तिचा संघर्ष

Mirabai Chanu's Struggle For Weightlifting


तिचा संघर्ष.....


ख्यातनाम तारे तारका असोत, किंवा थोर पुरुष असोत, वा सामान्य माणूस... प्रत्येक जण संघर्ष करूनच आपली जीवनाची उंची गाठत असतो. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, प्रत्येकाचे अनुभव वेगळे.

अशीच एक मुलगी वय फक्त 28 वर्षे की जिने कोणत्याही आव्हानांना सामोरे जाताना आपल्या श्रद्धा, निष्ठा, क्षमता, बळकट करणारा एक प्रभावी युक्तिवाद तयार केला.
आपल्यातला प्रचंड आत्मविश्वास तयार करून देशाचे नाव उज्वल केले.

अशी भारताची प्रभावी भारोत्तोलक मिराबाई चानू......
आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या कुटुंबात मीराबाई चा जन्म 1994 मध्ये मणिपूर राज्यातील पूर्व इम्फालमध्ये झाला.
दररोज जंगलातून लाकडांची मोळी आणायला तिचे वडील, मोठा भाऊ आणि ती असे तिघे जात असत. ती मोळी विकून आपला घर संसार चालविणे असा तिचे वडील साई खोम यांचा दिनक्रम..

एकदा जळाऊ लाकडाची खूप मोठी मोळी तिच्याभावाने तयार केली. तो ती मोळी उचलायला गेला. त्याला ती खूपच जड वाटायला लागली. तो तिथेच खाली बसला, आणि त्यातील लाकडं कमी करायला घेणार, इतक्यात तिथेच लाकडं गोळा करण्यात मग्न असलेली मीराबाई तेथे आली. तिने ती लाकडाची घट्ट बांधलेली मोळी भावाला कमी करू दिली नाही. तिने ती मोळी सहज उचलून डोक्यावर घेतली. आणि इथेच तिच्या ताकदीची कल्पना तिच्या कुटुंबाला आली.

त्यांनी घरी सविस्तर चर्चा करून मीराबाईला जवळच्याच प्रशिक्षण केंद्रात सरावासाठी पाठवायचे ठरविले.
परंतु हे प्रशिक्षण केंद्र दूर जिल्हास्तरावर असल्यामुळे येण्या जाण्याची सोय कशी होणार, हा प्रश्न तिच्या आई-वडिलांना पडला.

परंतु संघर्ष हा जीवनाचा मूलमंत्र आहे. हे तिच्या कुटुंबाने अनुभवले होते.

त्यासाठी मीराबाईने कोणत्याही वाहनाने जाण्यासाठीची जिद्द ठेवली.शेवटी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक वाळू भरलेल्या ट्रकांमधून मीराबाईने प्रवास करीत आपले लक्ष्य गाठण्यासाठी ची सुरुवात केली.
भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) या प्रकारात तिने प्राविण्य मिळविण्याचे ठरविले.

रोजच्या सरावासाठी लागणारा पौष्टिक आणि जास्त आहाराची सोय तिच्या आई-वडील आणि भावांनी केली. त्यासाठी त्यांना सुद्धा आर्थिक संघर्ष करावा लागला.

ती फक्त बारा वर्षाची असताना तिने भारतासाठी पहिले पदक जिंकले.
आणि इथूनच ती भरोत्तोलनस्पर्धांसाठी पात्र ठरत गेली.
यासाठी तिला प्रशिक्षणा दरम्यान सुद्धा भरपूर अडचणी आल्यात. त्यासाठी संघर्ष करणे, व आपली योग्यता सिद्ध करणे, हे एकमेव ध्येय मीराबाई चानू चे होते आणि आहे.

पदक जिंकल्यानंतर च्या सत्काराला तिने प्रवासात मदत केलेल्या सर्व ट्रक चालकांना आमंत्रित केलं. तेव्हा ते ट्रक चालक सुद्धा भारावून गेलेत. अशी संवेदनाशील असलेली मुलगी मीराबाई चानू!

कितीही अडचणी आल्यात तरी आपल्या लक्ष्या पासून मन विचलित होऊ न देता जागतिक अजिंक्य स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले.
यावेळी 200 किलो वजन उचलताना तिच्या मनगटाला दुखापत झाली. परंतु त्याची तिने तमा न बाळगता आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले.
हुकलेल्या सुवर्णपदकासाठी तिने मनगटाच्या दुखापतीचे कारण सुद्धा दिले नाही......

आज पर्यंत तिच्या नावावर पंधरा सुवर्णपदके, 30 रौप्य, व 19 कास्यपदके आहेत.


अशा भारताच्या स्टार भारोत्तो ल क मीराबाई चानू ची संघर्षमय कथा सर्वांना प्रेरणादायी ठरेल....


छाया राऊत ( बर्वे)


इमेज व माहिती गुगल वरून साभार