माधव बऱ्यापैकी सावरला होता. खूप मोठं दुःख उराशी बाळगून तो काहीही न घडल्यासारखा वागत होता. नवीन दवाखान्याच्या तयारीत माधवने स्वतः झोकून दिले. आयुष्य जगण्याची एक नवी उमेद घेऊन तो एक एक पाऊल पुढे टाकत होता.
तीन वर्षांतच त्याने एक छान दवाखाना उभारला. एकीकडे प्रेमाचा विरह होता. तर दुसरीकडे आता कामावर फोकस करणे आवश्यक होते. कधी ना कधी रागिणी आपल्याला नक्कीच भेटेल. ही आशा कायम मनाशी धरून होता.
"एके दिवशी , माधव माधव अरे हे फोटो बघून घे. तुला जी मुलगी पसंत येईल. तिला आपण बघायला जाऊ." उल्काताई
"आई, मी तुला कितीदा सांगितले की मला लग्न करायचे नाही म्हणून."
"पण, माधव किती दिवस तू रागिणीच्या आठवणीत राहशील. अरे, आयुष्यात कोणाच्या तरी आधाराची गरज असते. आमचं काय आज आहोत, उद्या नाही. तुझ्यासाठी योग्य साथीदाराचीच निवड करू आपण."
माधव काहीही न बोलता निघून गेला.
"अहो, कसे व्हायचे माधवचे? लग्नाचा विषय काढला की प्रत्येक वेळी टाळतो तो?"
"अगं उल्का , होईल सगळं नीट. योग्य वेळ आली की तोच तयार होईल. तू काळजी करू नकोस."
पण, हा विषय इतक्या सहजपणे संपणारा नव्हता. कारण, त्याला नेहमी वाटायचे की रागिणी सुध्दा सुखात नसणारच.
सत्य परिस्थितीही तशीच होती.
रागिणीचा नवरा सतत दारू ढोसायचा. त्यात त्याचे वयही जास्त. त्यामुळे आता दारूच्या सेवनाने एक दीड वर्षातच हे जग सोडून गेला. सुखाची बरसात तर झालीच नाही. पण, आता तर तिच्यावर मोठं आभाळ कोसळले होते.
याचा परिणाम भोगण्यासाठी तिच्या सासुबाईंनी तिला आपल्या मुलाच्या मृत्यूला रागिणीला कारणीभूत ठरवले आणि महिना भराच्या आतच घराच्या बाहेर काढले. पण, देव तिला सोडून राहायला तयार नव्हता. त्याला फक्त त्याची आई रागिणी हवी होती. त्यामुळे सगळ्यांचा विरोध पत्करून तिने देवला सोबत घेतलेच.
"रागिणी घरातून बाहेर पडली. पण जाणार कुठे?"
तिने एकाजणाच्या मोबाईलवरून मामाला फोन लावला. मग मामा घरी कोणालाही न सांगता तिला भेटायला गेला. मामा तिला घेऊन घरी न जाता एका मित्राकडे घेऊन गेला. काही दिवस त्याच्याकडे तिची राहण्याची सोय करून दिली. एक खोली भाड्याने घेऊन दिली. तिला एका कारखान्यात काम मिळवून दिले.
हळुहळु ती स्थिर स्थावर होऊ लागली. देवही आता मोठा होऊ लागला. तिने तिथल्याच एका जिल्हा परिषद शाळेत त्याला टाकले. देव फारच हुशार आणि आचपळ होता.
"त्या दिवशी खेळत खेळत तो रोडवर गेला आणि एका व्यक्तीच्या टू व्हीलरचा देवला धक्का बसला आणि त्याला तुझ्याच दवाखान्यात आणले गेले."
"तुझ्या जीवनात एवढं सगळं घडून गेलं. किती सोसलं आहे रागिणी तू? तू तुझ्या गालावर पडलेल्या डागामुळे माझ्या समोर येऊ शकत नव्हती. शिवाय मामीच्या त्रासाला तू वैतागली होती. पण, आता नाही! मी आता तुला कसलाही त्रास होणार नाही. मी तुझी गेली चार वर्ष वाट बघत होतो. त्याच सार्थक झालं म्हणायचं." माधव
"म्हणजे तू लग्न.."
