तेजस्वी, तडफदार आणि प्रतिभावंत अशी शब्द ऐकली की काही माणसांचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहतात, त्यातलाच एक चेहरा म्हणजे श्री. सारंग शहाजीराव चव्हाण. ईरा प्रशासकीय समितीमधील हरहुन्नरी लेखक आणि व्यवस्थापक. आपल्या तत्वांशी प्रामाणिक असणारे, मदतीस सदैव तत्पर असणारे, कौटुंबिक तसेच सामाजिक जबाबदारी कणखरपणे पेलणारे, भाषेवर प्रभुत्व असणारे आणि आपल्या मिश्किल, हजरजबाबी स्वभावाची अधूनमधून चुणूक दाखवणारे सर्वांचे लाडके आदरणीय सारंग सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.