गुण्यागोविंदाने 1

तिला घटस्पोट हवाय
"संसारात लहान मोठा कुरबुरी होतच असतात, पण म्हणून अगदी टोकाचा निर्णय घेणं योग्य नाही"

साक्षीला समजवायला तिच्या नातेवाईकांची चांगली बैठक जमली होती. कोपऱ्यात तिची मामी आणि काकू आपापसात कुजबुजत होत्या..-"ही एक नंबरची नखरेबाज, कसा सहन करेल तो मुलगा? हिचीच चूक असणार"

साक्षी कुणाचंही ऐकत नव्हती. तिला तिच्या नवऱ्यापासून घटस्पोट हवा होता आणि ती या मतावर ठाम होती.

नातेवाईकांनी बरंच समजावलं, आणि तिला विचार करायला लावून निघून गेले. साक्षीच्या आईचं काळीज तुटत होतं. एकीकडे नवऱ्याचा हट्टीपणा, की मुलीला समजाव म्हणून आणि दुसरीकडे तिच्या पोटचा गोळा..दोन्ही बाजूंनी आईची ओढाताण व्हायची.

रात्री साक्षी तिच्या खोलीत खिडकीबाहेर एकटक पाहत बसलेली. आईला माहीत होतं की लेक झोपली नसणार, म्हणून आई तिच्या खोलीत गेली.

"साकु, झोपली नाहीस?"

साक्षीने मान वळवून दचकून पाहिलं आणि डोळे पुसले. ते बघून आईला जास्तच कळवळून आलं.

"पोरी, बाकीच्यांचं जाऊदे..मला नीट सांग..तुमच्यात परत काहीच होऊ शकत नाही का? काय अडचण वाटतेय तुला त्याची??"

"आई...संसार करायचा म्हणजे तडजोड करायची, काही ठिकाणी माघार घ्यायची एवढं कळतं गं मला..पण 24 तास केवळ तडजोड म्हणशील तर मला ते जमणार नाही..."
******

🎭 Series Post

View all