फोन केला. "प्लीज रागिणी फोन ठेवून नकोस. अगं, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे ग."
"पण, मला नाही बोलायचे काहीच. मला माझे आयुष्य जगू दे ना. माझ्या आयुष्यात पुन्हा डोकावून नकोस ना."
"अगं, एकदा मला भेट. तुझ्या आयुष्यात काय घडले हेच जाणून घ्यायचे आहे मला."
"आई, कोणाचा फोन आहे?"
"डॉक्टर काकांचा."
"मला दे ना बोलायला."
रागिणी काही सांगेपर्यंत देवने रागिणीच्या हातातून फोन घेतला.
"हॅलो डॉक्टर काका, माझ्या तब्येतीची विचारपूस करत होता का? मी आता बरा आहे. फक्त पाय दुखत आहे थोडाथोडा. तुम्ही येता का आमच्या घरी. मेन रोड वरून सरळ आले की हनुमानाचे मंदिर आहे. त्याच्या समोर जी वस्ती आहे ना . तिथेच राहतो आम्ही."
"देव काय केलेस तू? पत्ता का सांगितला त्यांना?"
"अगं आई ते डॉक्टर काका खूप छान आहे. मला ते आवडले गं. "
\"पण, देव असं कोणालाही घरी बोलावतात का?"
"अगं आई, फोन तर बंद कर आधी."
इकडे माधवने रागिणीचे सगळे बोलणे ऐकले होते. चार पाच वर्षांचा विरह कोणालाच सहन होत नव्हता.
"आई, अशी कशी गं तू? मला बोलू पण दिले नाहीस."
"देव आता चुपचाप अभ्यास कर बघू. अजून आठवडाभर तरी शाळेत जाता येणार नाही तुला. त्यात परीक्षा जवळ आली आहे तुझी."रागिणी
माधव रागिणीकडे भेटायला जातो की नाही. बघुया पुढच्या भागात....
©®आश्विनी मिश्रीकोटकर