Feb 23, 2024
अलक

दीपोत्सव त्यांचा

Read Later
दीपोत्सव त्यांचा

१. सारिका एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला होती,  पण सरकारच्या नियमानुसार तिची ड्युटी कोविड लसीकरण केंद्राला लागल्यावर , तिने काही सामाजिक संस्थांच्या मदतीने तिच्या शहरातल्या तृतीयपंथीयांच्या वस्तीत जाऊन कोविंड लसीकरणाचा उपक्रम राबवला....... अर्थातच धनत्रयोदशीच्या दिवशी.२. नवरा गेल्यावर मोठ्या हिमतीनं तिने बचत गटाच्या माध्यमातून गृह उद्योग सुरू केला. या वर्षी तिला नफाही छान झाला होता, त्यामुळे मुलांची शाळेची फी आणि इतर खर्चाची रक्कम वेगळी काढून, उरलेल्या पैशाने तिने काही कपडे आणि फराळ विकत घेतला आणि गावाबाहेरच्या "त्या बदनाम" वस्तीत जाऊन वाटला.३. गर्भ श्रीमंताचं त्याचं घराणं, रुढी-परंपरांचं ओझं वाहणार, या साऱ्या बेड्या तोडून त्यांनं सामान्य घरातल्या सामान्य मुलीशी प्रेमविवाह केला. अपेक्षेप्रमाणे घरच्यांनी संबंध तोडले पण कोरोना च्या दुसऱ्या लाटेत तो "गेल्यानं" , त्याच्या वडिलांनी आपल्या सुनेला आणि एका वर्षाच्या नातिला घरी आणून सुनेच्या हाताने लक्ष्मीपूजन करण्याचा निर्णय घेतला.४. नवरा कोविड सेंटरला ऍडमिट असताना घरच्या वृद्ध सासू-सासर्‍यांची आणि दोन्ही लहानग्यांची जबाबदारी तिच्यावर होती. त्या कठीण काळात सोसायटीतल्या "रामु भय्याने" तिची खूपच मदत केली. औषध, किराणा, फळं अगदी सगळी सगळी. या भाऊबीजेला "रामू भैययालाच" ओवाळायचा तिचा मानस आहे.५. दरवर्षी भाऊबीजेला न चुकता ती माहेरी जायची अगदी हटाट्नं! पण आता भाऊ "गेल्यानं" तिला माहेरी जावेसे वाटेना! मग नवऱ्याने सारी तयारी केली आणि तिला माहेरी घेऊन गेला. तिच्या विधवा वहिनीला म्हणाला "ताई हा तुमचा भाऊ एवढ्या दुरून आला त्याला ओवाळणार नाही का?"....... आणि साऱ्यांचे चेहरे आनंदानं खुलं ले.६. कोरोना काळात ती होम क्वारंटाईन असताना रखमानं तिला खूप मदत केली होती, स्वयंपाक , घरची साफसफाई , वाणसामान, औषध, फळ, तिच्यासाठी काढा आणि पाणी गरम करून देणे. खूप काळजी घेतली होती रखमा न तिची! म्हणूनच या दिवाळीत ती रखमाला आणि तिच्या मुलीला चार दिवस घरी थांबवून घेणार आहे माहेर पणासाठी. ७. त्या दोघांचा प्रेमविवाह, त्याच्या घरी सगळे सणवार पारंपारिक पद्धतीने साजरे केले जायचे, तर तिच्या घरी व्यक्तिपेक्षा , व्यक्तीच्या विचारांची आराधना व्हायची. अगदी दोन टोकाच्या वातावरणात ते मोठे झालेले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोघांनीही आपापल्या आईला गमावलेलं, म्हणूनच या लक्ष्मीपूजनाला त्यांनी लक्ष्मीच्या फोटो शेजारी दोघांच्याही आईचा फोटो ठेवून लक्ष्मीपूजन  केले.   मंडळी आपल्याला ही दिवाळी आनंदाची सुखसमृध्दीची आणि भरभराटीची जावो या सदिच्छांसह नमस्कार!   (सदर लिखान हे मोबाईल मधून केले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व) (मंडळी आपल्याला माझं लिखाण कसं वाटते ते नक्की कळवा आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आणि माझे लिखाण जर आपल्याला आवडत असेल तर मला नक्की फॉलो करा) 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//