Oct 21, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ९)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ९)

 

 

    दुसऱ्या दिवशी  आठ वाजून गेले तरी सोहम अजून उठला नाही म्हणून सावी त्याला उठवायला गेली. सोहम अजून झोपलाच होता ती बेडरूममध्ये गेली आणि त्याला हलवत म्हणाली.

 

सावी,“ उठ सोहम आठ वाजून गेले आहेत! डॉक्टरने आराम करायला सांगितला आहे म्हणजे असे झोपायला नाही सांगितले! उठ आणि फ्रेश हो नाष्टा तयार आहे!”

 

           सोहम पडल्या ठिकाणीच डोळे उघडून सावीकडे आ वासून पाहत होता. त्याला प्रश्न पडला होता की रात्री इतके सगळे घडून  ही सावी आज काही झालेच नाही असे नॉर्मल कशी वागू शकते.सोहम तिला काहीच न बोलता पुन्हा कुस वळवून पांघरूण घेऊन पुन्हा झोपू लागला.हे पाहून सावी त्याचे पांघरूण काढून त्याच्या जवळ जात त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

 

सावी,“ लहान मुला सारख काय करतोस शोना उठ ना!” 

 

     आता मात्र सोहम उठून बसला आणि सावीला म्हणाला.

 

सोहम,“ हे बघ सावी तू असं माझ्याशी वागून मला आणखीन गिल्ट देऊ नकोस प्लिज!” तो तोंड पाडून नाराजीने म्हणाला.

 

सावी,“ पण कसलं गिल्ट रे?” तिने नकळल्यासारखे विचारले.

 

सोहम,“ तू मुद्दाम करतेस का हे सगळं?” त्याने चिडून विचारले.

 

सावी,“ आता मी काय केलं? आणि सकाळ-सकाळ उगीच चिडचिड करू नकोस!” ती नाराजीने म्हणाली.

 

सोहम,“ अच्छा तू काहीच करत नाहीस ना! काल रात्री इतकं सगळं झालं तरी तू नॉर्मल कशी? खरं तर माझं चुकलं…” तो पुढे बोलणार तर सावीने त्याच्या ओठांवर बोट ठेवले आणि ती त्याला म्हणाली.

 

सावी,“ तुझं काहीच चुकलं नाही सोहम आणि तरी तू रात्री sorry म्हणून झालंय! तुला गिल्टी वाटून घेण्याची काहीच गरज नाही! विसर सगळं कालच रात गयी! बात गयी!नवीन दिवस नवीन सुरवात! उठ आता आणि आवर!” ती त्याला समजावत म्हणाली.

 

सोहम,“ म्हणजे रात्री तू जागी होतीस तर! आज काल मी रोज नवीन सावी अनुभवतोय रोज एका नवीन सावीला भेटतो आहे!”तो तिला पाहत म्हणाला.

 

सावी,“ अच्छा! पण मला तर तोच जुना शोना भेटतो रोज!” ती हसून म्हणाली.

 

सोहम,“ इरिटेड करू नको मला तू ते शोना वगैरे म्हणून समजलं!” असं  तोंड फुगवूत म्हणून तो उठून बाथरूममध्ये निघून गेला.

 

       सावी मात्र त्याच्याकडे पाहून हसत होती. गेले  दोन-तीन दिवस सोहम आता सावीशी जरा बरा वागू लागला होता. पण अधून मधून त्याची चिडचिड सुरूच होती. सोहमच्या आईचा सावीला  फोन रोज येत होता.आज ही त्यांचा फोन आला सावीने फोन उचलला.

 

सावी,“ बोला आई!” ती म्हणाला.

 

नीताताई,“काय चाललंय सावी? ” त्यांनी विचारले

 

सावी,“ ठीक आहे सगळं सोहम ही बरा आहे आता अजून चार दिवसांनी रेग्युलर चेकअपला जायचे आहे!” ती सांगत होती.

