हरवलेले सूर

एक दिवस चेतन म्हणाला ,-- 'यार समीर, तुझ्या वागण्यातून स्पष्ट जाणवते आहे कि तू प्रेमात पडला आहे. मग सांगून का नाही टाकत तिला... आय लव यू.?' 'हो यार, पण-- तिच्याही मनात असायला हवे नाहीतर, सगळेच फिसकटेल.' 'लडकियों के दिल को समझना टेढीं खीर है'... सावनी चे लाईव्ह कार्यक्रम जोरात चालले होते. खूप खूप प्रसिद्धी मिळत होती. प्रत्येक प्रोग्राम ला जायच्या आधी समीरला गाण्याची ऑडिओ पाठवून करेक्शन विचारायचे, प्रोग्राम झाला की भेटायला यायची, तेव्हा दोघं कुठेतरी आउटिंग ला जात.सावनी समीर बरोबर खूप मोकळी असायची.असेच दिवस आनंदात जात होते...
?? हरवलेले सूर??

"Sun & Sons" कंपनीच्या सीईओ समीरने आपल्या टीम मेंबर्सना थँक्यू म्हणत मीटिंग संपल्याची घोषणा केली व फाइल वर साइन करून ती पी.एला दिली ....
एवढ्यात इंटरकॉम वरून रिसेप्शनिस्ट बोलली. "- सर आपल्या करता तीन अर्जंट कॉल....", समीर ने फोन रिसीव केला.
चेतन चे तीन रेकॉर्डेड मेसेज होते,
समीर --सावनी इज सिरीयस, कम सून.
दुसरा होता ----
तिला तुला भेटायचंय.‌‍‌...
तिसरा--
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट...

सावनी सिरीयस, समीर ला काही कळेच ना, त्यांनी चेतनला कॉल केला, पण फोन लागत नव्हता.
समीरने पीए ला बोलवून काही सूचना दिल्या......
प्रीती ला मेसेज करून मुंबईला जात असल्याचे कळवले.
ड्रायव्हरला मुंबईला चलायचे सांगून समीर मागे बसला.
आज मन इतके अशांत होते कि गाडी चालवणे ही धोक्याचे वाटत होते .
गाडी स्टार्ट होताच त्यानें रिमोटने प्लेयर वर गाणे सुरू केले.
......सावनी नी गायलेली गाणी होती. गाण्याच्या लयीमध्ये गुंग होत समीर किती तरी मागे मागे पोहोचला.

समीर एम.बी.ए करत होता.चेतन नी समीर, दोघे रूम पार्टनर होते. एक दिवस समीर रूमवर पोहोचला , चेतन कुठल्यातरी गाण्याचा लाईव्ह शो पाहत होता .कुठली तरी वॉच पार्टीचा , फेसबुक वर गाण्याचा? शो होता.
\"वा-- वा,..... क्या बात है!!\"
\"अरे समीर जल्दी आ....\", समीर वॉश घेऊन आला तेव्हा गाण्याने त्याचे लक्ष वेधून घेतले ,
\"वाSS --काय आवाज आहे, कोण आहे कोण ही....,?\"
\"हीSS --अरे ही सावनी..... अपने शांतनु भट्टाचार्य की बहन...\"
\"आवाज खूप छान आहे रे...., और गाना भी मेरी पसंद का\"... ,म्हणत समीर गुणगुणायला लागला.
\"अरे लाईक दे ना मग,
माझ्याकडून तूच दे, मी जरा खायचे आणतो मग आरामात बसून ऐकू\".
पण समीर येई पर्यंत गाण्याचा शो संपला, आणि मग तो विषय ही तिथेच संपला.

शनिवार- रविवार कॉलेजला सुट्टी असायची, मग भारी बोर वाटायचं. चेतन ही या दोन दिवसात त्याच्या घरी जात असे.

अशाच एका शनिवारी बाहेर मस्त पाऊस कोसळत होता, त्यामुळे बाहेर जाण्याचा योग ही नाही. हे पाहुन सर्च करता करता, समीर गाण्याच्या कार्यक्रमावर पोहोचला. जुना लाईव्ह शो रिपीट होत होता.
"न तुम हमे जानों, न हम तुम्हें जानें ?" गाणे कानावर येताच समीर थबकला. अरे ही तर सावनी भट्टाचार्य------. आवाजात एक वेगळीच कशिश, गाताना डोळ्यात गाण्याचे भाव उमटत होते. समीर कितीतरी वेळ मंत्रमुग्ध होऊन पहात होता, त्याने लाईक देउन टाकली. नंतर दुसरे गाणे सुरू झाले समीरला जाणवले स्वर थोडा कमी पडतोय ,गाणे खेचल्यासारखे वाटते आहे.

