ठिकाण म्हटले म्हणजे विशिष्ट जागा,स्थान, स्थळ होय.म्हणजेचं घर,मंदिर, शाळा,बागबगिचा,कार्यालय, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे इ.इ.
आपण जिथे राहतो,काम करतो,काहीतरी हेतूसाठी जिथे जातो, ते म्हणजे ठिकाण...
आपले वास्तव्य जिथे राहते ते आपले ठिकाण.
आता आवडीचं ठिकाण म्हणजे काय?
जिथे गेल्यावर आपल्याला आनंद मिळतो,मन उल्हासदायी होते,दुःखांचा विसर पडतो,जीवन जगण्यास चैतन्य मिळते ते म्हणजे आवडीचं ठिकाण!
बहुतेकांना आपले स्वतःचे घर आवडीचं ठिकाण वाटतं.त्यातही विशिष्ट जागा जास्त आवडते.जसे- घरातील देवघराजवळ,बाल्कनीतील बाग,झोपाळा,आरामखुर्ची वगैरे वगैरे.
व्यक्ती परत्वे आवडीचे ठिकाण वेगवेगळी असू शकतात.
आध्यात्मिक लोकांना धार्मिक ठिकाण, निसर्ग प्रेमी लोकांना निसर्गरम्य ठिकाण, वाचनवेड्या लोकांना वाचनालये आवडतात.
एखाद्याचे आवडीचे ठिकाण हे दुसऱ्या ला आवडेल चं असे नाही.
शक्यतो सर्वांनाच निसर्ग रम्य ठिकाणे आवडतात म्हणून कामाचा शीण घालवण्यासाठी लोक निसर्ग रम्य ठिकाणी जातात. सर्व दुःखे, नैराश्य विसरून आनंद घेतात आणि नव्याने कामांना सुरुवात करतात.
सासरी गेलेल्या मुलीला माहेर हे चं आवडीचं ठिकाण ...कारण माहेरी आल्यानंतर तिला एक वेगळाचं आनंद होत असतो आणि माहेरच्या प्रत्येक गोष्टीशी तिचा भावनिक संबंध जडलेला असतो.
नोकरी,व्यवसाय या निमित्ताने परगावी गेलेल्या व्यक्तींना आपले स्वतःचे गाव आवडीचं ठिकाण वाटतं...कारण
गावातील घर,शाळा,सखेसोबती या सर्वांशी असलेला जिव्हाळा..
भौगोलिक ठिकाणांतून तर आनंद मिळतोचं पण अशी काही स्थानं,ठिकाणं असतात जिथे आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही, सुरक्षित वाटते,रडावेसे वाटते,मनातले बोलावेसे वाटते ते म्हणजे आईची कुशी,वडिलांची मिठी,गुरुंचे चरणस्थान,खऱ्या मित्रमैत्रीणींचा खांदा आणि life partner चा सहवास.
जसे पक्षिणी शत्रूपासून बचाव करण्यासाठी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली सुरक्षित ठेवते.त्या पिलांना ती जागा जशी सुरक्षित वाटते तसे आपल्याला ही अशा ठिकाणांची गरज भासते.
ऊन,थंडी, पाऊस यापासून वाचण्यासाठी मनुष्य,पशु,पक्षी हे सर्व सुरक्षित जागा शोधतात.
आणि प्रत्येक जण आपल्या निवाऱ्याची सोय करतो.
आयुष्यात अशी अनेक संकटे येत असतात जेव्हा भावनांचा कोंडमारा होत असतो,जीवन नकोसे वाटते तेव्हा आपण असेचं सुरक्षित ठिकाण शोधत असतो जिथे आपण आपल्या भावना, सुख-दुःखे,सगळे काही मनमोकळे बोलू शकतो.
जीवनात आपल्याला अनेक नाती मिळत असतात. आई-वडील, भाऊ,बहीण,आजी आजोबा, मामा,मावशी, काका,गुरूजन,मार्गदर्शक, मित्र-मैत्रीणी,पती,पत्नी,मुले अशी सर्व.
पण या सर्वांशीचं आपण सगळ्याचं गोष्टी share नाही करत.कोठेतरी असुरक्षितता, संकोचपणा वाटतो.
आपल्याला कोणी समजून चं घेतले नाही तर ...
आपण जे सांगतो आहे त्याचा इतरांनी गैरफायदा घेतला तर....
जर समोरच्या व्यक्तीने आपल्याला काहीचं मदत नाही केली तर....
असे अनेक प्रश्न येतात आणि आपल्यामुळे इतरांना त्रास,दुःख होऊ नये असे ही वाटते .
पण भावनांना दाबून ठेवले तर दुःख कमी होण्याऐवजी समस्या वाढतात.
अनेक व्यक्ती व्यसनाधीन होतात,मानसिक दृष्टीने आजारी पडतात, आत्महत्या करतात ,हिंसक बनून अपराध ही करतात.
म्हणून आयुष्यात आपल्याला असे एक तरी ठिकाण असावं जिथं आपण निःसंकोचपणे सर्व बोलू शकतो, आपल्या भावनांना समजून घेतलं जातं,प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि जीवन जगण्यास उत्साह मिळतो.मगं हे आवडीचं ठिकाण प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपात मिळू शकतं.
आजच्या स्वार्थी जगात आपल्या कमजोरीचा,मजबुरीचा फायदा घेणारे स्वार्थी लोक ही असतात म्हणून समोरची व्यक्ती किती विश्वासाची आहे हे ही महत्त्वाचे...

अपमानापेक्षा जिथे मिळतो मान
दुःखाऐवजी जिथे मिळते सुख
ते असते आवडीचं ठिकाण...
प्रश्नांना जिथे मिळते उत्तर
समस्यांचे जिथे होते निराकरण
ते असते आवडीचं ठिकाण...
समस्यांचे जिथे होते निराकरण
ते असते आवडीचं ठिकाण...
चांगल्या गुणांचे जिथे होते कौतुक
दोषांचे जिथे होते निवारण
ते असते आवडीचं ठिकाण...
दोषांचे जिथे होते निवारण
ते असते आवडीचं ठिकाण...
प्रेम, विश्वास जिथे मिळते
सुरक्षितता, निःसंकोचता जिथे जाणवते
ते असते आवडीचं ठिकाण...
सुरक्षितता, निःसंकोचता जिथे जाणवते
ते असते आवडीचं ठिकाण...
जीवनातील नैराश्य जिथे संपते
जगण्यास नवसंजीवनी जिथे लाभते
ते असते आवडीचं ठिकाण...
जगण्यास नवसंजीवनी जिथे लाभते
ते असते आवडीचं ठिकाण...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा