हरवलेल्या जगाची ओळख (महेश गायकवाड) भाग २

आरतीच्या घरात तिला मिळणार फ्रेंच वातावरण बघुन आता सारीका तिच्या सारंग बद्दल दुसऱ्या बाजूने विचार करायला लागली होती.

मागील भागात. 

आरती खिडकीपाशी राहून अजुनही आसव गाळत होती.

“दी” सारीका

जसा सारीकाचा आवाज आला. तशी ती पटकन मागे वळली. भावनेच्या भरात तिच्याकडे जाणार होती. पण मग तिला सारीकाचे शब्द आठवले. मग ती परत सारीकाकडुन तोंड फिरवुन घेतल. सारीकाला आता मेल्याहुन मेल्यासारख झाल.

आता पुढे. 

आरतीला तिच्या पायाला काहीतरी स्पर्श झाल्यासारखं वाटल. तिने खाली बघीतल तर सारीकाने तिचे पाय धरले होते.

“अग, वेडी आहेस का?? काहीही काय करते” तिने सारीकाला मिठीत घेतल.

“सॉरी न दी” सारीका “माझ्या मनात नव्हतं तस कधी, पण रागरागात काय बोलुन गेली मला नाही कळलं ग. खुप खुप मोठ्ठावाला सॉरी.”

“पण मी तुला अशीच सोडणार नाहीये” आरती तिचे डोळे पुसत बोलली. सारीकाने परत तोंड बारीक केल.

“पुढचे चार महिने तुला आमच्याकडे याव लागेल. घरातली सगळी काम करावी लागतील. मान्य असेल तरच माफ करेल.” आरती

सारीका गोंधळली ती ही अशी का बोलतेय म्हणुन. पण मग ती तिच्या ताईसाठी काहीही करायला तयार असायची, मग तीने हो म्हटलं.

मग ते तिघ हसतच हॉलमध्ये आले. सारीकाचा तिच्या ताई वरचा राग जरी गेला असला, तरी तिच्या आई वडीलांवरचा होताच.

“तिकडे जाते आहेस तर ताईला जास्त त्रास देऊ नकोस “ वेदीका “अशा अवस्थेत तिला फक्त आराम करू देत”

“अशा अवस्थेत म्हणजे??” सारीका गोंधळली.

“म्हणजे यांनी तुला सांगीतल नाही वाटतं” दामोदर

सारीकाने आरती आणि राजनकडे पाहील. कोण काहीच बोलत नाही बघुन मग वेदिका बोलल्या, “अग प्रमोशन झाल तुझ. तु मावशी होणार आहेस.”

पहीले तर सारीकाला विश्वासच बसला नाही. नंतर भानावर येत तिने उड्याच मारायला सुरवात केली. खरं तर आरती तीच न्युज सांगायला सारीका जवळ आलेली होती. पण मग सारीकाच बोलण ऐकुन तिला तेव्हा नव्हत सांगीतल.

दुसऱ्या दिवशी सारखा तिच्या दी आणि जिजुंसोबत निघुन गेली.

निघण्याआधी वेदिका आरतीला भेटली होती. कारण सारीका तर त्यांच्याशी न बोलताच राजनच्या गाडीत आधीच जावुन बसली होती. तिचा जायचा उद्देश हा पण होता की तिला त्याच्याशी बोलता येणार होते.

“सगळ नीट होईल न, खुप काळजी वाटते ग तिची” वेदिका.

“नको काळजी करू ग, आम्ही आहोत न” आरती “काढु काहीतरी मार्ग.”

मग ते तिघेही त्यांच्या घरी निघुन गेले जाताना मुलगी काहीच बोलली नाही, याच दुख मात्र टोचत राहील होत वेदिकाला.

इकडे सारी कामे मात्र आनंदाची आली होती. ति तिच्या दि ची खूप मनापासुन काळजी घेत होती.

तीन दिवसांनी राजनने सारीकाला कोणाशीतरी बोलताना बघीतल. तसा सारीकाने पटकन फोन ठेवला.

“ओहो, क्या गुलुगुलु चल रहा है??” राजनने वेगळ्या पद्धतीने घ्यायच ठरवल होत.