लहानपणी समीर ताई बरोबर गाणे शिकायला जात असे. त्यामुळे त्याच्याजवळ संगीताचे बरेच ज्ञान होते .अगदी "तानसेन" जरी नसला तरी "कानसेन" नक्कीच होता !!... त्यामुळे स्वरां बाबत पक्का होता. दोन-तीन वेळा त्याला गाण्याचा सूर कुठेतरी कमी पडतोय आणि हरकती बरोबर जमत नाहीये..... ,पण _...पण, आवाजातील गोडव्या मुळे चालून जात आहे असे त्याला वाटले.
त्याने प्रामाणिकपणे लाईक दिली व कमेंट मध्ये, आवाज मधुर आहे पण स्वरांत कडे अधिक लक्ष द्यावे असा सरळ कमेंट पाठवला
दोन दिवसांनी संध्याकाळी चेतन घरी आला तोच मूड उखडलेला,
...... \"अरे यार ये लडकियां भी ना,.... जरा जरा मे मूड ऑफ ......\"
\"कोणाचा मूड संभाळायला गेला होता रे ?\"
\"अरे वह सावनी, किसी ने बॅड कमेंट दिया, तो लगी तनतनाने\"
\"वह तोअच्छा गाती है.....
हो यार, किसी समीर ने कुछ सूर उंचा, नीचा,---- एक मिनिट,.... समीर मतलब -- कहीं तूने तो कुछ लिखा लिखा ना..?\"
\"अरे हो, पण त्यात एवढे चिडण्या सारखे काय? जे वाटले ते प्रामाणिक पणे सांगितले.\"
\"तू पण ना यार.... ,त्यामुळे तिचा मूड ऑफ झाला.\"
\"ठीक है भाई सॉरी कह दूंगा, बस...\"
दोनच दिवसांनी दाराची बेल वाजली म्हणून समीर दार उघडायला आला, समोर सावनी उभी !! तो एकटक पाहतच राहिला-- ते नशीले डोळे तोच घायल करणारा अंदाज....
\"अंदर आनेके लिये नही कहेंगे?\"
\"ओ--या - या,\" म्हणत समीर ने तिला आत घेतले.
इकडे तिकडे पाहत एका खुर्चीवर बसत सावनी ने विचारले-- \"चेतन....?\"
\"नही, अभी वो,--आय एम सॉरी मेरी वजहसे उस दिन.... आप नर्वस---.\"
\"मै आपको तभी माफ करुंगी ज जब आप गाकर बताएंगे कि गलती कहां है.\"
\"ठीक है न,-- गाइयेआप.... मैं बतलाने की कोशिश....\"

सावनी ने गायला सुरु केले , समीर तिच्याकडे एकटक पाहतच राहिला, विसरून गेला की त्याला गायचे आहे.
\".....अरे आपने गाया----.
ओ SS,-- फिरसे एक बार गाइये ना, प्लीज.....\"
या वेळेस समीर ने बरोबर गायला सुरवात केली.... \"ये जो अजनबी...\" आप गाती है ना, उसमे न और बीS के बीच मे, SS.... लेते हुए सुर को थोडा लंबा खींचते हुए गाइये...\"

\"दोन रीटेक नंतर सावनी ने बरोबर गायले, दोघं ही भान विसरून बरोबर गात राहिले.
टाळ्यांच्या आवाजाने दोघांनी भानावर येऊन पाहिले, चेतन दारात हसत उभा होता.
हळूहळू अशाच भेटी होत गेल्या, समीरला जाणवायला लागले तो सावनी च्या प्रेमात पडला आहे.

एक दिवस चेतन म्हणाला ,-- \"यार समीर, तुझ्या वागण्यातून स्पष्ट जाणवते आहे कि तू प्रेमात पडला आहे. मग सांगून का नाही टाकत तिला... आय लव यू.?\"
\"हो यार, पण-- तिच्याही मनात असायला हवे नाहीतर, सगळेच फिसकटेल.\"
\"लडकियों के दिल को समझना टेढीं खीर है\"...

सावनी चे लाईव्ह कार्यक्रम जोरात चालले होते. खूप खूप प्रसिद्धी मिळत होती. प्रत्येक प्रोग्राम ला जायच्या आधी समीरला गाण्याची ऑडिओ पाठवून करेक्शन विचारायचे, प्रोग्राम झाला की भेटायला यायची, तेव्हा दोघं कुठेतरी आउटिंग ला जात.
सावनी समीर बरोबर खूप मोकळी असायची.
असेच दिवस आनंदात जात होते...