 

नीताताई,“ अग हो हो! मी काय बब्बूची चौकशी करायला फोन नाही केला ग बेटा! तर  तुझ्याशी बोलायला फोन केला होता मी! तू कशी आहेस सोहम जास्त चिडचिड करतो का ग? तुला खूप त्रास देतोय का तो? तसं असेल तर सांग मी त्याची चांगली कान उघाडणी करते!” त्यांनी काळजीने विचारले.

 

सावी,“ नाही वो आई तसं काही नाही! सोहमची चिडचिड कमी झाली आहे.पण अजून ही थोडी फार करतो तो चिडचिड पण त्यात त्याचा दोष नाही उलट मला काळजी वाटते त्याची आज काल त्याचे मूड स्विंग वाढले आहेत. घडीत तोळा तर घडीत मासा असं चालू आहे सध्या या वेळी डॉक्टरांना या विषयी सविस्तर विचारणार  आहे! तुम्ही कशा आहात आणि बाबा?” ती बोलत होती.

 

नीताताई,“ म्हणजे त्याची चिडचिड अजून ही सुरू आहे तर! तू विचार डॉक्टरांना आणि काय ते मला फोन करून सांग!आम्ही ठीक आहोत. स्वतःला पण सांभाळ ग बाई!” त्या काळजीने बोलत होत्या.

 

सावी,“ हो आई तुम्ही नका काळजी करू” ती म्हणाली.

 

नीताताई,“ बरं सावी! दीड महिना होऊन गेला तुम्ही एकत्र राहता आहात आणि बब्बूच्या पायाचे प्लास्टर काढून ही दोन आठवडे झाले. मग काय झालं की नाही तुमच्यात की तो मूर्ख नुसता चिडचिड करण्यातच वेळ घालवतो?” त्यांनी खोडकरपणे विचारले.

 

सावी,“काय आई तुम्ही पण! तुम्हाला ही मीच भेटले का? काही झालं तर सांगेन तुम्हाला मी!” ती लाजून म्हणाली.

 

नीताताई,“ अग लाजतेस काय? तुमच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले आणि त्यातून तुमचे लव्ह मॅरेज आणि लाजतेस काय अशी? अग नवरा आहे तुझा तो त्याला मन्वयचा हा ही एक मार्ग आहेच की!” त्या हसून म्हणाल्या.

 

सावी,“ हुंम! बरं मी ठेवते फोन आता!” ती लाजून म्हणाली.

 

नीताताई,“ बरं बाई! लाजू नकोस! मी नाही विचारत काही! बाय!” त्या हसून म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला.

 

       पुढचे चार दिवस असेच गेले. या काळात सोहमचे मात्र दिवस भर लॅपटॉपवर काम सुरू होते. त्याला आता घरात बसून जमणार नव्हते.कारण ऑफिसला गेल्या शिवाय त्याची  कामे पूर्ण होणार नव्हती आणि त्याची बरीच कामे या काळात पेंडिंग होती. 

     आज सोहमचे रेग्युलर चेकअप होते. म्हणून त्याने डॉक्टरांना तो ऑफिसला जाऊ  शकतो का? विचारायचे ठरवले होते.तो तयार होऊन बसला होता. सावी तयार होऊन आली. सावीने आज सुंदर असा लेव्हेंडर कलरचा पटीयाला सूट घातला होता. तो तिच्या नितळ  गोऱ्या रंगाला खुलून दिसत होता.हातात मॅचिंग ब्रेसलेट एका हातात वॉच, लाईट मेकअप,टिकली आणि बांधलेले लांब केस! लांब केस खरं तर सोहमला आवडतात म्हणून तिने वाढवले होते. सोहम तिच्याकडे एक मिनिट पाहतच राहिला आणि तिच्या जवळ जाऊन त्याने तिचे केस सोडले. सावी त्याला नाराजीने म्हणाली.

 

सावी,“ काय सोहम? आता मला परत केस विंचरावे लागतील” असं म्हणून ती बेडरूमकडे वळली तर सोहमने तिचा हात धरून थांबवले आणि तो म्हणाला.

 

सोहम,“ राहू दे असेच छान दिसतात!”

