हॅप्पी टेडी डे अहो..

Happy Teddy Day..?

अहो.. तुमच्यासाठी खास.. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे काहीतरी.. तर ऐका म्हणजे वाचा..



तू म्हणजे माझी प्रतिक्षा, 

तू म्हणजे माझी परीक्षा.. 

तू काय आहेस, ते सांगता येत नाही.. 

पण तुझ्याविना मी काय आहे, हे मला सांगावेसे वाटत नाही.. 


तू म्हणजे माझा ध्यास, 

तू म्हणजे चांदण्यांची आरास.. 

तू म्हणजे म्हणायला सर्वस्व माझं.. 

पण तू कोण आहेस माझ्यासाठी,

हे मात्र मला शब्दात व्यक्त करताच येणार नाही कधी.. 


तू म्हणजे प्रेमाची व्याख्या, 

तू म्हणजे पहिली प्राधान्यता..

पहिलं आणि शेवटचं प्रेम म्हणजे काय ते कळले नाही मला कधी, 

 पण प्रेमाचा उल्लेख होताच तू माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो, मला हेच महत्त्वाचे वाटते नेहमी.. 


तू म्हणजे मला हवाहवासा वाटणारा सहवास,

तू म्हणजे कधी भास तर कधी आभास.. 

तू म्हणजे देवाने फक्त माझ्यासाठीच निर्मिलेले रिझर्व्ह असलेलं गिफ्ट, 

ज्यावर फक्त माझाच हक्क असेल, हे सिद्ध करण्याची मला गरज नाही.. 


तू म्हणजे माझी हक्काची जागा.. 

तू म्हणजे माझं मन सहज ओळखणारा धागा.. 

तू म्हणजे तूच आहेस, 

तुला शब्दात व्यक्त करणं जरा अवघडच आहे.. 


तू म्हणजे डिव्हाइन, 

तू म्हणजे माझा हक्काचा व्हॅलेंटाईन.. 

तू म्हणजे माझा प्रिन्स कधी तर कधी राजे, 

ज्याच्या भेटीची ओढीने या निरागस राणी सरकारची झोप भुर्र झाली आहे.. 


तू म्हणजे माझा हक्काचा टेडीबियर, 

तू म्हणजे माझ्या प्रेमाचा, माझ्या सुखदुःखाचा ब्रॅंड ऍंबेसिडर.. 

खरंच तू म्हणजे माझे होणारे अहो.. 

ज्याच्यासोबत आयुष्य जगण्यासाठी वाट बघतेय ही वेडी बायको.. 


तू म्हणजे तूच आहेस, 

ज्याचं माझ्या मनावर राज्य आहे.. 

तू म्हणजे स्वप्न नव्हे, 

तू म्हणजे माझं विधिलिखित आहे..

मला पूर्णत्व प्राप्त करून देणारं माझं भवितव्य आहे.. 


हॅप्पी टेडी डे अहो..

          तर मग कसं वाटलं आजचं गिफ्ट? आज गिफ्ट देण्याचं कारण असं की, आज बऱ्याच जणींची अपेक्षा असते ना, आजच्या दिवशी टेडी गिफ्ट म्हणून मिळावा पण मला जरा वेगळं हवंय.. कारण मीच वेगळी आहे ना.. त्यात माझ्यासाठी माझा टेडीबियर तुम्हीच आहात आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं की, मला आणखी काही वेगळं नको, कुणी दुसरा टेडीबियर नको.. मला फक्त माझ्या हक्काचे टेडीबियर असलेले फक्त तुम्ही हवे आहात.. म्हणून या भेटायला तुमच्या लाडाच्या एकुलत्या एक बायकोला.. कारण नेहमीप्रमाणेच वाट बघतेय ना मी तुमची..  आणि आणखी एक काळजी घ्या हा.. माझ्या टेडीबियरला काही झालेलं मला आवडत नाही हा.. म्हणून काळजी घ्या स्वतःची..  लव्ह यू अहो खूप सारं... मिस यू खूप सारं.. 

 

तुमची होणारी हक्काची बायको..