समीरचे एम.बी.ए पूर्ण होत आले. कॅम्पस मधून सिलेक्शन ही झाले आणि त्याला बेंगलोर ला जॉब भेटला.

इतक्या दूर जायचे, त्यांने ठरवले कि आज सावनी ला प्रपोज करायचेच.
सावनी आली तीच खूप उशिरा, समीर तिची वाट पाहून कंटाळून गेला, तिने तिचा पुढच्या कार्यक्रम, एका म्युझिक पार्टी बरोबर लंडनला जात असल्याचे सांगितले. कार्यक्रम पंधरा दिवसा करता होता . सावनी खूप छान मूड मध्ये होती.एकटीच भरभरून बोलत होती. समीरला काही बोलायचा चान्सच मिळाला नाही.

\"समीर दो दिन से देख रहा हूं,तेरा मूड कुछ ऑफ है. तिने नाही म्हटले का ? तूने प्रपोज किया था क्यां?\"
\"नाही यार, ती वेगळ्याच मूडमधे होती, लंडनला जाण्या विषयी, पुढच्या करिअरचा प्लॅन वगैरे वगैरे बरेच काही सांगत होती. मी तिला बेंगलोरला जात असल्याचे सांगितले.
\"अरे,मग सोड तिचा नाद ,एक से एक मुली मिळतील तुला.\"
\"हो रे, पण आय लव हर,...\"
\"जानता हूं, सच कहूं, एक दिन बातो ही बातो मे मैने उसे कह दिया था कि सावनी शादी कब कर रहे हो, समीर तर बेंगलोर जातोय.\"
\"तो..........?\"
\"अरे यार, वह शादी नहीं करना चाहती, तिला गाण्यातच करिअर करायचे, लग्न वगैरे मध्ये नाही अडकायचे,असे म्हणत होती...\"
समीर खूपच दुखावला पण पर्याय नव्हता.
बेंगलोरच्या कंपनीत काम शिकण्यात मग त्याने स्वतःला झोकून दिले.मनमिळाऊ स्वभाव, कामातली हुशारी आणि आणि दिसायला स्मार्ट या सर्वांचा त्याच्या करिअर मध्ये बराच फायदा झाला.

मधून मधून सावनी चे फोन येत असत फोनवर खूप बोलायची,मग समीर डिस्टर्ब व्हायचा.
अशीच दोन वर्ष निघून गेली....... घरून आई-बाबा, लग्न कर म्हणून मागे लागले होते. कुणी आहे का असेही विचारत,पण काय सांगणार?...

अचानक समीरला प्रमोशन मिळाले पुण्याला ट्रान्सफर झाली...
पुण्याचे वातावरण बंगलोर च्या मानाने खूपच वेगळे होते, खूप काम होते ,पण मित्र ही छान मिळाले.
मध्यंतरी चेतन चे लग्न झाल्याची बातमी मिळाली.
आता समीरला पुढचे प्रमोशन हवे होते म्हणून कामात खूप लक्ष देत होता...
एक दिवस समीर ऑफिसला येत होता. सावनी चा फोन येऊन गेल्याने तिच्या अनेक आठवणी डोक्यात होत्या ,ऑफिसच्या मेन गेट कडे लक्ष नव्हते, त्यावरच गाडी दणकली, हात डिसलोकेट झाला.मित्रांनी दवाखान्यात ऍडमिट केले..
.प्रीतीची आणि त्याची तिथेच भेट झाली.
प्रीती...डॉक्टर सेन आर्थोपेडिक सर्जन ची असिस्टंट होती,..... साधी सरळ पण खूप बोलकी हसरी. ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी साठी येत असे.
हाता बरोबरच त्याचे दुखरे मनही तिनें जुळवले..
पुढे ओळख वाढत गेली प्रीतीने त्याला प्रपोज केले. नाही म्हणण्यासारखे काहीच कारण दिसत नव्हते. लवकरच त्यांचा साखरपुडा झाला दोन महिन्यातच लग्न .
यशाच्या अनेक पायऱ्या समीर चढला, स्वतःच्या कर्तुत्वाने कंपनीचा. सी.इ.ओ. सुद्धा झाला.....

मुंबईला गाडी हॉस्पिटल समोर येताच ड्रायव्हर ने आवाज दिला.
समीर भानावर आला त्याने चेतन ला फोन केला.

