अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले...
हरवलेले प्रेम नव्याने गवसले...
रागिणीची वरात गेली. तिच्या नवऱ्यासोबत ती सासरी पोहोचते. पण, सासू- सासरे, नणंद,आत्या, मामा एवढे सगळे असुनही तिला घरात घेण्यासाठी ना ओवाळले, ना ओलांडण्यासाठी माप ठेवले. सगळे पटापट घरात निघून जातात.
प्रवासात तर कोणीच काहीही बोलले नाही. पण, घरात आल्यानंतर सुध्दा एक प्रेमाच शब्द कोणाच्याही तोंडून निघाला नाही.
प्रवासात तर कोणीच काहीही बोलले नाही. पण, घरात आल्यानंतर सुध्दा एक प्रेमाच शब्द कोणाच्याही तोंडून निघाला नाही.
तिचा नवरा तिच्या पदराला बांधलेली गाठ सोडून घरात निघून जातो. तेवढ्यात एक लहान मुलगा आई आली ,आई आली असे म्हणत तिला येऊन बिलगतो.
त्याचा स्पर्श, त्यांचे बोबडे बोल ऐकून तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. रागिणी त्याला कडेवर घेऊन आत येते.
त्याचा स्पर्श, त्यांचे बोबडे बोल ऐकून तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. रागिणी त्याला कडेवर घेऊन आत येते.
"या महाराणी, आजपासून ही तुझी जबाबदारी. माझ्या नातवाला देवला तू सांभाळायचे."
मला आधी का नाही सांगितले की यांना एक मुलगा आहे म्हणून." रागिणी
"मग काय करणार होती?" सासुबाई
अजून किती धक्के बसणार होते. काही कळतच नव्हते. त्या नादान लेकराकडे पाहून परत जावे म्हटले. तर मामी परत घरात घेणार आणि माधवच्या आयुष्यात परत फिरायचे काही कारणच उरले नव्हते. तिच्या जवळ कोणताच पर्याय उरला नव्हता.
आपल्याला या लोकांनी फसवले. ही जाणीव होऊनही काहीच पर्याय उपलब्ध नव्हता. डोळ्यांत दाटलेले अश्रू अनावर झाल्याने ती रडत होती.
रात्री देव तिच्या कुशीत शिरून झोपी गेला. त्याला रागिणीच्या रुपात जणू आईसारखे स्वर्ग सुख प्राप्त झाले होते. त्यानंतर तिचा नवरा त्याने तिला इतके ओरबाडले की जणु एक विकृत आनंद मिळवण्यासाठीच तिच्याशी लग्न केले होते.

रागिणीला वाटले आतातरी थोडेसे प्रेम, सुख, आनंद पदरात पडेल. पण, दिवसेंदिवस उलटच होत होते. फक्त घरच्या कामासाठी सून नावाची मोलकरीण, एका मुलाला सांभाळणारी आई नावाची आया आणि एका मनुष्याच्या शारिरीक सुखासाठी एक हक्काची बाई अशी तिची दशा झाली होती.
सगळं कसं सहन होण्याच्या पलीकडले होते. पण, तरीही हळूहळू ती देव मध्ये गुंतत चालली होती. नकळतपणे एक प्रेमाचं फुलपाखरू उडायला लागलं होतं. सर्व दुःख ,त्रास विसरून पुढे जात होतं. तिच्या मनावर फुंकर घालायचं काम देव करत होता. तिचा नवरा प्रकाश फक्त कामावर जायचा आणि सतत दारू ढोसायचा आणि दारूच्या नशेत रागिणीला मारहाण करायचा. सतत तिला तिच्या चेहरा आणि हातावरच्या डागांची आठवण करून देत होता.
रागिणीच्या लग्नाला जवळपास एक महिना होत आला. पण, ना घरून मामाचा फोन , ना काही चौकशी. तिला कळून चुकले होते. की आपली फसवणूक करण्यात आली आहे. पण, दाटलेल्या भावनांना मोकळी वाट मिळतच नव्हती. सगळेजण थंडीने बर्फ गोठल्याप्रमाणे वागत होते.
हळुहळु स्वतः च्या दुःखावर स्वतः च फुंकर घालत होती. कारण, इकडे माधव येणार म्हणून तिच्या मनात रुखरुख लागली. तो परत आल्यानंतर काय होईल? त्याची प्रतिक्रिया कशी असेल? तो माझी, माझ्या प्रेमाची आठवण करेल की नाही? अनेक प्रश्न तिला सतावत होते. माझ्यामुळे माधवचे प्रेम हरवले होते.
माधव परत आल्यानंतर काय करतो . ते पाहुया पुढच्या भागात...
माधव परत आल्यानंतर काय करतो . ते पाहुया पुढच्या भागात...
©® आश्विनी मिश्रीकोटकर