भाग५
अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले
हरवलेले प्रेम नव्याने गवसले
रागिणी आणि केतकी निघून गेल्या. माधवही घरी पोहोचला. पण, रागिणीला बघीतल्यापासून त्याची झोपच उडाली होती. सतत तिचाच विचार येत होता. रागिणीची सुध्दा काही वेगळी अवस्था नव्हती.
माधव एक हुशार मुलगा. आई वडीलांच्या संस्काराचे बाळकडू पिऊनच मोठा झाला होता. तो दिसायला अतिशय सुंदर. आत्मविश्वास तर त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच झळकत होता. आई वडिलांचे एक स्वप्न तो पुर्ण करीत होता. एक उत्तम डाॅक्टर म्हणून त्याला कार्य करायचे होते. तो एम. बी. बी. एसच्या तिसऱ्या वर्षांत शिक्षण घेत होता.
दोन दिवसांपासून माधवचे वागणे बदलले होते. सकाळी लवकर उठू लागला. गालातल्या गालात काय हसू लागला ? त्याच्या आईला घेऊन नाच काय करू लागला ? त्याचे बदललेले वागणे बघून उल्काताई आणि विनायकरावांना आश्चर्य वाटू लागले.
नक्कीच हा कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे. हे त्यांना जाणवले. पण, जोपर्यंत तो स्वतः हून काही सांगत नाही. तो पर्यंत ते दोघेही चूप होते.
नक्कीच हा कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे. हे त्यांना जाणवले. पण, जोपर्यंत तो स्वतः हून काही सांगत नाही. तो पर्यंत ते दोघेही चूप होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी उल्काताई माधवला उठवायला गेल्या. तर माधव झोपेत हसत होता.
"माधव, काय झाले तुला?का हसतोय असा? तुझे वागणे एकदम बदलले. कोणी जादू वगैरे तर नाही ना केली आमच्या लेकावर?" उल्काताई
"माॅम आय लव्ह यू \" आय लव्ह यू...
अजून...
"रागिणी आय लव्ह यू..."
"काय ! कोण रागिणी? इथे फक्त तुझी आई उभी आहे. कळलं का?"
माधव ताडकन उठून बसला.
मग माधवने सर्व काही सांगितले.
"आई, मी तिला भेटायला घेऊन येईल घरी एखादे दिवशी. "
योगायोगाने माधवची भेट रागिणीशी झाली. पण, तिने आपल्याला तिच्या विषयी काहीच सांगितले नाही. आपली पुरेसी ओळख सुद्धा नाही. हा विचार तो करीत होता. आपण आजच त्याने रागिणीला भेटायचे ?
तो काॅलेजमध्ये तिची वाट बघू लागला. पण, रागिणी आलीच नाही आणि त्याचेही लेक्चर आणि प्रॅक्टीकल असल्याने ते निघून गेला. काॅलेज संपल्यावर तो केतकीला भेटलाच.
"केतकी, रागिणी कुठे आहे? आज ती काॅलेजला आली नाही का? तिची तब्येत बरी आहे ना?"
"अरे, थांब, थांब. किती प्रश्न विचारशील ?"
"ती आज काॅलेजलाच नाही आली. पण, तिची तब्येत बरी आहे. त्यामुळे काळजी करू नकोस." केतकी
"ती आज काॅलेजलाच नाही आली. पण, तिची तब्येत बरी आहे. त्यामुळे काळजी करू नकोस." केतकी
"चल ,मी निघते बाय."
"कशी गं तू ? एका वाक्यात उत्तर देऊन तू जाऊ शकत नाहीस."
"कशी गं तू ? एका वाक्यात उत्तर देऊन तू जाऊ शकत नाहीस."
"मला थोडं सविस्तर सांग ना तिच्या विषयी."
"नको ,माधव मी काहीही सांगणार नाही. तिला स्वतः वर अशी दया वगैरे दाखवलेली आवडत नाही. जर तू तिच्यावर मनापासून प्रेम करत असशील. तर तिला स्वीकारशीलच. असे मला वाटते."
"चल मी निघते बाय."
आज रागिणीची भेट न झाल्याने माधवचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते.
दुसऱ्या दिवशी त्याने केतकीला फोन केला.
"हाय केतकी, मला रागिणी ला भेटायचे आहे. तुझ्या घरी तू तिला बोलावू शकतेस का? आमची नीट ओळख सुद्धा झाली का नाही गं. तिने मला तिचा फोन नंबर सुध्दा नाही दिला. मला तिच्या कडून जाणून घ्यायचे आहे. की तिचेही माझ्यावर किती प्रेम आहे ते."
"बापरे! फार मोठी रिस्क आहे ही. अरे, मी होस्टलवर राहते आणि इथे मुलांना अलाऊड नाही. मी तिला बोलावते. पण, तुम्हांला बाहेर भेटावे लागेल. चालेल का तुला?"
"हो , ठीक आहे. चालेल मला. पण, रागिणीला चालेल का?"
"मी प्रयत्न करते." केतकी
ठरल्याप्रमाणे केतकीने रागिणीला फोन केला.
अभ्यासासाठी केतकीच्या होस्टेलवर चालली आहे असे तिने घरी सांगितले.
केतकी आणि रागिणी माधवला भेटले. एका कॅफे मध्ये ते बसले.
रागिणी तू माधवशी बोलून घे. मी तोपर्यंत माझे काही काम आटोपून परत येते.
रागिणी तू माधवशी बोलून घे. मी तोपर्यंत माझे काही काम आटोपून परत येते.
सुरवातीला रागिणी काहीच बोलत नव्हती.
"अगं, रागिणी इतकी शांत का? तुला काहीच बोलावेसे वाटत नाही का?"
"आय लव्ह यू रागिणी."
"माधव तू मला वारंवार भेटू नकोस?"
रागिणीची ही प्रतिक्रिया पाहून तो थोडासा नाराज झाला.
"अगं, का रागिणी? माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे गं. तुला जाणून घेण्यासाठी मी आजचा प्लॅन केला."
"पण, माधव मला तुला काहीतरी सांगायचे आहे. त्यानंतरच आपण पुढे जाऊया. हे प्रेम वगैरे...
"बोल रागिणी.. मला ऐकायचं आहे?"
रागिणी माधवला काय सांगते पाहुया पुढच्या भागात...
©®आश्विनी मिश्रीकोटकर