दीपावलीच्या शुभेच्छा

दीपावलीच्या शुभेच्छा
लखलखत्या दिव्यांची आरास
सोबत रांगोळीची नक्षी खास
दिवाळीच्या सणा निमित्ताने
आनंदाचा लाभतो सहवास

नयनरम्य आकाश कंदिलासम
खुलून उजळाव्या तुमच्या ईच्छा
लाभो यशोन्नती, सुख, समाधान
दीवाळीच्या तुम्हास याच शुभेच्छा
----------------------
©® सौ. वनिता गणेश शिंदे