अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले...
हरवलेले प्रेम नव्याने गवसले...
माधव परत येण्याचा दिवस जवळ येऊ लागला असतो. त्यामुळे अचानक माधवचे आई वडील रागिणीच्या घरी जातात.
दाराची बेल वाजवली. तेवढ्यात आता या वेळेला कोण कडमडलं?
"नमस्कार ताई."
"तुम्ही! तुम्ही परत का आलात?"
"रागिणी कुठे आहे? उद्या सकाळी माधव येणार आहे. तेव्हा आम्ही तिला सोबत न्यायला आलो आहोत." उल्का ताई
"रागिणी जरा बाहेर गेलेली आहे."
"कधीपर्यंत परत येईल ती?"
"नाही. काही सांगता येत नाही. कारण, ती गावाला गेली आहे."
"हो का. बरं तिला सांगा एक फोन कर म्हणून."
असे सांगून उल्काताई आणि विनायकराव परत गेले.
रागिणी नसल्यामुळे माधवचे आई वडील त्याला घ्यायला गेलेच नाहीत. माधवच स्वतः घरी आला.
रागिणी नसल्यामुळे माधवचे आई वडील त्याला घ्यायला गेलेच नाहीत. माधवच स्वतः घरी आला.
"आई, आई."
त्याच्या आईने आरतीचे ताट आणून त्याला ओवाळले.
"वेलकम डॉक्टर माधव विनायक परांजपे."
"थॅक्यू बाबा."
"पण, रागिणी का नाही आली?"
"आई, रागिणी कुठे आहे? तू तर म्हटली तुझ्यासाठी सरप्राइज आहे म्हणून तुम्ही दोघे मला स्टेशनवर घ्यायला सुध्दा आले नाही."
"माधव आधी हात पाय धुवून घे आणि चहा घे. थकला असशील ना तू."
"आई, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही अजून."
"अरे, आम्ही तिच्या मामाकडे जाऊन आलो. पण, ती गावाला गेली आहे म्हणे. कधी येणार हे त्यांनाही माहिती नाही."
"पण, रागिणी अशी कशी करू शकते? एकतर तिचा फोन बंद असतो. त्यात ती मला भेटायला सुध्दा येऊ शकत नाही. हाॅरीबल आहे सगळं."
"अरे माधव , एवढा का वैतागतो. असेल काही इमरजन्सी. तेव्हाच ती आली नाही ना!"
"पण, बाबा. ठीक आहे. मी केतकीलाच फोन लावून बघतो. तिला तरी काही माहिती असेल."
माधव घरी आल्यापासून बैचेन झाला होता. त्याने ताबडतोब केतकीला फोन केला.
"हॅलो, केतकी."
"हॅलो, माधव."
"केतकी रागिणी कुठे गेली आहे. काही माहिती आहे का?"
"अच्छा, प्रेमाचं फुलपाखरू परतले वाटते."
"केतकी , मी इतका गंभीर होऊन बोलतो आणि तू माझी गंमत करतं आहे."
"साॅरी माधव, पण मला खरंच माहिती नाही रे. उलट परीक्षा संपल्यानंतर ती मला एकदाही भेटली नाही आणि मी सुध्दा आता गावी आले आहे."
"पण, ऐक ना तिच्याविषयी काहीही कळले तरी मला सांग प्लीज."
"हो नक्कीच माधव."
असे म्हणत माधवने फोन कट केला.
"माधव आता पुरता बैचेन झाला होता. अशी कशी विसरली रागिणी? साधा फोन सुध्दा करता येत नाही तिला. हीच का आपल्या प्रेमाची परीक्षा."
"आई, मी रागिणीच्या घरी चाललो आहे तिला भेटायला. ती तिथे नसेल तर कुठे गेली आहे. हे विचारून तरी येतो."
"थांब माधव. आधी तू नाशता कर. मग जा हवं तर रागिणीकडे." विनायकराव
ते ऐकायला माधव होताच कुठे?
उल्काताई आणि विनायकराव आजून काही बोलायच्या आतच माधव निघून गेला.
तिच्या घरी जाईपर्यंत त्याच्या मनात असंख्य विचार घोळत होते. रागिणी कशी असेल? तिला मुद्दाम तर मला भेटायचे नसेल? तिचे मामा मामी... छे! मी पण काय विचार करतो आहे.
रागिणीच्या घरी गेल्यावर तिचे मामा -मामी काय उत्तर देतात. रागिणचे खरं त्याला कळाल्यावर काय प्रतिक्रिया आहे माधवची.
पाहुया पुढच्या भागात...