हॅप्पी हग डे अहो..

Happy Hug Day Aho..

अहो.. तुमच्यासाठीच खास.. 


मला ओढ आहे

तुझ्या शब्दांची.. 

मला ओढ आहे

तुझ्या कवितांची.. 


मला ओढ आहे

तुझे मला साद घालण्याची.. 

मला ओढ आहे

तुझ्या गोड आवाजाची.. 


मला ओढ आहे

आपल्या पहिल्या भेटीची, 

मला ओढ आहे 

तुला पाहण्याची.. 


मला ओढ आहे

तुला अनुभवण्याची.. 

मला ओढ आहे

तुझा हात माझ्या हातात घेण्याची.. 


मला ओढ आहे

तुझ्यावर हक्क गाजवण्याची.. 

मला ओढ आहे 

तुझीच होऊन जगण्याची.. 


मला ओढ आहे

कातरवेळी तुझ्यात एकांत शोधण्याची.. 

मला ओढ आहे

तुझ्या प्रेमात आकंठ बुडण्याची.. 


मला ओढ आहे

तुझ्या सहवासाची.. 

मला ओढ आहे

माझं सर्वस्व तुला अर्पण करण्याची.. 


मला ओढ आहे 

माझं तुझं न म्हणता 'आपलं' म्हणण्याची.. 

मला ओढ आहे

तुझ्या घट्ट मिठीची.. 


मला ओढ आहे 

तुझ्या स्पर्शाची.. 

मला ओढ आहे

फक्त आणि फक्त तुझी.. 


अहो.. Happy Hug Day.. 


         पहिली मिठी, मिठीचा तो स्पर्श याची ओढ एका प्रेयसीलाच असते असं नाही ना.. माझ्यासारख्या होणाऱ्या अहोंची प्रतिक्षा करणाऱ्या बायकोलाही ओढ असतेच की.. म्हणून हॅप्पी हग डे अहो.. तर सांगायचं तात्पर्य हेच की, फक्त तुम्हाला भेटण्याचीच नव्हे तर तुमच्या मिठीत विसावण्यासठी ही मी वाट बघतेय.. तर या हा लवकर भेटायला या वेड्या बायकोला.. आणि काळजी घ्या.. लव्ह यू अहो.. खूप सारं.. मिस यू खूप सारं..


 तुमचीच होणारी हक्काची बायको..