हरवलेल्या जगाची ओळख (महेश गायकवाड) भाग ३

बरेच दिवस झाले सारीकाचा काहीच संपर्क नाही बघून त्याने राजनच्या गराजवळच जाणून तिला देत तिला भेटायला बोलावल होत. ती एकत नाही बघुन त्याने सारीका वर हात उचलायची प्रयत्न ही केला होता.

मागील भागात. 

“दि कसल अभिनंदन ग??” सारीकाने हळुच आरतीला विचारल.

“मागे नाही का, फॅशन शो मध्ये माझे काही डिझाइन केलेले ड्रेस मी प्रेझेंट केले होते. ते सिलेक्ट झालेत. नॅशनल लेव्हल कॉम्पीटीशनसाठी” आरतीच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडुन वाहात होता. शेवटी तिच्या आवडीच्या क्षेत्रात ती एक एक पाऊल पुढे टाकत होती.

“सगळी कृपा आपल्या जीजुंची हं” आरतीचा मित्र “त्यांनीच तीला पुढे जायला सपोर्ट केला, नाहीतर मॅडम तयारच नव्हत्या.”

सारीका तिच्या राजन जीजुंकडे बघतच राहीली.

आता पुढे

एकीकडे सारंग ज्याने तिच्या स्वप्नाला सोडायला सांगीतल आणि एक जीजु ज्यांनी दि ला तिच्या स्वप्नासाठी सपोर्ट केला. सारीकाच्या मनात द्वंद्व सुरू झाल होत.

पुर्ण दिवस ती घरातल्या कामात असल्याने तिला सध्या सारंगचा फोन घ्यायला पण वेळ भेटत नव्हता.

जेवण बनवायच्या वेळेस आरतीचा सगळाच ग्रुप किचनमध्ये प्रगटला. सगळेच मदत करत होते. तिथे ना कोणी लेडीज ना जेन्टस. ते सध्या फक्त मित्र होते. जे आरतीला आणि सारीकाला लोड पडु नये म्हणून त्या दोघींना मदत करत होते.

तिला सारंग च्या घरच आठवल, तिथे घरातल्या सगळ्या कामाचा लोड फक्त स्रियांवरच होता. ति नवीनच होती म्हणून सारंगने तिला काहीच सांगीतल नव्हत. पण त्याच्या मोठ्या भावाच्या बायकोच्या चेहऱ्यावर तिला ते जाणवल होत. तेव्हा तिने त्याकडे दुर्लक्ष केल होत.

आरतीच्या ग्रुपला पाहुन सारीकाला वैशालीची खुप आठवण यायला लागली होती. तिच्या डोक्यात आसव जमा झाली होती. पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. तिच्याकडे जाणारा मार्ग तिनेच बंद केलेला होता.

ती परत कामाच्या मागे लागली. रात्री तिने सारंग ला फोन लावला होता. तसा तो तिच्यावर खेकसला, “कुठे आहेस तु, आणि मला न सांगता का गेलीस?? जाताना माझा विचार केलास??”

“अरे हो, दि कडे गुड न्यूज आहे. मी मावशी होणार.” तिने आनंदाने सांगीतल.

“तिच्याकडे गुड न्यूज आहे न, मग तु का गेलीस?? मला माहीत नाही उद्याच्या उद्या ये.”

“काय बोलतोयस तुला तरी कळते का?? सध्या दि ला माझी गरज आहे. माझ्या गरजेला तीने कधी मला सोडले नाही. मग मी कस काय सोडु? नाही, मी नाही सोडु शकत तिला.” सारीकाने बोलुन त्याच्या उत्तराची वाट न पहाता फोन ठेवुन दिला होता.

त्याला दि ची काळजी नाही, हे बघुन सारीकाला शॉक बसला. तिला तिचे राजन जीजु आठवले. मी दि ला भांडली तर किती प्रेमाने मला समजावल होत.

जेवण आटपून आरतीचा ग्रुप त्या दोघींचा निरोप घेऊन निघुन गेला.

संध्याकाळी राजन घरी आल्यावर आरतीने त्याला ती गुड न्यूज सांगीतली. त्याला पण कोण आनंद झाला. पण आरतीला आता प्रश्न पडला होता. कारण ती आता तर काही तिचे ड्रेस प्रेझेंट करु शकणार नव्हती अशा अवस्थेत. राजन तर ते पण तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्न वाचुन गेला होता.

