हरवलेल्या जगाची ओळख (महेश गायकवाड) अंतीम भाग

राजनने त्याच्या पद्धतीने सलग प्रकरण हाताळत, सारीकाला परत त्यांच्यात तो देऊन आला होता.

मागील भागात. 

सारीकाचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही बघत मग सारंगच राजनच्या घराकडे आला. त्याने सरळ सरळ तिला धमकी देऊन भेटायला बोलावल होत. तशी सारीका कोणालाही न सांगता त्याला भेटायला गेली.

पहीले तर सारंगने प्रेमाने सारीकाला समजावून परत घेऊन जायचा प्रयत्न केला. पण मग तिला स्वतः ची ओळख नव्याने झाल्याने ती काही परत जायला तयार नव्हती. मग सारंग राग राग करायला सुरवात केली. शब्दाला शब्द वाढत गेले. रागात सारंग सारीका वर हात उचलणार तेवढ्यात त्याचा हात हवेतच पकडला गेला आणि सारंगचा गाल लाल झाला.

आता पुढे. 

सारीका तर शॉक झाली होती त्याचा तो अवतार बघुन.

सारंग तिकडे धडपडुन पडला होता. कारण तो एक आय पी एस ऑफीसरचा हात होता. राजन एक रेप्युटेड आय पी एस ऑफीसर होता.

“तिच्यावर हात उचलायची तुझी हिम्मत कशी झाली” राजन गरजला. तशी सारंगची उरली सुरली हिम्मत ही गळुन गेली.

“या पुढे हिच्या आजुबाजुला ही दिसला न, तर याद राख. चल निघ.” राजन

सारीका आता तर थर कापत होती. कारण ती काहीही न सांगता आलेली होती. राजनने तिचा हात पकडुन तिला घरी आणल.

“हे अस प्रेम आहे का त्याच, आणि त्या प्रेमावर तुला इतका विश्वास होता??” राजननही आज चिडून बोलत होता.

सारीका शांत बसली होती.

“तुला माहीतीये?? तुझ्या ताईने मला लग्नासाठी हो कधी बोलली??” राजन “जेव्हा तुझ्या ताईने आई बाबांना कनव्हीन्स केल तेव्हा. कनव्हीन्स केल तिने, त्यांच्यावर प्रेशर नाही टाकल. बाकीच्यांसाठी प्रेमाची व्याख्या काय आहे ते माहीत नाही. पण माझ्यासाठी प्रेम म्हणजे, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला सुखात बघणे. माझ सुख तुझ्या ताईच्या सुखात होत. आणि तिच सुख तुमच्या सुखात होत. तुम्हाला अंतर होणार नाही या मी दिलेल्या वचनावर ती लग्नासाठी तयार झाली होती.”

आरती पण आली होती तोवर बाहेरच्या रुममध्ये राजनचा आवाज ऐकुन. आता राजन त्याच्या रुममध्ये निघून गेला.

“फक्त नावाला नव्हतं दिल वचन त्यांनी मला, ते जीवही तितकाच लावतात तुम्हाला.” आरती “आज त्यांच लक्ष होत तुझ्यावर. तुला जर काही झाल असत तर ते स्वतः ला नसते माफ करु शकले ते.”

“पण तुच बोलली होतीस न, की प्रेम कधीच चुक नाही” सारीका

“हो, ते आज ही बोलेन. कारण आकर्षण आणि प्रेम यात चुक आपण करतो. चुकीच्या वेळी आणि चुकीच्या माणसासोबत झालेल प्रेम हे चुकीचे असते आणि तुझ हे वय नाहीये ते.” आरती काकुळतीला येऊन बोलत होती.

आत्तापर्यंत सारीकाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता. मग तिला क्लिक झाल की तिने तर आरतीला काहीच सांगीतल नव्हतं.

“म्हणजे तुला सगळ महिती होत??” सारीका बारीक आवाजात बोलली.

आरतीने होकारार्थी मान हलवली. “जा, आता तुझ्या लाडक्या जीजुंना मनव, चिडलेत तुझ्यावर”

सारीका आत गेली. “जीजु ऐका न पण”

राजनला माहीत होत की ती येणार आहे. त्याचा राग ही फक्त दिखाव्याचाच होता. त्यामुळे तो जरा भाव खात होता. त्याचा अंदाज सारीकाला ही आला होता. मग ती तिच्या मुळ रुपात अवतरली.

“आई SSSSSSSSS गं, लागल गं बाई” सारीका जोरात ओरडली.