तशी सारीका लाजली.

“तुम्ही चिडणार नसाल तर सांगते” सारीका राजनचा अंदाज घेत बोलली.

“तुच बोललीस न, युर जीजु ईज युर बेस्ट फ्रेंड, मग मी कशाला चिडु, बिनधास्त बोल.” राजन

“बघा हं, दी ला पण नाही सांगायच” सारीका. राजनने मान डोलावली.

“सारंग नाव आहे त्याच, कॉलेजच्या कट्ट्यावर भेटला होता. माझा डान्स बघुन तो माझा फॅन झाला. खुप प्रेम करतो माझ्यावर” मग सारीकाच सारंग पुराण सुरू झाल होत. राजनला कळुन चुकलं होत की त्याच्या चांगुलपणाची चांगलीच पट्टी तिच्या डोळ्यावर बांधलेली होती.

“अरे हो, तुझ्या डान्सचा व्हिडिओ आजकाल येत नाही तुझ्या इन्स्टा अकाऊंटला. जाम मिस करतोय ते” राजनने सारंग पुराण ऐकुन कंटाळा आला होता.

“त्याला आवडत नाही न” सारीका बोलुन गेली.

“म्हणजे ज्या गोष्टीवरून भाळला तिच गोष्ट करू देत नाही?”” राजनने विचारपुर्वक प्रश्न टाकला होता, जो एकदम बरोबर बसला होता. सारिका विचारात पडली होती. कारण त्याने त्याच्या गोड गोड बोलण्याने तिला तिचा डान्स बंद करायला लावला होता.

“तस नाही. तो म्हणे, कशाला उगाच?? मी असताना तुला त्रास” सारीका जरी बोलुन गेली होती तरी तिच्या मनात तो प्रश्न पेरला गेलेला होता.

दुसऱ्या दिवशी आरतीचे सगळे मित्र मैत्रीणी आले होते.

“खुप खप अभिनंदन तुझ” आरतीची मैत्रीण.

आरतीच्या सगळ्याच ग्रुपने तिच अभिनंदन केल होत. ज्यात तिच्या दि चे मित्र पण होते. त्यांनी पण आरतीला साईडने हलकेच मिठीत घेत तिच अभिनंदन केल होत. त्यांची ती मस्ती पाहून सारीकाला तिच्या मैत्रीणीची वैशालीची प्रचंड आठवण आली. पण ती आता तिच्याशी बोलत पण नव्हती. कारण भांडणही सारीकानेच केल होत, सारंगच्या सांगण्यावरुन.

‘दि कित्ती फ्रि आहे तिच्या लाईफ मध्ये' सारीका मनातच विचार करत होती. ‘त्या दिवशी फक्त मी माझ्या वर्गातल्या मुलासोबत बोलली. तेव्हा सारंग किती भांडला होता मला.’

सारीकाला आता सारंगची दुसरी बाजू दिसायला लागली होती. जी त्याने त्याच्या गोड बोलण्याने झाकुन टाकलेली होती.

“सारे, कुठे हरवलीस” आरतीने तिला भानावर आणल. “अग चहा पाण्याच बघ. बाकी जेवणासाठी सगळे असतीलच मदतीला.”

तशी सारीका विचारातच किचनमध्ये गेली. सगळयांचा व्यवस्थीत चहा पाणी केल.

“दि कसल अभिनंदन ग??” सारीकाने हळुच आरतीला विचारल.

“मागे नाही का, फॅशन शो मध्ये माझे काही डिझाइन केलेले ड्रेस मी प्रेझेंट केले होते. ते सिलेक्ट झालेत. नॅशनल लेव्हल कॉम्पीटीशनसाठी” आरतीच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडुन वाहात होता. शेवटी तिच्या आवडीच्या क्षेत्रात ती एक एक पाऊल पुढे टाकत होती.

“सगळी कृपा आपल्या जीजुंची हं” आरतीचा मित्र “त्यांनीच तीला पुढे जायला सपोर्ट केला, नाहीतर मॅडम तयारच नव्हत्या.”

सारीका तिच्या राजन जीजुंकडे बघतच राहीली. 

क्रमशः

🎭 Series Post

View all