Happy Kiss Day Aho..

Happy Kiss Day Aho..

अहो..तुमच्यासाठी खास..


तुझ्या ओठांनी 

माझ्या ओठांना स्पर्शावे.. 

मनात दाटलेल्या भावनांना

 व्यक्त आज करावे.. 


त्या स्पर्शात 

दोघांनीही ओलेचिंब भिजावे.. 

पहिल्या प्रेमाच्या

त्या पहिल्या स्पर्शाला आज मनसोक्त अनुभवावे.. 


विरहातील प्रेमाची 

या स्पर्शाने उकल व्हावी.. 

या दुराव्यातील मिलनातून

 प्रेमाला आपल्या आज नवी पालवी फुटावी.. 


या गुलाबी क्षणांची 

ही सांज उजळावी.. 

या मिलनाची साक्षी

सारी सृष्टी आज व्हावी.. 


एकांताच्या या क्षणी 

तुझ्या मिठीत बंदिस्त मी असावे.. 

ओठांत ओठ मिसळून 

बेभान आज व्हावे.. 


क्षणोक्षणी तू माझ्यावर 

प्रेमाचा वर्षाव करावा.. 

तुझ्या या प्रेमाला 

मीही आज प्रतिसाद द्यावा.. 


ह्या गुलाबी प्रेमाची 

गुलाबी ही सांज कधी ना ढळावी.. 

या प्रेमाच्या अलवार स्पर्शाने

नात्यास आपल्या आज मोहोर नवरा-बायकोची चढावी.. 


अहो..हॅप्पी किस डे.. 


           या पहिल्या प्रेमाचा पहिला स्पर्श मलाही अनुभवायचा आहे पण फक्त तुमच्यासोबतच.. आणि हा लग्नानंतरच.. म्हणून वाट बघणाऱ्या या भोळ्याभाबळ्या, वेड्याखुळ्या बायकोला अतिशय त्रास देणे, पिडणे थांबवून लवकर भेटायला यावे ही सक्तीची ताकीद देण्यात आहे.. म्हणून या लवकर.. आणखी काय बोलू, आज सुचेनासं झालंय म्हणून आज नाही बोलत काहीच.. पण हा तुम्ही मात्र काळजी घ्या.. लव्ह यू खूप सारं.. मिस यू खूप सारं.. 

तुमचीच होणारी हक्काची बायको..