जन्मदिवस शुभेच्छा

Happy Birthday dear Meenakshi!!!

प्रिय मिनाक्षी, 

प्रथमतः वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा!

आजच्या दिवशी माझ्या मनातले काही खास तुझ्यापुढे उघड करतेय.. ईराच्या माध्यमातून….

तर कशी सुरुवात झाली ह्या मैत्रीची कहाणी…. 

ईरा ॲपवरून लेखकांच्या मुलाखतीचे व्हिडीओ प्रसारण सुरू झाले आणि एक एक नवनवीन लेखकांच्या मुलाखती पेजवरून प्रसारित होऊ लागल्या. 

त्यातच एका मुलाखतीने माझे लक्ष वेधून घेतले. 

वयाने सिनियर, प्रदीर्घ काळ लिखाणाच्या विविध माध्यमांतून लिखाणाचा अनुभव गाठीशी असलेली, मृदू भाषी, अतिशय शुद्ध उच्चारण आणि तरीही कसलाही गर्वाचा लवलेशही नसलेली जमिनीवर पाय टिकून असलेली ही गोरी,घारी, सुंदर, तजेलदार सिद्धहस्त लेखिका कोण बरं आहे ??

माझी तिला अजून जाणून घेण्याची उत्सुकता प्रचंड जागृत झाली. पूर्ण मुलाखत दोनदा ऐकली आणि पाहिलीही आणि मग मनाने काही ठरवले. 

फोन करून अभिनंदन करण्याहेतूने लेखिकेचा संपर्क शोध सुरू केला.

 ईराच्या एकाही गृपवर ह्या महोदया सापडायला तयार नाही. 

जेव्हा एखादी गोष्ट सहजगत्या मिळत नाही तेव्हाच ती अमूल्य असते ही खुणगाठ मनाला पटली आणि लगेच मनाने तिला  मिळवायचे  एफर्ट्स घ्यायला सुरुवात केली. मग काय, जमेल त्यांना कॉन्टॅक्ट करून नंबर मिळवायचा प्रयत्न सुरू झाला. ह्यात साधारण महिना गेला.

म्हणतात ना *Where there is will, there is way* त्याप्रमाणे एक दिवस अचानक आपल्या सर्वांचे ईरावरील लाडके जगन्मित्र आदरणीय #नामदेव #पाटील सरांचा सहजच फोन झाला. योगायोग पहा.., नेमका त्याच दिवशी सरांनी ह्या लेखिकेशी फोनवर संवाद झाल्याचे सांगितले आणि माझे काम अधिकच सोपे झाले.माझी ह्या लेखिकेचा नंबर मिळवण्यासाठीची धडपड ऐकून सरांनी लगेच त्यांचा नंबर दिला आणि मी फोन लावला. रींग जात होती त्याच वेगाने इकडे माझे ॠदय धडधडत होते. इतक्या मोठ्या लेखिका आपल्या सारख्या सामान्य लिखाण करणाऱ्या व्यक्तीशी बोलतील का?असे सगळे प्रश्न मनात घेऊन मी तिकडून फोन उचलण्याची प्रतिक्षा करत असतानाच एक गोड मंजूळ ध्वनी कानी पडला.

" हॅलोऽऽ, कोण बोलतेय? "

तिकडून साहजिकच प्रश्न आला. अर्थातच माझा अनोळखी नंबर डिस्प्ले झाल्याने तो प्रश्न होता. मग धीर करून मी सर्वात प्रथम व्हिडिओद्वारे दिलेल्या सुंदर मुलाखतीसाठी अभिनंदन केले आणि माझा परीचयही दिला. 

लेखिका बाई बहूतेक खूप घाईत असाव्यात कारण "*आत्ता मी जरा घाईत आहे.मी नंतर बोलते तुमच्याशी.*" 

असे बोलून त्यांनी फोन बंद केला. मोठी माणसे आपल्या सारख्या लोकांशी का बोलणार !!

