हरवतं चाललेलं आयुष्य!

रोज जगताना आपण आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी हरवतं चाललो आहोत त्याबद्दल चा हा लेख!

       खरेतरं सुट्टीचा दिवस, हा कधीचं आराम करण्यासाठी नाही , तर नेहमीची ठेवणीतली किंवा ईतर काही शिल्लक कामे करण्यांत चं जातो नेहमी. आज ही सुटटीचा दिवस, दुपार झाली आणि काहीतरी शोधण्यासाठी म्हणून मी अडगळीची खोली आवरायला घेतली. अडगळीच्या खोलीतील कपाटं आवरताना अचानक हातामधून एक पिशवी खाली पडली आणि म्हणून मी ती पिशवी घेण्यासाठी खाली वाकले तेव्हा अचानक पिशवी मधून पडलेल्या त्या गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले, आणि एखाद्या लहान बाळाला जशी नवी एखादी खेळणी दिली की, त्याबद्दल उत्सुकता असते, अगदी तशांच उत्सुकतेने मी ती एक एक गोष्ट हाताळंत होते. त्या पिशवीमध्ये मला माझ्या लहानपणी च्या गोट्या, कोयरी, भातुकली अशा काही खेळण्या गवसल्या होत्या. त्या खेळण्यांनी मला काही काळ का होईना माझ्या जुन्या आठवणींमध्ये कैद केले. लहानपणी च्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या होत्या त्या प्रत्येक गोष्टींबरोबर. खरंच किती छान होते ना ते दिवस!!
         खरोखरं त्या आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळा दिल्यासारखे वाटंत होते. मी त्या आठवणींमध्ये  ईतकी गुंग झाली होते की, माझ्या शेजारी कधी माझी 12 वर्षांची मुलगी येऊन उभी राहिली हे मलादेखील कळले नाही. "आई हे कायं आहे?", या प्रश्नांनी मी भानावर आले आणि मगं तिला एक एक खेळणीबददल माहिती देतं होते, तशी ती हसतं हसतं म्हणाली मला, "आई तुझ्या या खेळणी पेक्षा तर मोबाईल मध्ये किती छान छान खेळ असतांत", असे म्हणून ती बाहेर गेली खरी पण तिच्या त्या वाक्यांनी मला मात्र विचारांत पाडले. खरचं ही आजकांल ची मुले, त्यांच्यासाठी मोबाईल फोन म्हणजे चं खेळणी झाली आहे, ते  क्रिकेट सारखे मैदानी खेळ वगैरे मोबाईल वर चं खेळतांत मगं गोट्या, लगोरी, भातुकली सारखे खेळ त्यांना माहितं असणे तसे अवघडं चं. खरोखरं किती बदलली आहे ना माझ्या सभोवतालच्या जगाची आणि किंबहुना माझी ही जीवनशैली. पूर्वी च्या त्या भातुकली, लगोरी ची जागा आता मोबाईल फोन ने घेतली आहे. आणि फक्त खेळणी चं नाही, पूर्वी च्या बर्‍यांचशा गोष्टी अलिकडे हरवतं चालल्या आहेतं. अगदी माझ्या स्वतःकडे बघताना किंवा माझ्या सभोवतालच्या व्यक्तींकडे बघताना ही मला या गोष्टींची जाणीव होते. पूर्वी ही स्वप्ने, एखादी गोष्ट करण्याची जिद्द असायची पण त्यामागे कोणी आपले आयुष्य विसरून धावत नसे. लोक स्वप्ने पूर्ण ही हकरायची आणि प्रत्येक गोष्टींचा आनंद ही घ्यायची. अलिकडे मात्र हे कुठे तरी ढासळताना दिसते. अलिकडे लोक फक्त स्वप्नांमागे धावताना दिसतांत, परंतु कूठेतरी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्यायला ते विसरतांत. खरंच या स्पर्धेच्या युगांत कुठेतरी तो आनंद, तो प्रत्येक क्षण जगण्याची कला कुठेतरी आयुष्यातून हरवतं चालली आहे. खर्‍या अर्थाने कुठेतरी आयुष्य हरवत चालले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..