Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

हरवलेले प्रेम नव्याने गवसले भाग ४

Read Later
हरवलेले प्रेम नव्याने गवसले भाग ४


भाग/४

अष्टपैलू महासंग्राम स्पर्धा
हरवलेले प्रेम नव्याने गवसले..

रागिणीने माधवला घरी येण्यासाठी नकार दिला. काहीही न बोलता तिने रिक्षा पकडली आणि घरी निघून गेली.

कारण, तिला तिच्या घरची परिस्थिती माहिती होती.

माधव मात्र रागिणी आपल्याशी अशा पध्दतीने का वागली. याचाच विचार करत होता. रागिणचा तो लोभस चेहरा माधवच्या डोळ्यांसमोरून जातच नव्हता. तिचे ते लाघवी डोळे, लांब केस, तिचे नाजूक बोलणे त्याच्चा मनाला भुरळ घालत होते. पहिल्या नजरेत जणु रागिणने त्याला घायाळ केले होते ‌. तो तिला पुन्हा भेटण्यासाठी आतुर झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी माधव रागिणीची मैत्रिण केतकीला भेटला.

"केतकी, रागिणी कशी आहे? तिचा काही फोन वगैरे. मला तिला भेटायचे आहे गं? तिने त्या दिवशी मला घरी सुद्धा येऊ दिले नाही."

"हो बरी आहे ती आणि तू तिच्या घरी न गेलेलाच बरं
आणि अरे, आज आमचा गायनाचा कार्यक्रम आहे. तेव्हा ती डायरेक्ट दोन वाजता पोहोचणार आहे. तू तेव्हा भेटू शकतोस." केतकी

"कार्यक्रम ! कसला कार्यक्रम? " माधव

"अरे, माधव आज बालगंधर्व यांचा जन्मदिनानिमित्त त्यांनी गायलेली गाणी आम्ही गाणार आहोत." केतकी

"मी येऊं शकतो का?"

केतकी हसली.

"तू आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये? काही संगीताची आवड वगैरे?" केतकी मिश्कीलपणे हसली.

"अरे, नक्की ये. गाणे ऐकायला कोणालाच बंदी नाही."

"पण, तुला का यायचे आहे? नक्की गाणे ऐकायलाच की ... "

"अगं हो केतकी, मला रागिणीलाच भेटायचे आहे. तिची चौकशी करायची आहे गं."

"तिच्यविषयी बरंच काही जाणून घ्यायचे आहे गं मला."

"माधव तू तिला नक्की भेट. पण, स्वतः मध्ये गुंतवू नकोस." केतकी असे बोलून निघून गेली.

माधव केतकीच्या बोलण्यावर विचार करू लागला.
ठरलेल्या वेळेत रागिणी पोहोचली. माधव आधीच हाॅल मध्ये जाऊन बसला होता. तिची तब्येत फारशी बरी नव्हती. पण, तरीही ती गाण्यासाठी तयार झाली. तिच्या आवाजाने माधवच्या मनात जादू केली. त्याच्या हृदयाच्या तारा झणकारू लागल्या होत्या. तो फक्त तिच्या गाण्याच्या आवाजाच्या प्रेमातच पडला नाही तर तिच्या प्रेमात सुध्दा पडला.

गाण्याचा कार्यक्रम पार पडला. तशी रागिणी निघाली.

"हाय, रागिणी. कशी आहेस?"

हॅलो, अंं...

"मी माधव "

"साॅरी , मी नाव विसरले."

"ईट्स ओके."

"मी ठीक आहे आता. थोडा पाय आणि हात दुखतो आहे. पण, होईल एक दोन दिवसांत बरी."

दोघेही गप्पा मारत मारत बाहेर आले.‌

माधव तिला अनेक प्रश्न विचारत होता. पण, ती फारशी काही बोलतच नव्हती.

तेवढ्यात केतकी आली.

"बाई ,बाई ,बाई एक मुलगी तर आम्हांला विसरलीस वाटते."केतकी

"अगं तसं नाही. आम्ही बोलत बोलत बाहेर आलो गं फक्त." रागिणी

"एकमेकांची ओळख झाली पण वाटतं." केतकी

"नाही तसं नाही. बस तो काय काय करतो? मी काय करते? वगैरे वगैरे..."

"इश्क हुआ । कैसे हुआ।"

" म्हणजे तुमच्या प्रेमाचं फुलपाखरू उडायला लागलं तर." केतकी

"ए, चावट चल काहीतरीच बोलतेस." रागिणी

"पण, केतकी मला खरंच तुमची मैत्रीण आवडली बरं का."

"पण, तिला मी आवडतो की नाही माहिती नाही. जरा तिला विचारा सुध्दा."

रागिणीने लाजून मान खाली घातली. खरंतर पहिल्याच भेटीत माधव तिला आवडायला लागला होता.

"तो उंचपुरा होता. त्याचे घारे डोळे खूप बोलके होते. त्यांच्या डोळ्यात प्रेम दिसत होते. त्याच्या मनात आत्मीयता वाटत होती‌."

"पण, त्याला एकाच भेटीत आपल्या मनातलं कसं सांगणार?"

दिल ने कहा चुपके से
ये क्या हुआ चुपके से।

क्यूँ नए लग रहे हैं ये धरती गगन
मैंने पूछा तो बोली ये पगली पवन
प्यार हुआ चुपके से
ये क्या हुआ चुपके से।

केतकी रागिणला सारखी चिडवू लागली.‌

माधव आणि केतकी एकमेकांच्या डोळ्यांत बघत होते. जणू ते आपल्या प्रेमाची कबुली देत होते.

तेवढ्यात केतकीने रागिणीसमोर चुटकी वाजवली. तेव्हा दोघेही भानावर आले.

"केतकी चल निघू या का?" रागिणी

असे म्हणत रागिणी निघाली.

पाहुया रागिणी आणि माधवच्या प्रेमाची कहाणी पुढच्या भागात....

©®आश्विनी मिश्रीकोटकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Suhas Mishrikotkar

Housewife

Love Singing, Rangoli

//