आनंद V/S सुख

आनंदी आनंद गडे


आपलं मन आपण स्वतः जपलं तरी खूप आनंदी राहू शकतो.हो

अगदी खरं आहे आपलं मन आपणच जपलं तर ते आनंदी रहाते


जर तुम्ही दुसऱ्या कडून याची अपेक्षा केली तर फक्त सुखी व्हाल

आनंदी नाही होणार कारण आनंद आणि सुख या दोन वेगळ्या गोष्टी

आहेत. सुखाच्या मागे माणूस नुसता धावतो परंतु तुम्ही स्वतः आनंदी

असाल तर कुठेही पळण्याची गरज नाही उलट आपोआप सुख

तुमच्या मागे धावेल. म्हणून कधीच सुखासाठी कोणावर अवलंबून

राहू नका कारण, दुसऱ्यावर कुठल्याही गोष्टीसाठी अवलंबून राहणे

म्हणजे स्वतःचे "स्व" पण विसरणे. जर का तुम्ही "स्व" पण

विसरलात तर मग आनंद ही हरवून बसाल जो तुमचा स्वतःचा आहे.

कारण दुसरा कोणीही तुम्हाला सुखी ठेऊ शकणार नाही.तुमचे सुख

तुमच्या हातात आहे.आणि तुम्ही मुळात आनंदी असाल तर दुसरा

आपोआप तुम्हाला बघून सुखी होईल त्यासाठी वेगळे काही

करण्याची गरज लागणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट किंवा कोणतेही

कार्य करताय तर ते मनापासून करा परंतु मनाला लावून घेऊन करू

नका म्हणजेच तुमचे मन तुम्हीच जपा.नसेल एखादे काम करायचे

नका करू परंतु उगाच दु:खी होऊन हाताश होऊन ते काम करू नका.

कारण चुकीची एनर्जी वातावरणात पसरण्या पेक्षा तुम्ही शांत

बसलेले बरे शांत राहून त्या मनाला सकारात्मक विचार द्या त्याला

शांत करा. लिहीत असाल तर ईरा वरती आपले मत व्यक्त करा,

एखादे चांगले गाणे ऐका किंवा तुम्हाला आवडते ते करा आणि

तुमच्या मनाला जपून त्याचा आनंद त्याला प्राप्त करून द्या कारण

स्वतःला आनंदी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.

