Happy mother's day सासूबाई

This is my first blogg with Ira. And I wants to dedicate it to my mother in law. She is the person behind my all success. N yes she is backbone of our family.

Happy mother's day to सासूबाई. 

       काय ? वाचायला वेगळं वाटत ना? पण मला त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत.  हो मी fb insta वर नाही टाकले स्टेटस. पण हा इरा चा पहिला blog  मी त्यांचा साठी लिहत आहे.  

       मम्मी...  माझ्या मम्मी.  मी लग्न होऊन सासरी आले अन त्या माझ्या पण मम्मी  झाल्या.  माझ्या सारख्या वेंधळ्या मुलीला सून म्हणून सांभाळणं अवघड.  त्यात मी शीघ्रकोपी.  कायम हॉस्टेल ला राहिलेली त्यामुळे घरकाम अन स्वयंपाक नं येणारी मी.  म्हणजे माझी स्वतः ची आई मी सुट्टी मध्ये  घरी आले कि पहिले 2-3 दिवस जाऊ द्यायची पण 3-4 थ्या दिवशी मात्र रोज सकाळी व रात्री,  मी किती लेट उठते,  काही मदत करत नाही,  नीट राहात  नाही, लगेच कशी चिडते,  अशा एक ना अनेक तक्रारी करत व याचा शेवट तुझी सासू माझा रोज उद्धार  करेल या वाक्यानं होत.

      पण माझ्या सासूबाई म्हणजे च माझ्या मम्मी  यांनी मला लग्न झाले कि पहिल्याच आठवड्यात क्लिनिक मध्ये पाठवले.  वर confidently सांगितलं कि मला जेवढ जमेल न जो पर्यंत जमेल तो पर्यंत मी घर सांभाळेल.  पण तू दवाखान्याकडे लक्ष दे.  हेच दिवस असतात सेटल होयचे, घरकामं काय ऍडजेस्ट होईल पण कॅरिअर ऍडजेस्ट करून जमणार नाही. 

       अशा माझ्या मम्मी काळा च्या पुढे आहेत. उच्चशिक्षित आहेत पण राहणी मात्र एकदम साधी.  कधी मी त्यांना पार्लर किंवा शॉपिंग ला घेऊन गेले तर आठवडाभर माझं कौतुक करणार.  सणा ला पुरणपोळी केली तर (प्रत्यक्षात मी लग्ना नंतर च स्वयंपाक शिकत आहे, मग तो कसा होत असेल ते तुम्ही समजून घ्या. ) कौतुक करणार.  आई च्या पोटातून कोणी शिकून येत नाही असे म्हणणाऱ्या मम्मीनं च्या हाताखाली मी हळू हळू सर्व शिकत आहे. 

        मम्मीनं बद्दल लिहिण्या सारखे खुप आहे..  कधी नारळ फोडला तर पाणी माझ्या साठी बाजू ला काढून ठेवणे,  माझी न आवडती भाजी असेल तर माझ्या साठी बेसन पिठा ची पोळी बनवणे  घरात  कोणालाच टोमॅटो आवडत नाही पण माझ्या साठी आवर्जून टोमॅटो घातलेले पोहे करणे या असंख्य लहान मोठ्या गोष्टी वरून त्यांचे प्रेम दिसून येते.  

     मला जन्म नाही दिला म्हणून काय झाले ? माझ्यावर स्वतः च्या मुलीप्रमाणे प्रेम करणाऱ्या माझ्या सासूबाईंना मातृदिना च्या खुप खुप शुभेच्छा!!