सुख - दुःख

Article On Life

सुख हे क्षणभंगूर असते. प्रत्येकाला दु:ख असते. गरिबांना दु:ख असते आणि श्रीमंतांनाही दु:ख असते. जरी तो खूप श्रीमंत जरी असला जरी अमाप संपत्ती त्याच्याकडे असली तर त्याला सर्व सुख मिळाले असे होत नाही. पैशाने सर्व सुख विकत घेता येत नाही. श्रीमंत माणूस कोणत्या ना कोणत्यातरी कारणाने दु:खी असतो. पण गरिबांना अनेक प्रकारची दु:ख असतात. दु:ख कसे झेलावे हे त्यांना माहित असते. गरिब माणसे समाधानवृत्तीचे असतात. जे आहे त्यातच समाधानी आहे असे ते मानतात. त्यामुळे ते श्रीमंतांपेक्षा जास्त सुखी असतात. जीवनात आपल्याला सुख मिळविण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागते.

माणसाला कोणतेही दु:ख आले की, माणूस लगेच मरणाचा विचार करायला लागतो. त्याला ते दु:ख सहनच होत नाही. जगण्यात ज्या वेदना असतात त्या कमी असतात आणि मरण्यात ज्या वेदना असतात त्या असह्य असतात हे माणूस विसरतो. जगण्यात ज्या वेदना असतात त्यावर उपाय निघू शकतो पण मरण्यात ज्या वेदना असतात त्यावर कधीच उपाय निघू शकत नाही.

कोणी नावं ठेवलं म्हणून जीवन जगणं सोडायचं नसतं. लोकं नावे ठेवून दुसऱ्यांचे जीवन खराब करत असतात. 

 जीवन चांगल्यापरीनं जगता आले नाही तर ते जीवन नरकापेक्षाही वाईट असते.  जीवनाच्या वाटेवर फारच थोडी लोक साथ देणारी असतात पण मात करणारी लोक अनेक असतात. 

आपले दु:ख आपल्यालाच दूर करावे लागते. आपण जगात येताना एकटेच असतो आणि जगातून जातानाही एकटेच असतो. त्याप्रमाणे आपले जीवन जगण्याचा अधिकार हा आपल्या एकट्याचा असतो.

सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे...... ( देवरुख - रत्नागिरी )