एखाद्या वेळी वाईट वाटले काही चुकीचे घडले आणि मनाला त्रास

होत असेल तर आधी त्या घटनेचा स्विकार करा तुम्हाला त्रास होतो

आहे हे मान्य करा कारण ती घटना तुम्ही जेवढी नजरे आड

करण्याचा प्रयत्न कराल तेवढी ती घटना तुम्हाला त्रास देईल तेव्हा

त्या घटनेचा खूप विचार न करता ती महत्वाची नसेल तर सोडून द्या

किंवा काही काळाकरता वेळ जाऊ द्या . होऊ शकतं तुम्ही जेवढी ती

घटना गंभीर समजत असाल तेवढी ती नसेल किंवा काही समस्यांची

उत्तरे येणारा काळच देत असतो तेव्हा त्यावर तुम्ही जास्त विचार

करू नका . जेवढे तुम्ही त्या घटनेत गुंतुन जाल किंवा तुम्ही तुमचा

त्रास लपवून ठेवाल तेवढा तो वाढत जाणार परंतु तो तुम्ही कबूल

केला स्विकारला की तो नाहीसा होतो.कमी होतो म्हणजे एक प्रकारे

तुमच्या मनावरील ताण कमी होतो. कारण तुम्ही सक्रिय स्विकार

दर्शवला म्हणजे तुमच मन तुम्ही जपले म्हणून तुम्ही आज आनंदी

आहात.आता मन जपण म्हणजे तरी काय आपल्या सगळ्या गोष्टी

निट पचल्या की, मन जपलं जात आणि तस ही करुन काही वेळेस

गोष्टी किंवा काही प्रसंग नाही पचले तर नमन करावे किंवा सरळ

वमन करावे मन हलके करावे आणि आपल्या मनाची जपणूक

करावी. कधी कधी वमन करावे याने ही खूप बरे वाटते म्हणजे

आपल्या मनातील गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा मित्राला

सांगाव्या जो पूर्णपणे तुमचे ऐकून घेईल त्याची जपणूक करेल अशा

माणसाशी बोला नाही तर सरळ स्वतःशी गप्पा मारा कधी तरी किंवा

रोज दिवसभरात निदान 10 मिनिटे गप्पा मारून बघा म्हणजे तुमच्या

आत काय काय दडलेले आहे हे तुमचे तुम्हाला कळेल आणि तुमचा

आनंद तुम्हाला सापडेल आणि मग या बाह्य जगातील लोकांकडे

मिश्किल पणे बघून हसाल आणि म्हणाल हे सुख आहे जे कधीही

निघून जाईल.परंतु तुमचा आनंद कायम तुमच्या सोबत राहील.

आणि मग तुम्ही जगाला बदलणे सोडून स्वतःला बदलाल स्वतःशी

गप्पा माराल वेळ घालवण्यासाठी दुसऱ्याची वाट बघत बसणार

नाही. मनातला गोंधळ तेव्हाच वाढतो जेव्हा जगातल्या गोष्टीचा

आपण जास्त विचार करतो त्यात गुरफटून जातो म्हणून गोंधळ होतो

गुरफटून जायचे असेल तर स्वतः मध्ये गुरफटून जा स्वतःत हरवून

जा म्हणजे प्रत्येक वेळी नव्याने तुम्हीच तुम्हाला सापडू लागाल.

आणि तुमचा आनंद तुमच्या जवळ आहे. हे तुमच तुम्हाला कळेल

आणि किती आनंदी राहू शकता कोणत्याही कारणा शिवाय

कोणत्याही गोष्टी शिवाय हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही रमून जाल

  तुम्ही तुमच्यासाठी निर्माण केलेल्या आनंदात . नक्कीच घेऊन बघा

अनुभव आणि मग आनंदाने म्हणा, आनंदी आनंद गडे जिकडे

तिकडे चोहीकडे म्हणजे अगदी अस की, “आग लगे बस्ती मै हम

हमारी मस्ती मै” अशा प्रकारे तुम्ही तुमच्या दुनियेत आनंदी होऊन

जाता. स्वतः स्वतःच्या आनंदासाठी खपल्या शिवाय त्याला जपता

येणार नाही. खपणे म्हणजे काय तर आपल्याला आपल्या मनावरती

, स्वतः वरती काम करणे गरजेचे आहे. स्वतःला वेळ देणे गरजेचे

आहे. थोडी कसरत सकाळी मोकळ्या हवेत फिरणे. निसर्गाच्या

सानिध्यात रहाणे कधी तरी नेचर मध्ये आपल्या नेचरला घेऊन जाणे

. एक नेचर म्हणजे निसर्ग आणि दुसरे नेचर म्हणजे आपला स्वभाव

म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांना पुरक आहेत.म्हणून नेचरला नेचर

मध्ये घेऊन जाणे चांगले असते. म्हणून तर म्हणत असतील ,"तूच

तुझ्या जीवनाचा शिल्पकार !"कारण कोणीही कोणाच्या सुख

दु:खाला कारणीभूत नसतो जो तो आपल्या मार्गाने जात असतो.

तुमचे तुमचे विचार तुमची कृती तुमच्या सुख किंवा दुखाला

कारणीभूत असते. म्हणून तुमचा आनंद तुम्ही शोधा तुमचे छंद

जोपासा तुम्हाला काय आवडत ते करा हीच तुमच्या मनाची जपणूक आहे. आणि हाच तुमचा खरा आनंद आहे .

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,

आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदाचे ।। 

🎭 Series Post

View all