हरवलेल्या जगाची ओळख (महेश गायकवाड) भाग १

सारीकाने रागारागाने तिच्या न तिच्या ताई ची तुलना केली होती. त्यात तिचा गालही लाल झाला होता. त्यात तिने आरतीचा ही पण उतारा केला होता.

“ताईच ते प्रेम आणि माझ ते आकर्षण का??” सारिका तावातावाने बोलत होती.

“आता तु तिच्यासोबत तुझी बरोबरी करणार?? तुझी मोठी ताई आहे ती.” वेदिका तिची आई सारीकाला ओरडत होती.

“हा बरोबर आहे, आधी पासुन फक्त तिलाच जीव लावलात तुम्ही. माझ्याकडे कधी लक्ष दिलं??” कधी नव्हे ते आज सारीकाच्या तोंडाचा पट्टा चालु झाला होता. “तिच्या प्रत्येक निर्णयाला तिला पाठिंबा दिलात, तसा मला दिला कधी??” कधी कधी वाटतं न की मी तुमची मुलगीच नाहीये.”

दुसऱ्या क्षणाला सारीकाचा गाल लाल झाला होता. दामोदर राऊत तिचे वडील आले होते मागुन. त्यांनी सारीकाचे शेवटचे वाक्य ऐकले आणि त्यांचा रागाचा पारा चढला.
सारीकाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. ती तशीच गालावर हात ठेवतं तिच्या रुममध्ये जाऊन रडत बसली.

इकडे वेदिकाच्या डोळ्यांची वाटही अश्रूंनी भरली होती.

“सगळे तुमच्या लाडाचे परीणाम आहेत.” दामोदर रागात बोलत होते.

सारीकाच कॉलेज सुरू होऊन सात का आठच महिने झाले होते. सारीकाच आयुष्य सध्या तिच्या बॉयफ्रेंडच्या भोवतीच फिरत होत.

सारिका तशी अभ्यासात हुशार होती. डान्स तर ती अप्रतीम करायची. तिने डान्समध्येच करीयर करायच ठरवल होत. शाळेपासूनच डान्स च्या स्पर्धेच्या विविध ट्रॉफीच्या तिच्या रुममध्ये सजलेल्या होत्या.

पण जस कॉलेजच्या बाहेरच्या कट्ट्यावर त्याच्याशी तिची भेट झाली तेव्हापासून सारीकाची गाडी अभ्यासावरुन, तिच्या डान्स वरून घसरलेली होती. दरवेळेस पहिल्या तीन क्रमांकावर येणारी सारीका कॉलेजच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेत ती अगदीच काठावर पास झाली होती.

सारीकाची बालमैत्रीण वैशाली ने तिला खुप समजावीण्याचा प्रयत्न केला होता. पण ती ऐकायला मागत नव्हती. शेवटी नाईलाजास्तव तिने सगळा प्रकार सारिकाच्या आईच्या कानावर घातला होता. घरातल वातावरण बिघडत चालल होत. सारिका कोणाचचं ऐकायचा मनस्थितीत नव्हती.

काही दिवसांनी आरती राजन सोबत म्हणजे तिच्या नव-यासोबत माहेरी आलेली होती.

संध्याकाळची वेळ होती.

सध्यातरी तिला घरात झालेला प्रकार माहिती नव्हता. पण आरतीला काहीतरी बिनसले असल्याचं जाणवले. शेवटी त्या घरात ती लहानाची मोठी झाली होती. घरच्यांनी नाही, पण घरातल्या वस्तु आरतीला काहीतरी बिनसल्याची जाणीव करुन देत होत्या.

मग आरती सारीकाला भेटायला तिच्या रुममध्ये गेली. कारण ती घरात आल्यावर सारीका तिला भेटायला आली नाही अस कधीच झालं नव्हत.

“काय ग, सारे आज बाहेर नाही आलीस??” आरती नॉर्मल राहून बोलत होती. पण सारीकाने आरती कडे लक्षच दिल नाही. दोन तीन वेळा आवाज देऊनही सारीका काहीच बोलत नाही म्हटल्यावर आरतीच तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करु लागली. तस सारीकाने तिला जोरात झिडकारले.

“ही तुझ्या प्रेमाची नाटक न तुझ्याकडे ठेव, कळल न. फक्त नावाला दाखवायची काही गरज नाहीये. माहितीये मला तु पण फक्त देखावाच करतेच आई बाबांसारखा. मला नाही बोलायचे तुझ्याशी जा इथुन.” सारीका वाट्टेल ते बोलुन गेली होती आरतीला.