तसा राजन तिला काय झाल म्हणून पटकन तिच्याजवळ आला.

“सारे, काय झाल, कुठे लागल??” तो तिला बघु लागला तिला इथे तिकडे.

मग सारीकाने तिच्या ह्रदयाला हात ठेवत फुल अॅक्शन मध्ये बोलली, “ईथे लागलय मला, माझे जीजु बोलत नव्हते म्हणून.”

तसा राजनने डोक्यालाच हात लावला. पण तिला तिच्या जुन्या अवतारात पाहुन त्याला हायस वाटलं.

“एक रिल माझ्याबरोबर” राजन

सारीका लगेच तयार झाली.

बराच वेळ झाला, हि दोघ बाहेर येत नाहीयेत. आरतीला वाटल की राजन अजुन भाव खातोय की काय. तिने त्यांच्या रुममध्ये डोकावल. तर जीजा साली मिळून रिल्सवर रिल्स बनवतं होते. एक मोठा आयपीएस ऑफीसर एका मुलीच्या तालावर नाचत होता. जो त्याचा कधीच प्रांत नव्हता. त्याने रिल्ससाठी विचारलेला प्रश्न आता त्यालाच भारी पडला होता.

“आरती, यार सांग न हिला. मला नाही जमत न” राजन काकुळतीला येऊन बोलला.

तस सारीकाने आरती कडे पाहील आणि तिलाही मध्ये घेतल. राजनने तिला मदतीसाठी बोलावले होते. पण आरतीच सारीका सोबत येऊन रिल्स साठी हळुहळु डान्स करु लागली. राजनने परत डोक्याला हात लावला. मग त्याला आयडीया सुचली. शेवटी आयपीएस ऑफीसर होता तो.

“ते झुरळ आहे काय??” राजन फक्त बोलला. तशा दोघी नाचता नाचता बेडवर चढुन ओरडायला लागल्या. तसा राजनने पटकन तिथुन पोबारा केला. त्याला  जाताना बघुन दोघांना कळल की त्याने नाटक केल होत.

सारीकाला तिच जग पुन्हा गवसल होत. तिचा डान्स परत सुरू झाला. पर्णिकाच्या कॉलेज साठी ही सारीकानेच डान्स बसवुन दिला होता आणि सगळी प्रॅक्टीसही तिनेच करुन गेली होती. अगदी प्रोफेशनल कोरीओग्राफरप्रमाणे. पर्णिकानेही मग तिच्या डान्सचा दुसरा क्रमांक आल्यावर तिने भर स्टेजवर सारीकला बोलावुन तिचा सत्कार करायला लावला होता. तशी तिथल्या परीक्षकांची इच्छा होती.

तशी तिच्या डान्सला पुढची दिशा भेटायला लागली होती. आरती तिच्या सातव्या महिन्यात तिच्या माहेरी आली. सारीकने आल्या आल्या तिच्या आई वडीलांना मिठी मारली. तस तिने फोनवर तिच्या आई वडीलांची माफी मागितलेली होती. तिला नॉर्मल बघुन तिच्या आई वडीलांना खुप हायस वाटलं.

मग सारीकाला वैशाली दिसली. तशी तीने पटकन तिच्या जवळ जाऊन तिलाही मिठी मारली. 

"सॉरी ग, उगाच तुला मी भांडत बसली. तु माझ्यासाठी बोलत होतीस खुप उशीरा कळलं" सारीकाचा आवाज जड झाला. 

"झाल केल ते सोड, आम्हाला आमची डि एन्जल भेटली. तेच खुप आहे आमच्यासाठी" वैशालीचे डोळेही पाणावले होते. 

त्यांनी हळुच राजनचे आभार मानले. शेवटी सगळ्याचा कर्ता करविता तोच होता न. त्याची आई तो लहान असतानाच देवाघरी गेली होती. तो अकरावीला असताना त्याचे बाबाही त्याला सोडुन गेले. त्यामुळे नात्यांची, माणसांची किंमत त्याला चांगलीच माहीती होती.

वरुन तिच त्या आंधळ्या प्रेमापोटी तिच एवढ सुंदर डान्सच जग ती सोडत होती. मग राजनने त्याच्या पद्धतीने सगळ नीट केल होत. आज सारीका एक नावाजलेली कोरिओग्राफर व्हायच्या मार्गावर होती. आरती देखील फॅशन डिझायनिंगमध्ये तिच नाव टिकवून होती.

समाप्त.


🎭 Series Post

View all