रोजच्या प्रमाणेच प्रत्येक जण ठराविकपणे कामे करत होता. कोणाचं स्पंजिंग, तर कोणाचा नाश्ता, तर दुसरीकडे असिस्टंट डॉक्टरांचा राऊंड चालू होता. दवाखाना असुनही अगदी कसे शांत वातावरण होते.
तेवढ्यात दवाखान्याच्या दाराशी रिक्षा थांबली. त्यातून एक बाई, एक मुलगा आणि माणूस असे तिघेजण उतरले. त्या मुलाचा अपघात झाला होता आणि त्याला बरेच लागले होते.
तेवढ्यात दवाखान्याच्या दाराशी रिक्षा थांबली. त्यातून एक बाई, एक मुलगा आणि माणूस असे तिघेजण उतरले. त्या मुलाचा अपघात झाला होता आणि त्याला बरेच लागले होते.
"डॉक्टर, डॉक्टर" असे म्हणत ती ओरडू लागले.
तेवढ्यात एक सिस्टर बाहेर आली. त्याला पायाला बरेच लागले होते. त्यामुळे सिस्टरने लगेचच व्हील चेअरवर बसवून त्याला आत आणले.
तेवढ्यात असिस्टंट डॉक्टर आशीष आला.
"काय झाले याला? कुठे पडला हा?"
"अहो, डॉक्टर एका टूव्हीलर ने धक्का दिला आणि खाली पडला. त्याला बघा ना एकदा. किती रक्त चालले त्याचे."
ती स्त्री खूप घाबरली होती. पदराने डोळे पुसत होती.
"तुम्ही घाबरू नका. मी बघतो आधी." आशीष
डॉक्टर यांना पण बरेच लागले आहे. त्यांनाही बघा.
आशीषने दोघांनाही नीट तपासले.
"सिस्टर, या दोघांचेही ड्रेसिंग करा आणि टी.टी.चे इंजेक्शन द्या. सर आले की बघू ॲडमिट करायचे का? तशी गरज आहे की नाही. मुलाच्या पायाला बहुतेक फ्रँकचर वाटत आहे. याच्या पायाचा एक्सरे काढून घ्या. बाकी सर सांगतीलच."
"बाळा काय नाव तुझे?"
"माझं नाव देव आणि मी पहिलीत आहे बरं आणि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिकत आहे.
"अरे वा ! न विचारताच सगळं सांगितले तू"
"हो मला माहित आहे. सगळेजण आधी नाव विचारतात. मग वर्ग, शाळा... वगैरे वगैरे..."
आशीष गालातल्या गालात हसत होता.
तेवढ्यात डॉ. आले आणि सरळ केबिन मध्ये गेले. एक एक पेशंट तपासण्यासाठी बोलावणार होते. तेव्हाच आशीष ..
"मे आय कम इन सर?"
"यस कम इन."
"काही इमरजन्सी? "
"हो सर, एक दहा बारा वर्षांचा मुलगा आहे आणि त्याच्या सोबत एक व्यक्ती आहे. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तुम्ही एकदा चेक करता का?"
हो चल.
माधव आणि आशीष निघाले.
देवची आई त्यांच्या सोबत बसली होती आणि तो माणूसही.
डॉक्टरला बघताच ते उभे राहिले.
"डॉ. हा देव. याच्या पायाला आणि हाताला मार बसला आहे. हा त्याच्या पायाचा एक्सरे.\"आशीष
डॉक्टर माधव आणि देवची आई यांची नजरानजर झाली. अचानक ओळखीचा चेहरा समोर आल्यासारखा वाटला. पण , दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क होते. त्यामुळे फक्त डोळे दिसत होते. पण, त्या डोळ्यांत दाटलेले भाव मात्र तसेच होते.
"पण, माधवने स्वतः ला सावरले आणि देवला तपासले. त्याचे रिपोर्ट पाहिले आणि पायात थोडीशी हेअर क्रॅक आहे. तेव्हा प्लॅस्टर करावे लागेल. बाकी काळजीचे काम नाही."
"मी कधी बरा होईल डॉक्टर काका?"
लवकरच बरा होशील. वेळेवर औषधे घेतली की अजून लवकर बरा होशील आणि पळायला लागशील.
"सर, देवच्या उपचारासाठी किती खर्च येईल?" देवची आई
"ताई, तुम्ही काळजी करू नका. मी सगळा खर्च करायला तयार आहे."
"कोण तुम्ही?" माधव
"डॉक्टर, मी अंकुश. माझ्या टू व्हीलरचा धक्का देवला बसला आणि तो पडला. पण, माझी काही चुकी नव्हती. अचानक तो रोडवर धावत आला आणि नेमका माझ्या गाडी समोरच आला. अचानक तो समोर आल्यामुळे माझा बॅलन्स गेला. मी सुध्दा पडलो. मला सुध्दा बरेच खरचटले."
"ठीक आहे. काळजीचे काम नाही. मी दोघांनाही औषधे लिहून देतो आणि तुम्ही आठ दिवसांनंतर दाखवायला या. पण, देवला थोडा वेळ लागेल. कारण त्याचे बरेच रक्त गेलेले आहे. त्याला थोडा विकनेस आला आहे. तेव्हा आपण एक दिवस दवाखान्यात त्याला ठेऊ या. रात्री पर्यंत सुट्टी मिळून जाईल."
डॉक्टर माधव आणि देवची आई यांची नजरानजर झाली. ते डोळे ओळखीचे वाटत होते. त्यामुळे ते दोघेही अस्वस्थ झाले होते.
त्या दोघांची ओळख पटते का? पाहुया पुढच्या भागात....
©® आश्विनी मिश्रीकोटकर