सावनी आय.सी.यू.मध्ये होती समीरने काचेतून पाहिले, अनेक नळ्या लावलेल्या. समीरला गरगरायला लागले. चेतन ने त्याला बसवून पाणी दिले..
समीर थोडा सावरल्यावर चेतन म्हणाला, तुझ्याशी बोलायचे होते तिला... भेट तिला जाऊन.

समीर सावनी च्या बेड पाशी गेला. तिच्या डोक्यावर हात ठेवून त्याने आवाज दिला.
महत्प्रयासाने सावनी ने डोळे उघडले. समीरला पाहून ती क्षीण से हसली. बोलायचा प्रयत्न करत होती पण ओठ नुसतेच हलले.
दोन दिवस समीर दवाखान्यात होता. सावनी शरीर सोडून पुढच्या लाईव्ह शो ला निघून गेली

चेतन ने निघताना एक पत्र समीर ला दिले, तेरे नाम है.
परतीचा प्रवास सुरु झाला, समीरने पत्र उघडले...
....समीर लव यु म्हणायची वेळ निघून गेली रे, मी कधीच विचार केला नव्हता की माझे असे होईल. पण जेव्हां तूच माझा नाही तर..... खरं सांगू ‌..तू तर माझाच होतास, पण मीच वेडी. आपल्या भावना समजू शकले नाही. मला एक चांगली गायिका व्हायचे होते मी यशाच्या पायर्‍या चढत गेले. लंडन, युरोप... असे अनेक प्रोग्राम माझे होत गेले.मग एक दिवस तुझ्या एंगेजमेंट चे फोटो चेतन नी पाठवले तुझ्याबरोबर दुसरी कोणीतरी.. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवले कि, मी तुझ्यासोबत दुसरी कोणी हे सहन करू शकत नाही. मी आतून इतकी दुखावले की फोटोचे दोन तुकडे करून टाकले.
त्या क्षणी मला माझ्यात एक वेगळीच सावनी जाणवली जी फक्त तुझी होती आणि तुलाही आपले समजत होती.
तू आणखीन कोणाचा हे सत्य मी स्वीकारू शकत नव्हते
त्या रात्री मी पहिल्यांदाच ड्रिंक केले. माझे गाणे त्यादिवशी खुपच छान झाले , माझ्या गाण्यात एक वेगळीच आर्त भावना ऐकणार्‍यांना जाणवली होती.
मी काय सांगणार त्यांना?
त्यानंतर माझे पिणे वाढत गेले.
तुझ्या लग्नाच्या बातमीने माझा उरलासुरला तोल हि सुटला मला वाटायचे तू फक्त माझा आहे मला समजून घेशील , माझी वाट पाहशील.पण मीच तुला गृहित धरले...........मला आठवते तू मला मागणी घालायला आला होतास. ते तू मला न सांगता ही तुझ्या डोळ्यातून जाणवत होते पण,...... तेव्हा करियरची भुरळ मला साद घालत होती.
तुझा उदास चेहरा मला अजूनही आठवतो.
पण आता तर सर्वच संपले होते.
मी निराशेत खूप प्यायला लागले.
दारू माझ्या गळ्या साठी विष बनून गेली, या सगळ्याचा परिणाम माझ्या प्रस्तुति वर व्हायला लागला आणि मी पूर्णपणे कोलमडले.
तु माझ्या जीवन संगीताचा?? वादी स्वर होता तोच हरवला मग माझ्या प्रेम रागाचे सर्वच स्वर बेसुर होत गेले. मी तुला हरवून बसले .मला गळ्याचा कॅन्सर झाला.
गाणे तर दूरची गोष्ट मला बोलायलाही खूप त्रास होऊ लागला. मी जगण्याची आसच सोडून बसले.
"ना मिला खुदा ना मिला विसाले सनम" म्हणतात ना...तसे झाले माझे.
तू येशील, भेटशील की नाही, आला तरी, कोण जाणे मी तोपर्यंत असेन की नाही .
तुझ्याशी बोलूही शकणार नाही म्हणून हे पत्र.
प्रीतीला माझ्यावरील प्रेम समर्पित कर व सुखाचा संसार कर.
आपण दोघे मिळून जे गीत गात असू "न तुम हमे जानो न हम तुम्हे जानें, मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया" तेच आठवत तुझा निरोप घेते.-- अलविदा"...

समीरच्या डोळ्यातल्या पाण्याने पत्रातले अक्षरेही ओली होत होत पुसत गेली...
********************
लेखिका---सौ. प्रतिभा परांजपे

---------------------------------------