 

       सावी काहीच बोलली नाही फक्त हसून होकारार्थी मान हलवली. दोघे ही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टरच्या केबिन मध्ये गेले. सोहमचे चेकअप करून डॉक्टर चेअरवर बसत म्हणाले.

 

डॉक्टर,“ it's good to see that Mr. Soham you are absolutely fine now!” ते म्हणाले.

 

सोहम,“ डॉक्टर तो मैं ऑफिस जा सकता हूँ कल से!” त्याने विचारले.

 

डॉक्टर,“ हाँ क्यों नहीं! बस एक बार आपके पैर का एक्सरे निकालकर देखे!” असं म्हणून त्यांनी इंटर कॉम वरून नर्सला बोलावले आणि सोहमला एक्सरे काढण्यासाठी तिच्या बरोबर पाठवले.

 

सावी,“डॉक्टर आपसे कुछ पूछना था! सोहम की तबियत के बरे में!”ती चिंतीत होत म्हणाली.

 

डॉक्टर,“ हाँ पूछिए!” ते म्हणाले.

 

सावी,“ डॉक्टर आजकल सोहम बहुत चिड़चिड़ा हो गया हैं! हाँ उसका चिड़चिड़ापन थोड़ा कम हो गया हैं।लेकिन मुड़ स्विंग बहुत हैं। पल में वो चिडता हैं पल में ठीक होता हैं।”तिने गंभीरपणे विचारले.

 

डॉक्टर,“ हाँ मैं समझ सकता हूँ आपकी चिंता but don't worry! ब्रेन पर सूजन की वजह से उनके बिहेवियर में ये चेंज हैं। वैसे सूजन तो उतर गई हैं लेकिन ब्रेन की चोट का असर कुछ दिनों तक रहेगा। धीरे धीरे उनका बिहेवियर नॉर्मल हो जाएगा। बस थोड़ा सब्र रखिये। वैसे आपकी देखभाल और प्यार की वजह से मिस्टर सोहम बहुत जल्दी रिकव्हर हो गए।लेकिन अब भी उन्हें मेंटल ट्रेस ना हो इसका ध्यान रखिये! बस और कुछ नहीं! ” डॉक्टरांनी सविस्तर सांगितले.

 

      तो पर्यंत नर्स आणि सोहम आले. एक्सरे मिळायला थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे सोहम आणि सावीला थोडं थांबावं लागणार होतं. तो पर्यंत सावीला केबिनच्या काचेतून ती पहिल्या दिवशीची नर्स म्हणजे गुरमीत दिसली. जिच्याशी तिची सोहम ऍडमिट होता त्या  महिना भरात चांगलीच मैत्री झाली होती.तिला पाहून सावी सोहमला मी आलेच असं सांगून तिला भेटायला गेली. सोहम आणि डॉक्टर दोघेच आता केबिनमध्ये होते. सोहम आणि डॉक्टर दोघे ही सावीला पाहत होते. सावी गुरमित बरोबर आपुलकीने हसून बोलत होती. तिला पाहून डॉक्टर सोहमला बोलू लागले.

 

डॉक्टर,“ मिस्टर सोहम आप बहुत लकी हैं आपको सावनी जैसी पत्नी मिली। सावनी  बहुत ही बहाद्दूर और होशियार भी हैं जिस दिन एक्सीडेंट हुआ उस दिन वो आपको सब की मदद से टाइम पर हॉस्पिटल ले आई। अगर थोड़ी देर और होती तो आपकी हालत और खराब हो जाती।  यहाँ पर भी उन्होंने बड़ी हिम्मत से अकेले ही सब संभाल लिया वैसे किसी भी पराये शहर में और राज्य में किसी भी अकेली औरत के लिए आपने पति को ऐसी हालत में देखना और उसके सही इलाज के लिए सही निर्णय लेना बहुत मुश्किल होता हैं। लेकिन आपकी पत्नीने सब कुछ अच्छे से संभाल लिया। आपके माता-पिता को और दोस्त को बुलाया। तब तक उन्होंने बड़े ही धीरज से काम लिया। नास्तिक होकर भी आपके किये वो आस्तिक बनकर प्रार्थना की!  जब आपके के माता-पिता को ये पता चला कि आपकी हालत क्रिटिकल हैं और कुछ कहा नहीं जा सकता तब आपके माता-पिता घबरा गए तब आपकी पत्नीने उन्हें ढाढस बँधाया।she is really love you! You are so lucky to have such brilliant, brave and loving wife!” ते साविच भरभरून कौतुक करत होते आणि सोहम त्यांचं ऐकत काचेतून नर्सशी बोलणाऱ्या सावीकडे पाहत होता.