*फोन उचलून दोन शब्दांची का होईना देवाणघेवाण झाली हीच काय ती आपली मिलकीयत*  समजून मी मनाचे समाधान करून घेतले.

त्यानंतर ती घटना मी पुर्णतः विसरून गेले आणि काही दिवसांनी अचानक एका नंबरवरून फोनची घंटी वाजली. स्क्रीनवरचे नाव वाचून अत्यानंदाने मी फोन उचलला. पहिल्या दोन तीन संभाषणानंतर ती मात्र लगेच म्हणाली

राधिका, मला *अहो जाहो* नको बाई करूस. मला फक्त *मिनाक्षी* च म्हण. आणि त्या दिवसानंतर ती माझी फक्त आणि फक्त मिनाक्षी झाली. माझी गोड जीवलग मैत्रिण. 

वयाचा अडसर आमच्या मैत्रीत कधीच आला नाही त्यानंतर. मग कधीही केव्हाही अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊ लागल्या. बघता बघता हे नाते कधी ॠदयस्थ झाले कळलेच नाही. 

आम्हाला कधीच वेळ, काळ, विषयांचे बंधन उरले नाही बोलण्यासाठी. काही वेळा तर अगदी सहजच आठवण आली म्हणून केला फोन इथपर्यंत ह्या नात्याची नशा वाढत गेली. 

मला अतिशय अभिमान वाटतो की मिनाक्षी तू माझी मैत्रीण आहेस. मी फार कमी लोकांशी अशी मैत्री करू शकते त्यापैकी एक तू आहेस. 

तुझा स्वभाव, तू आयुष्यात घेतलेले वेगवेगळे अनुभव, आणि त्यातून समृद्ध झालेली तूझी विचारसरणी, तरीही इतकी कोमल मृदूभाषी हे सगळेच खरंच खूप कौतुकास्पद आहे. 

आयूष्याच्या चेसबोर्डवर प्रत्येकवेळी समोरून आलेल्या परीस्थितीचा सामना करताना कधी तू सोंगट्यांतील हत्तीसारखी थेट चाल करून गेलीस, तर कधी मुलांच्या संगोपनासाठी उंटासारखी तिरकी चाल निवडलीस. कधी घोड्याप्रमाणे अडीच घर चालत समोरच्या संकटांना चेकमेट केलेस, तर कधी परीस्थितीची गरज ओळखून पॅद्याप्रमाणे एक एक घर पुढे सरकत अखेरीस वजीराची जागा पटकावलीस.

सगळ्या चाली चालून झाल्या. आता वेळ आलीय राजा बनून हुकूमत गाजवायची. 

खरोखर आता आयुष्याचा पुरेपूर आनंद घे. जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर जे जे कडू, गोड, आंबट, तिखट प्रसंग आले त्यांना सामोरे जाताना जे जे आयुष्यात करायचे राहूनच गेले असे वाटतेय ते सगळे ह्या एकाच जन्मात पूर्ण करून घे. 

तुझ्या राहिलेल्या सर्व स्वप्नांची पुर्तता होवो. ती सगळी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुला परमेश्वर खूप सारी सकारात्मक ऊर्जा प्रदान करो. भविष्यात तुझ्याकडून खूप चांगले उत्तमोत्तम लिखाण घडावे. पुस्तके तर छापून आलीच आहेत तुझी, पण वरचेवर तुझ्याकडून उत्कृष्ट साहित्य निर्मिती व्हावी आणि त्याची नोंद संबंध जगाने घ्यावी असे काही तरी उत्तूंग यश तुला मिळावे ह्याच माझ्या तुला तुझ्या जन्मदिनाप्रित्यर्थ शुभेच्छा आणि सदिच्छा.. 

अजून काय लिहू.

Just one thing, whenever you feel you need somebody beside you, just look back, I'll be there for you. No matter what, I ll be there to support you. 

With loads of love.. Wishing you a very Happy birthday dear Meenakshi.. 

तुझीच .....,

@राधिका

🎭 Series Post

View all