दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

Vachakanshi sanvad

नमस्कार वाचकहो ,

ईरा मुळे तुमचे आणि माझे नाते घट्ट झाले .. वाचक लेखक म्हणून आपल्यात एक  नाते निर्माण झाले .. मी लिहलेल्या कथा वाचकांनी वाचल्या आणि पसंत केल्या .. वेळो वेळी  तुमच्या मिळणाऱ्या कंमेंट्स मुळे मला पोच पावती मिळत गेली आणि नव नवीन विषय हाताळून काल्पनिक कथा मी लिहत गेले .. आज मी इथे सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा  देण्यासाठी आले आहे ..हि दिवाळी सर्वांना आनंदाची भरभराटीची जावो ..तुम्हांला आणि  तुमच्या कुटुंबियांना सुखकारी जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना .. 

तसेच सर्वांना  मना पासून धन्यवाद देते , आभार मानते कि तुम्ही देत असलेल्या उत्स्फुर्त कमेंट्स मुळे माझ्यातला लेखक जिवंत आहे ..काही वाचक न चुकता रोज कमेंट्स करतात .. काही वाचक तर एकदम मैत्रिणीचं झाल्या आहेत .. खूप छान कमेंट्स तर देतातच .. मला गाणी सुचवतात .. कधी काही पटले नाही तर ते हि सांगतात ..काही आवडले तर मन भरून  कौतुक पण करतात .. तर असे हे आपले नाते  अजून घट्ट व्हावे .. तुमचा वाचक म्हणून वरदहस्त माझ्यावर नेहमी रहावा अशीच ईच्छा मी व्यक्त करते .. 

माझी  मैत्रीण धनश्री शिरसाठ , पूजा अडेप , निशा माहिरे , अनिता कासट , सामिका पानसरे , गौरी महाडिक , स्नेहल  वैद्य , प्रीती बाजीराव , स्न्हेहा चुनरकर , वैशाली भारंबे , मंगेश देशपांडे सर , दीपाली कवठणकर , रश्मी सपधरे , अर्चना येदागे , स्वप्ना चाफेकर . रेवती वेरूळकर , सुहासिनी विप्रदास , त्रिवेणी , सोनाली पुसलेकर , रचना राजेश भोरुंडे ,सुवर्णा राजपूत ,स्न्हेहल तापडिया , सचिर कुटे . राजनंदिनी , अमृता , प्रिया पाटील , वैशाली जंगम , मंगला , वृषाली कटलर. मधुरा किजबिले ,शोभा नागरे , सरिता वाडकर - पवार , अर्चना आढाव , काजल असवर, पूजा , माधुरी रणदिवे , अस्मा खान मुजावर , सिधिका कोडे , सुचिता  धनराज वाले . प्रियांका गुप्ते , शिल्पा कांबळी  असे अनेक वाचक रोज च्या रोज कमेंट करतात .. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते .. असेच वाचत रहा आणि कमेंट करत रहा .. 

अजून असे बेरच वाचक आहेत जे वाचतात पण कमेंट करत नाहीत .. मी सर्वांना विनंती करते कि तुमची एक छोटीशी कमेंट हि मेजवानी मिळाल्या सारखी आम्ही लेखक  घेत असतो .. कुणीतरी आपल्या केलेल्या कामाची दखल घेतली याचा  आनंद होतो .. तर वाचल्यावर नक्की छोटीशी कमेंट लिहण्याचा प्रयन्त करा .. 

कोणाचे नाव जर चुकीचे लिहले गेले असल्यास क्षमस्व .. कोणाचे नाव राहिले असल्यास तरी क्षमस्व .. तुमचे माझ्या लिखाण वरचे प्रेम असेच अबाधीत राहू दया . पुन्हा एकदा सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद 

 ईरा टीम आणि ईरा च्या संचालिका संजना मॅडम चे हि मनापासून आभार .. 

पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

सौ. शीतल माने