 

               सावी गुरमित नर्सशी बोलून परत डॉक्टरांच्या केबिनमध्ये आली. तो पर्यंत वार्ड बॉय एक्सरे घेऊन आला. डॉक्टरांनी एक्सरे पाहिला आणि ते सोहम आणि सावीकडे पाहून म्हणाले.

 

डॉक्टर,“ मिस्टर सोहम वैसे तो आपके पैर की हड्डी अब जुड़ चुकी हैं।आप आराम से चल फिर सकते हैं। कल से आप ऑफिस जा सकते हैं। लेकिन भगा-दौड़ी मत किजिएगा। थोड़ा खयाल रखिए। अब बस आपको एक ही मेडिसिन लेनी होगी। अब एक महीने के बाद आइए!” ते प्रिस्क्रिप्शन लिहून देत ते म्हणाले.

 

सावी,“ thanks डॉक्टर!” ती हसून म्हणाली.

 

           सावी आणि सोहम घरी निघाले. सोहम सावीच्या  ड्रायव्हिंग सीट शेजारी बसून ड्राइव्ह करणाऱ्या सावीला फक्त एकटक पाहत होता. सावीला मात्र तो तिच्याकडे असं का पाहत आहे हेच कळत नव्हतं तरी तिने त्याला काहीच विचारले नाही.दोघे घरी पोहोचले.आज दुपारी जेवण करून हॉस्पिटलमध्ये गेलेले ते दोघे त्यांना घरी यायला संध्याकाळ झाली होती. सावीने फ्रेश होऊन चहा केला. सोहमने आणि तिने चहा घेतला. सावीने देवासमोर  सांजवात लावली आणि तिने हात जोडून डोळे झाकले. थोड्या वेळाने प्रार्थना करून तिने डोळे उघडले तर सोहम तिच्या शेजारी उभा राहून तिला पाहत होता. सावीने डोळ्यानेच त्याला काय असे विचारले तेंव्हा सोहमने तिचा हात धरून डायनींग टेबलच्या खुर्चीवर बसवले आणि तो ही खुर्चीवर बसून बोलू लागला.

 

सोहम,“ मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत सावी!” तो तिला पाहत म्हणाला.

 

सावी,“विचार ना!” ती म्हणाली.

 

सोहम,“ मी तुला त्या दिवशी ही विचारले होतो आज ही तेच विचारत आहे! हा देव्हारा!ही सांजवात हे सगळं काय आहे सावी तू देव केंव्हा पासून आणि का मानायला लागली.”त्याने तिला निरखत विचारले.

 

     सावी मात्र विचारात पडली की याला काय आणि कसे सांगावे. त्या दिवशी ही तिने हा प्रश्न टाळला होता. पण आज पुन्हा सोहमने तोच प्रश्न विचारला होता आणि सावीला माहीत होतं की जो पर्यंत त्याला समाधान कारक उत्तर मिळणार नाही तो पर्यंत तो हा विषय सोडणार नाही. म्हणून तिने त्याला काय ते सांगायचे ठरवले. खरं तर तिला ही  गोष्ट त्याला सांगायची नव्हती पण आज सांगणे भाग होते.