आरतीच तर डोकच फिरल होत. तिचे ते शब्द काट्यांपेक्षाही जास्त टोचले होते. ती सारीका कडे बघुन स्तब्ध झाली होती. राजन ही आला होता मागुन, त्याने दोघींच बोलण ऐकल होत. आरतीच्या डोळ्यांची धार तर कधीच सुरू झाली होती.

तस राजनने तिला बाहेर घेतल. तशी ती त्याच्या मिठीत शिरून रडायलाच लागली.

“काय समजते काय ही स्वतः ला, तोंडाला येईल ते बडबडायच का?? स्वतः च्या मनाप्रमाणे होत नाही तर.” वेदिकाही चिडून बोलल्या “थांब बघतेच तिच्याकडे.”

“थांबा आई, मी बोलतो” राजन “आता जर परत तिला ओरडलात तर कदाचित ती अजुन दुरावेल. थोड दमाने घ्याव लागेल.”

मग दोघींनीही त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.

“अरे वा, तु पण डायरी लिहीतेस??” राजन सारीका च्या खोलीत आला. सारीकाने मोठे वळुन पाहील.

“प्लिज जिजु, मला आत्ता तरी एकटीला सोडा” सारीका

“माझ्यावर पण रागावली आहेस??” राजन

तशी राजनची आणि तिची खुप चांगली गट्टी जमली होती. सारीकाने नकारार्थी मान हलवली.

“मग माझ्यासोबत तरी बोलायला काहीच प्रोब्लेम नसावा” राजन. तिने परत नकारार्थी मान हलवली.

“त्या दिवशी तुझ्या ताईच्या डायरी ला हात लावला तर एवढी चिडली होती माझ्यावर, बापरे” राजनने घाबरायची अॅक्टींग केली, “पण मग तुझ्या डायरी ला हात लावला तर तु काहीच बोलली नाहीस मला??”

“कारण माझा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना माझी लाईफ वाचायचा हक्क आहे” सारीका

“लहान असताना ब-याच उचापती केल्या तुम्ही बहिणींनी” राजन

तस सारीकाने त्याच्याकडे चमकून पाहील. राजनने तिच्या डायरीची पान उलटायला सुरवात केली.

“तु पाचवीला असताना, तुझ्या हातुन घरातला टिव्ही फुटला होता. तो तुझ्या ताईने तिच्या अंगावरच घेतला होता न?? हे काय, तु पण तिच्यासारखच लिहील आहेस.”
सारीका शांत बसुन रहाते.

“तु सहावीला असताना, तुझ्या हाताने चुकुन तिला चाकु लागला होता. तेव्हा पण तिने तुला पाठीशी घातले होत वाटतं.” राजन एक एक पान उचकटून वाचत होता. “हो हे काय, हे पण सेम”

सारीकाला आता वाईट वाटु लागल होत.

राजनने पुढची पान पलटली, “म्हणजे आरती खरचं दोन रात्री झोपली नव्हती, तु आजारी होती तेव्हा?? तिच्या डायरीत पण ते होत.”

सारीकाच्या डोळ्यातुन एक अश्रु ओघळला.

“ते कुठे आहे” राजन पान पटापट चाळून शोधु लागला “हा, तुला तुझ्या फेवरेट डान्स क्लास साठी फि भरायची होती, तेव्हा पैसे कमी पडत असताना तिने तिच्यासाठी केलेली सोन्याची चैन विकली होती.”

तोवर सारीका राजनच्या मिठीत शिरुन रडायला लागली होती.

“तुला माहितीये, ती तिच्या डायरी ला का हात लावून देत नाही??” राजनने तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला. “कारण तुझ्या झालेल्या चुका बाहेर कोणाला कळु नयेत म्हणून.”

“सॉरी न, जीजु” सारीका रडतच बोलु लागली. “खुप राग होता मनात. मग रागारागाने मी काय बोलली तेच मला कळल नाही.”

“मला का सॉरी बोलतोयस, तु मला थोडी भांडली.” राजन.

“ती चिडली असेल आता माझ्यावर, तुमच्या शिवाय कोणाच ऐकणार नाही ती” सारीका आता राजनला लाडीगोडी लावुन पहात होती.

“ना, तु बोलली आहेस न, आता तुच बोलायच” राजन तिच्या हाताला पकडून तिला आरती जवळ घेऊन गेला.

आरती खिडकीपाशी राहून अजुनही आसव गाळत होती.

“दी” सारीका

जसा सारीकाचा आवाज आला. तशी ती पटकन मागे वळली. भावनेच्या भरात तिच्याकडे जाणार होती. पण मग तिला सारीकाचे शब्द आठवले. मग ती परत सारीकाकडुन तोंड फिरवुन घेतल. सारीकाला आता मेल्याहुन मेल्यासारख झाल.

क्रमशः

🎭 Series Post

View all