"छे! ... मी आणि लग्न.... इतके वर्ष मी तुझीच वाट बघत होते. अगं, मी प्रेम केलं आहे तुझ्यावर. खरं प्रेम. प्रेम फक्त एकदाच होतं." माधव
"पण, माधव मी तुझ्यासाठी कसल्याच दृष्टीने तुझ्यासाठी योग्य नाही. तुला माझ्यापेक्षाही चांगली, सुंदर मुलगी भेटेल ना! शिवाय तुझे आई वडील मला नाही स्वीकारणार?"
"रागिणी,असं का बोलतेस?"
माधव ,तू माझ्या गालावरचा डाग अजून बघीतलाच नाही. तो पाहिल्यावर तू स्वतः च मला नाकारशील. माझ्यामुळे तुला समाजात वावरताना फार त्रास होईल
परत माझा मुलगा. नको माधव नको. आपलं प्रेम फक्त मनात राहू दे. इतकं सुंदर आयुष्य आहे तुझं. ते तू आनंदाने जग. माझ्यामुळे उगाचच.."
परत माझा मुलगा. नको माधव नको. आपलं प्रेम फक्त मनात राहू दे. इतकं सुंदर आयुष्य आहे तुझं. ते तू आनंदाने जग. माझ्यामुळे उगाचच.."
"थांब रागिणी, तू स्वतःला का दोष देत आहे. अगं, मला जर लग्नच करायचं असतं तर ते केव्हाच केलं असतं. पण, मला खात्री होती. एक ना एक दिवस तू मला नक्की भेटशील म्हणून. हीच माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली का तू?"
त्याने पटकन तिच्या नकळत गालावरचा रूमाल बाजुला केला. ते पाहून तोही क्षणभर दुखावला. "बापरे! किती भयानक आहे हे सगळं."
"पण, रागिणी तू काळजी करू नकोस. माझा एक मित्र स्कीन स्पेशालिस्ट आहे. त्याचे मार्गदर्शन घेऊन तसे उपचार सुरू करू."
"पण..."
"प्लीज रागिणी.. नाही म्हणू नकोस."
त्यांचा भुतकाळ भराभर डोळ्यांसमोरून गेला. किती वेळ झाला कळलेच नाही. तेवढ्यात , माधवच्या फोनची घंटी वाजली.
"हॅलो, डॉक्टर काका. आई आली आहे का तिथे? माझी औषध घेण्यासाठी जाते म्हणे आणि अजून पर्यंत परत आली नाही."
"हो, रे बाळा तुझी आई आली आहे. तिला लगेच पाठवतो."
" माधव मला निघायला हवं."
"रागिणी आज संध्याकाळी माझ्या आई बाबांना घेऊन तुझ्या घरी येतो आणि तुझी आणि देवची भेट करून देतो. तेव्हा तयार रहा. आपल्या प्रेमाचा विरह आता दूर होणार. तू आणि मी पुन्हा कायमचे एकत्र होणार."
"पण, माधव. त्यांना माझं हे रुप बघवणार नाही रे."
त्याची तू काळजी करू नकोस. मी बघतो ते.
ठरल्याप्रमाणे माधव त्याच्या आई बाबांना घेऊन रागिणीकडे जातात.
"रागिणी, माधवने आम्हांला सर्व काही सांगितले आहे. तुझ्यासोबत जे काही घडले. त्याचे फार वाईट वाटत आहे. पण, आता काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत." उल्काताई बोलत होत्या.
"पण, काकू. मला असं वाटतं की माधवने त्याचा निर्णय बदलावा."
"पण, काकू. मला असं वाटतं की माधवने त्याचा निर्णय बदलावा."
"तू असा विचार का करतेस? अगं , आम्हांला काहीच अडचण नाही. तर तू कोणत्या समाजाचा विचार करतेस? जिथे फक्त अपमान ,सुड आणि द्वेष आहे
तुझ्याविषयी. आपण आठ दिवसांतच तुमच्या लग्नाची तारीख काढू या."
तुझ्याविषयी. आपण आठ दिवसांतच तुमच्या लग्नाची तारीख काढू या."
उल्काताईंचे हे बोलणे ऐकून माधव आणि रागिणी खूप आनंदी झाले. रागिणी आणि माधवने पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.
माधव आणि रागिणी यांचे हरवलेले प्रेम नव्याने गवसले होते. दोघेही मिळून एका नव्या आयुष्याची स्वप्ने पाहू लागले.
©®आश्विनी मिश्रीकोटकर