Login

झाले बहू होतील बहू परि यासम हाच !

Happy Birthday

नामदेव पाटील, लेखक विश्वातील लोकप्रिय नाव. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या नामदेव सरांशी ईरा स्नेहसंमेलनाला प्रत्यक्ष भेट झाली होती. या अल्पशा भेटीतच सरांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. स्नेहसंमेलनासाठी त्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात ईरासंदर्भात शब्द लिहून आणलेले, सोबतच कार्यक्रमाची रूपरेषा अत्यंत सुबकरित्या लिहून आणली. मनापासून एखाद्या व्यासपीठाबद्दल आणि तिथल्या लेखकांबद्दल आपुलकी वाटणारे नामदेव सर. त्यांचे सुंदर हस्ताक्षर हे त्यांच्या सुंदर मनाचेच प्रतिबिंब.
वेगवेगळ्या गुणांनी समृद्ध असलेली वेगवेगळी माणसं आपण बघतो, पण सर्व सकारात्मक गुण एकाच व्यक्तीत जिथे स्थिरावतात तेव्हा नामदेव सरांसारखं व्यक्तीमत्व जन्माला येतं.
असंख्य लेखकांचे वाढदिवस संस्मरणीय करणाऱ्या, मदतीस सदैव तत्पर असणाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत सामाजिक कर्तव्ये पार पडणाऱ्या श्री. नामदेव पाटील यांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.