हाराकिरी भाग ४
©® सौ. हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले की, मेघनाच्या खून करण्यामागे कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार आहे. शेखर, समीर व रोहित तिघेही इन्स्पेक्टर राघवच्या हिट लिस्टवर आहेत. आता पुढे...
इन्स्पेक्टर राघव सूर्यवंशी तपास करत खुन्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे असे त्याला वाटत होते. एकेक कडी उलगडत चालली होती, पण अजूनही अंतिम सत्याचा धागादोरा लागत नव्हता. मेघनाच्या मृत्यूमागचे गूढ तिच्या आयुष्यातील लोकांमध्ये, तिच्या ऑफिसमधील आर्थिक गैरव्यवहारांमध्ये, आणि तिच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या पुराव्यांमध्ये लपलेले होते. प्रत्येक गोष्टीतून काही धागेदोरे हाती लागले होते, पण संपूर्ण चित्र तयार होण्यासाठी अजून बरीच कोडी सोडवायची बाकी होती.
रोहित वर्माने मेघनाला शेवटचा कॉल केल्याचे कबूल केले होते, पण तो तिच्या फ्लॅटवर गेल्याचे नाकारत होता. मात्र, त्याच्या फोन लोकेशन रिपोर्टने वेगळेच सत्य उघड केले होते.
राघवने रोहितला पुन्हा बोलावले आणि विचारले,
“तू म्हणतोयस की तू फ्लॅटवर गेला नाहीस, पण तुझे मोबाईल लोकेशन काहीतरी वेगळंच सांगतेय. तू अजूनही खोटं बोलतोयस का?”

रोहितचा चेहरा पांढराफटक पडला. तो घाबरलेला वाटत होता.
“साहेब, मी खरं सांगतो. मी तिथे गेलो होतो, पण मी तिच्या आत्महत्येसाठी जबाबदार नाही. ती खूप अस्वस्थ होती. मला वाटलं, तिने काहीतरी चुकीचं पाऊल उचलायच्या आधी मी तिला थांबवावं. पण मी तिथे पोहोचलो तेव्हा ती काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. मी तिची समजूत घालण्याचा निरर्थक प्रयत्न केला. मग काही वेळ बसलो आणि निघून गेलो.”

“तू तिथून निघून गेल्यावर काय घडले असावे?”
“माहित नाही, साहेब. पण ती म्हणाली होती की, तिचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. ती कोणत्यातरी मोठ्या संकटात अडकली होती,” रोहितने सांगितले. राघवने रोहितला जायला सांगितले, पण पुन्हा बोलावले की लगेच हजर व्हायचे अशी ताकीद दिली.

आता समीर सावंत संशयाच्या केंद्रस्थानी होता. मेघनाच्या USB ड्राईव्हमध्ये असलेल्या फाईल्समध्ये त्याचे नाव अनेक ठिकाणी दिसत होते. आर्थिक गैरव्यवहारांच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे दिसत होते.
“समीर, आता खोटं बोलण्याची वेळ गेली आहे. जे काही सत्य असेल ते सांगून टाक,” राघवने थेट सांगितले.
समीर थोडा गोंधळला.
“सर, मी काहीही केले नाही. हो, ऑफिसमध्ये काही गोष्टींमध्ये गडबड चालली होती, पण मेघना त्याच्याशी संबंधित नव्हती. ती फक्त तिचे काम करत होती.”

“मग तिच्या USB ड्राईव्हमध्ये तुझं नाव का आहे? तिच्या फाईल्समध्ये तू असल्याचे का दिसतेय?” राघवने खडसावून विचारले.
समीर काही वेळ गप्प राहिला. मग तो म्हणाला,
“हो, ती काही पुरावे गोळा करत होती. पण ती खूप पुढे गेली होती. मला तिच्या सुरक्षिततेची काळजी होती. मी तिला वारंवार थांबवायचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती.”

आता शेखर नाईकला राघवने चौकशीसाठी पुढ्यात घेतले.
शेखर नाईकच्या चौकशीत अजून एक नवी माहिती समोर आली. तो सांगू लागला,
“सर, मला खूप वाईट वाटतेय, पण मेघना माझ्याकडून काम करवून घेत होती. तिला ऑफिसमधील फाईल्स गायब करायच्या होत्या. मी ती कामे करत गेलो. एके दिवशी तिने मला सांगितले की, तिच्या आयुष्यात फार मोठे संकट येणार आहे.”

“ कोणते संकट?”
“ ते तिने स्पष्टपणे तिने सांगितले नव्हते, पण ती सतत कोणाच्यातरी दबावाखाली असल्यासारखी वाटायची. तिच्या मॅनेजरबद्दलही ती काहीतरी बोलायची.”

शेखरच्या सांगण्यातून एक गोष्ट स्पष्ट होत होती की मेघना तिच्या ऑफिसमधील आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत होती.
सीसीटीव्ही फुटेज पुन्हा एकदा तपासण्यात आले. त्यात दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच्या जॅकेटवर असलेला लोगो लक्ष वेधून घेत होता. राघवने लोगो ओळखण्यासाठी ऑफिसच्या कामगारांशी चर्चा केली.
तेव्हा समजले की तो व्यक्ती समीर सावंतच्या ऑफिसचा एक बाहेरचा कंत्राटदार होता...'राहुल देशमुख.'
राघवने राहुलला बोलावले.
राहुल देशमुखला चौकशीसाठी राघवच्या समोर आणण्यात आले. तो थोडा घाबरलेला होता. राघवने त्याला विचारले,
“तू त्या रात्री मेघनाच्या फ्लॅटवर गेला होतास का?”

राहुलने मान खाली घातली.
“हो सर, मी तिथे गेलो होतो. पण मी काही केले नाही. मी फक्त समीर सरांचं काम पूर्ण करण्यासाठी तिथे गेलो होतो. त्यांनी मला काही दस्तऐवज नष्ट करण्यास सांगितले होते, पण मला माहित नव्हते की, ते तिच्या मृत्यूशी संबंधित असतील.”

“तू दस्तऐवज नष्ट केल्यावर काय घडले?” राघवने विचारले.
“मी तिथून निघालो. नंतर काय झाले, मला काहीच माहीत नाही.”
" या प्रकरणाबाबत तुला आणखी काय माहिती असेल तर सांगून टाक. परत जर ती माहिती मला इतर कुणाकडून समजली तर तुझी रवानगी तुरुंगात होईल हे लक्षात ठेव." राघवने सांगितले.
यावर राहुल देशमुखच्या सांगण्यातून कळले की, " समीर सावंतने मेघनाच्या मृत्यूपूर्वी तिला धमकी दिली होती. ती त्याच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश करणार होती. त्याने तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण ती माघार घेत नव्हती."

राघवने आता सगळ्या पुराव्यांची जुळवाजुळव केली. समीर, शेखर, आणि राहुल या तिघांचा सहभाग अप्रत्यक्षपणे या प्रकरणात होता. पण मुख्य सूत्रधार कोण होता? हे शोधून काढायचे होते.
पुढील भागात पाहू,
राघव पुरावे गोळा करून समीरला अटक करण्याची तयारी करतो. पण एका धक्कादायक साक्षीसह प्रकरणाला वेगळेच वळण लागते. मेघनाचा खून कसा झाला याचे सत्य पूर्णपणे उघड होते. रहस्य आता अंतिम टप्प्यात पोहोचते की याला आणखी फाटे फुटतात हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा