हरवलेले प्रेम नव्याने गवसले भाग १२

कथामालिका


भाग१२

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले...

माधव रागिणीला भेटण्यासाठी खूप आतुर झाला होता. त्यामुळे तो घाईघाईने निघून जातो.

पाहुया पुढे....

तो पहिल्यांदाच रागिणीच्या घरी आला होता.

"रागिणी , रागिणी."

"कोण आलं आता परत कडमडायला?"

मामी दार उघडते. तर समोर माधव उभा असतो.

"कोण तुम्ही?" मामी

"नमस्कार, मी माधव परांजपे. रागिणीचा खास मित्र. बरेच दिवस झाले. रागिणीचा फोन नाही. कुठे आहे ती? "

माधवला बघताच कांचन बाहेर आली.

"अय्या तुम्ही! या ना आत या."

"रागिणी दिसत नाही. ती कुठे गेली आहे का?"

"ती बाहेर गेली आहे."मामी

"तिचं लग्न झालं आहे." कांचन

दोघांच्याही तोंडातून वेगवेगळे वाक्य आले.

"म्हणजे? कोण खरं बोलत आहे.?"

त्याच्या घशाला कोरड पडली होती.

"रागिणीचे लग्न झाले! कधी आणि कोणासोबत?"

"नाही नाही. ते म्हणजे.."

"अहो, मामी खरं सांगा ना प्लीज."

माधव आता हायपर झाला होता. रागिणीचे आणि लग्न तेही दुसऱ्या कोणत्या तरी मुलासोबत. हे कसं शक्य आहे.

"हो तिने फार घाईने निर्णय घेतला‌." मामी

"अहो, काय सांगता तुम्ही? ती मला सोडून, माझ्या प्रेमावर अविश्वास ‌दाखवून स्वतः मात्र लग्न करून मजा मारत आहे."

"हो हे बघा फोटो."

कांचनने तिच्या लग्नाचे फोटो दाखवले.

एक एक फोटो पाहतांना तो क्रोधित होत होता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

"एवढा मोठ्ठा धोका.‌ रागिणी तू असं कसं करू शकते? आपल्या प्रेमाची हीच परीक्षा घेतली तू? "

त्याने हातातले फोटो फेकले आणि तेथून निघून गेला.

"रागिणी कुठे राहते काही पत्ता कळेल का मला?"

हे बघा, मिस्टर. तिचं आता लग्न झाले आहे आणि असं एका परपुरुषाने तिच्या घरी जाणे योग्य नाही.‌ तिचा संसार मोडल अशाने."

तुम्हांला एकदा सांगितलेले कळत नाही का? आम्ही तिचा पत्ता तुम्हांला का द्यायचा. तुम्ही तिच्या संसारात ढवळाढवळ करू नका. तेव्हा या आता."

मामीचे शब्द त्याच्या हृदयाला घाव घालत होते. तो तडक निघून गेला.

"तिने लग्न का केले? तिने माझी वाट का पाहिली नाही?"

असंख्य प्रश्न डोक्यात घोळत होते. त्यामुळे तो घरी गेलाच नाही. रागिणी आणि तो ज्या कॅफेत भेटत होते. तिथे तो गेला. कितीतरी घंटे तो तिथेच बसून होता. एकटाच, स्वतः च्या प्रेमाची परीक्षा घेत होता. डोळ्यांत दाटलेले अश्रू अनावर झाल्याने तो अपसेट झाला होता.

त्याचा मोबाईल सारखा वाजत होता. पण, तो फोन उचलण्याच्या मन: स्थितीत नव्हता. कॅफे बंद व्हायची वेळ आली तरीही तो घरी जायला तयार नव्हता. अनेकदा रिंग आल्यामुळे शेवटी तेथील मालकाने त्याचा फोन उचलला. तर त्याच्या आई बाबांचे बरेच मिसकाॅल येऊन गेले. त्यामुळे त्यांना माधवचा पत्ता कळला. उल्काताई आणि विनायकराव ताबडतोब तिथे पोहोचले आणि त्या मालकाचे धन्यवाद मानून माधवला घरी घेऊन गेले. त्याला व्यवस्थित झोपी घातले.

दुसऱ्या दिवशी सकाळी माधव फारच उदास झाला होता. डोळ्यांत नाराजी दिसत होती. माधवने आई बाबांना सगळं सांगितलं. तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

"आई, मी काय करू आता? माझं प्रेम इतकं कमकुवत होते की ती माझी वाट सुध्दा बघू शकली नाही. लग्नाची इतकी घाई का केली‌ तिने? "

"हे बघ माधव, शांत हो. आपल्याला माहीत नाही. तिने असे का केले ते? पण, आता ती परत येणार नाही. तिला तिचे आयुष्य जगू दे."

"पण, आई मी तिला इतक्या सहजासहजी विसरू शकत नाही. ते कसं शक्य आहे."

"हो, ते आम्हांलाही कळत आहे. पण, या जगात अशक्य असे काहीच नाही." विनायकराव

"पण, बाबा."

"हो वेळ लागेल. तुझ्या प्रेमाची हीच खरी परीक्षा आहे आणि आयुष्य एवढं छोटं आहे का? अरे, या जगात असे कितीतरी दुःखी लोक आहेत. अनेक संकटे , अनेक प्रश्न आहे. ते लोक जगतातच ना. हार मानून कोणी जीव द्यायला जात नाही लगेच."

"पण, बाबा माझ्या समोर फक्त रागिणी आणि तिने केलेला विश्वासघात दिसत आहे."

माधव आता सतत एकटा राहू लागला. त्याला सतत नैराश्य आले होते. रागिणीच्या विश्वातून , प्रेमातून तो बाहेर पडू इच्छित नव्हता. त्याने ऐकलेले तिचे पहिले गाणे तो सतत ऐकत होता.

पण, विनायकराव आणि उल्काताई यांनी माधवला व्यवस्थित समजावून सांगितले. त्याला रागिणीच्या दुःखातून सावरण्यासाठी त्याला खूप मदत केली. जवळपास दीड दोन महिन्यांनंतर तो सावरू लागला.

त्यानंतर त्याने एका दवाखान्यात प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. दोन वर्षानंतर त्याने स्वतः चा दावाखाना सुरु करण्याचे ठरविले.

रागिणी आणि त्याने बघितलेलं हे एक स्वप्न होतं. स्वतः चा दवाखाना सुरू करून गोरगरीब लोकांसाठी काही सुविधा उपलब्ध देण्याचा त्यांचा मानस होता.

रागिणी सोबत नव्हती. पण, तरीही तो नवीन त्यांनी पाहिलेली स्वप्न पुर्ण करण्यासाठी तयार झाला.

स्वप्न पुर्ण करतांना रागिणीची भेट होते की नाही. पाहुया पुढच्या भागात....

©® आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all