व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल अलक

Short Stories Showing Different Shades Of Love

व्हॅलेन्टाईन्स डे स्पेशल अलक


१. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या, पहिल्या दिवशी ती त्याला दिसली आणि त्याचा कलिजा खलास झाला. दुसऱ्या वर्षीपासून तो - तिला आवडतात ,म्हणून वेळोवेळी गुलाब देऊ लागला. तिसऱ्या वर्षी त्याने हिमतीने आपल्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा ती म्हणाली, "मला माफ कर,माझं लग्न ठरलंय. तु माझ्यावर प्रेम करत होतास, या आठवणीने जेव्हा तुझं मन कडू होईल, तेव्हा हा तू दिलेल्या गुलाबांचा "गुलकंद" तुझं तोंड नक्कीच गोड करेल."


२. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्याने तिला प्रपोज केल्यावर त्यांचं प्रेम बहरलं . पण आपल्या कौटुंबिक,  आर्थिक, सामाजिक परिस्थितीतील तफावतीमुळे आपण एकत्र येऊ शकणार नाही आणि आपल्या प्रेमाला नाव देऊ शकणार नाही, असं त्यांना वाटलं आणि त्यांनी आपापल्या घरी स्वतःच जीवन संपवून, एकमेकांना दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं.


३. तो तिच्याशी पाच वर्ष नात्यात होता. पण मग माहित नाही काय झालं? एक दिवस तो तिला सोडून अचानक निघून गेला. ती रडली, निराश झाली. गेल्या सहा महिन्यापासून ती फूटपाथ स्कूल मध्ये शिकवायला जात होती. यावर्षी तिने , त्याने दिलेले सगळे टेडी फुटपाथ स्कूलच्या मुलांना देऊन टाकले.


४. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तो देवाघरी गेला. घरच्यांच्या मदतीने स्वतःचं केक आणि चॉकलेट शॉप सुरु केलं. यावर्षी तिने वृद्धाश्रमात जाऊन ,वृद्ध आजी-आजोबांना चॉकलेट देऊन चॉकलेट डे साजरा केला.


५. ती सात महिन्यांची गर्भवती होती , जेव्हा तिचा नवरा कारगिल युद्धात शहीद झाला. पण जाताना त्यांनं एक वचन मागितलं होतं तिला, "आपलं होणार बाळ पण तु भारतीय लष्करातच पाठवशील." आता तिची मुलगी भारतीय वायुसेनेत फायटर प्लेन चालवते. नवऱ्याला दिलेलं प्रॉमिस तिने पूर्ण केलं आहे.


६. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तो आखाती देशात अडकला होता. भारत सरकारच्या विशेष विमानाने जेव्हा तो मायभूमीत परतला, तेव्हा जमिनीला आलिंगन देऊन , त्याने त्याचा हग डे साजरा केला.


७. ती स्वतः एक प्रसिद्ध बालरोगतज्ञ. पण तरीही जन्मल्यानंतर काही महिन्यांनी तिच्या मुलाला मल्टिपल डिसऑर्डर झाल्या. ती सतत तीन-चार वर्ष आपल्या मुलाला सांभाळत, अनेक गोष्टी त्याला शिकवत होती आणि एक दिवस अचानक त्याने ,"आय लव यू मम्मा" म्हटलं तोच तिचा व्हॅलेंटाईन डे होता.



फोटो साभार गुगल

🎭 Series Post

View all