“कशाला काळजी करतेस, आपली सारीका आहे न. तुला माहितीये ना डिझायनर ड्रेस तिला किती सुट करतात.” राजन

आरतीने आशेने सारीका कडे पाहील.

“नको टेन्शन घेऊन ताई, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे” सारीकाने तिला आश्वस्त केल होत. रात्री ची जेवण आटपून ते झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच दोन तीन मुली घरी येऊन धडकल्या. सारीकाने दार उघडल. तिने तर ओळखल नाही. पण त्या मुलीने तिला बारीक डोळे करुन पाहील. तशी तिची कली खुलली.

“तु इन्स्टा वरची डी एन्जल आहेस न??” ती

“हो” सारीकाने बरेच दिवस झाले तिच इन्स्टा अकाऊंट पाहीलच नव्हतं. तिचे कॉलेज पासुनच खुप फॉलोअर्स होते. तिचा डान्स होताच तेवढा सुंदर.

तरी ती उड्याच मारायला लागली. ती डायरेक्ट आतमध्ये आली.

“दादा ही कस काय आपल्याकडे??” ती

“अग माझी साली साहेबा आहे ती” राजन “आणि ही माझी लिटील प्रिन्सेस, लहान बहीण पर्णिका. लहान काकांची मुलगी. पुण्याला असते.” तिला काही लग्नाला यायला जमल नव्हतं. सारीकाला तिची ओळख करून दिली. 

“काय खरचं??” पर्णिका. “पण मग तुझी ही स्टाईल नाहीये?? असे काय कपडे घातले आहेस तु.”

“बघ न.” आरती “जा बर, तिला आत घेऊन जा. तो मी डिझाईन केलेला ड्रेस दोघी ट्राय करा.”

आरतीने हुकुम सोडला. तशा दोघी आत गेल्या. तो ड्रेस ट्राय करुन जेव्हा सारीकाने स्वतःला आरशात पाहील. तिला आधीची सारीका दिसली. आताची सारीका आणि आधीची सारीका खुप फरक जाणवला तिला. प्रेमाच्या गोड गोड शब्दात ति स्वतःलाच विसरुन गेलेली होती.

ब-याच दिवसांनी ति आधी सारखी तयार झालेली होती.

“चल आज कोलॅब करु” पर्णिका. तिने जबरदस्तीने तिला रिल बनवायला घेतली. दोघींची मस्त अशी रिल तयार झाली होती. इन्स्टा वर सारीकाला टॅग करुन ती अपलोड पण करुन दिली. ब-याच दिवसांनी सारीकाचा व्हिडिओ आल्यामुळे तो जरा जास्तच व्हायरल झाला.

तिकडे सारंगचा रागात तिळपापड झाला. त्याला तिच आयुष्य फक्त त्याच्याभोवतीच ठेवायच होत. तो परत परत रागारागाने फोन लावुन तिला भेटायला बोलावत होता.

पण हरवलेल्या सारीकाला ती परत भेटली होती. दोघी बाहेर आल्या तयार होवुन.

आरती आणि राजनने तर डायरेक्ट शिट्टीच मारली दोघींना बघुन. तशा दोघी लाजल्या. त्या दिवसापासून सारीकाला तिची पूर्वीची ओळख करुन द्यायची सुरवात झाली. सारीकाला ही जाणवायला लागल की ती काय हरवत चालली होती.

सारीकाचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही बघत मग सारंगच राजनच्या घराकडे आला. त्याने सरळ सरळ तिला धमकी देऊन भेटायला बोलावल होत. तशी सारीका कोणालाही न सांगता त्याला भेटायला गेली.

पहीले तर सारंगने प्रेमाने सारीकाला समजावून परत घेऊन जायचा प्रयत्न केला. पण मग तिला स्वतः ची ओळख नव्याने झाल्याने ती काही परत जायला तयार नव्हती. मग सारंग राग राग करायला सुरवात केली. शब्दाला शब्द वाढत गेले. रागात सारंग सारीका वर हात उचलणार तेवढ्यात त्याचा हात हवेतच पकडला गेला आणि सारंगचा गाल लाल झाला.

क्रमशः

🎭 Series Post

View all