 

सावी,“ काय रे तेच तेच विचारतो! कालानुरूप आणि  परिस्थिती प्रमाणे माणसाच्या विचारात आणि आचारात बदल होत असतात तोच बदल माझ्यात झाला तर त्यात इतकं काय आश्चर्य! तुला ऐकायचंच आहे तर ऐक! तू हॉस्पिटलमध्ये होता तेंव्हा तुझी कंण्डीशन खूप क्रिटिकल होती डॉक्टरांनी अट्टेचाळीस तासांची मुदत दिली आणि हातवर केले मग काय माणूस शेवटी संकटात देवाचाच धावा करतो ना अगदी नास्तिक असला तरी मग मी ही तेच केलं आणि देवा समोर तुझ्यासाठी हात जोडून प्रार्थना केली.कदाचित माझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचली आणि तू  वाचलास मग बसली माझी श्रद्धा देवावर आणि मी नास्तिकची अस्थीक झाले. झाले तुझे समाधान!” ती भावूक होऊन बोलली आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी तिने पुसले.

 

सोहम,“  अच्छा म्हणजे हा बदल माझ्यामुळे झाला तर!” तो तिला पाहून म्हणाला.

 

सावी,“ तसं समज हवं तर! बरं झालं ना तुझं समाधान? आता जा उद्या ऑफिसला जायचं  आहे ना तुला मग तयारी कर जा! मला ही काम आहेत!” ती उठत म्हणाली.

 

सोहम,“ बस खाली अजून खूप काही विचारच आहे मला तुला!” तो तिचा हात धरून तिला पुन्हा बसवत म्हणाला.

 

सावी,“ आता आणखीन काय विचारायचे  आहे तुला? विचार?” ती त्याला म्हणाली.

 

सोहम,“ माझा एक्सिडंट झाल्यावर मी शुद्धीवर येई पर्यंत काय-काय घडले मला सगळे जाणून घ्यायचे आहे!” तो तिला पाहत म्हणाला.

 

सावी,“ आता हे काय नवीनच? हे बघ सोहम तू ते सगळं ऐकून काय करणार आहेस? आणि मला ते सगळं आठवायचं नाही आहे मला ते सगळं आठवलं की भीती वाटते अंगावर काटा उभा राहतो!” ती रडकुंडीला येत म्हणाली.

 

सोहम,“ तुला सांगावच लागेल आणि कशाची भीती वाटते ग तुला इतकी?” तो निर्विकारपणे म्हणाला.

 

सावी,“ तुझ्या डोक्यात हे खुळ कुठून आले रे?” ती वैतागून म्हणलाली.

 

सोहम,“ तू सांगणार का आता?” तो चिडून म्हणाला.

 

सावी,“ बरं ऐक तुझा एक्सिडंट झाल्यावर मी तुला तिथल्या लोकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेले.त्या नंतर  तुझ्यावर इलाज सुरू झाले. तुझी कंण्डीशन क्रिटिकल होती. म्हणून मग आई-बाबा आणि आदित्यला बोलावून घेतले. अट्टेचाळीस तास गेले असे-बसे आणि तू त्यानंतर ही पाच-सहा तासाने शुद्धीवर आलास.” ती म्हणाली.

 

सोहम,“ इतकच घडलं या व्यतिरिक्त काहीच नाही घडलं?” त्याने प्रश्न विचारला.

 

    सावीला सोहमला आदित्यने त्याच्या बद्दल जे काही तिला आणि आई-बाबांना सांगितले ते सांगायचे नव्हते कारण सोहमचीच अशी इच्छा होती की ते त्यांच्या पैकी कोणाला ही कळू नये. जर सोहमला आज कळले की आदित्यने त्याच्या आत्महत्या करण्याच्या विचारा बद्दल आणि पार्टी नंतर दुसऱ्या दिवशी काय काय झाले हे  तिला व आई-बाबांना सांगितले आहे. तर सोहम कसा रियाक्ट होईल हे सावीला माहीत नव्हते कारण त्याचं बिहेव्हीयर आजकाळ खूपच unpredictable झाले होते. म्हणून सावीने सोहमला शॉर्टकट मध्ये सगळं सांगितले होते. 

 

सावी,“ का अजून वेगळे काही घडायला हवे होते का तुला?” ती म्हणाली.

 

   सोहमला कळून चुकले होते की सावी त्याच्या पासून खूप काही लपवत आहे आणि काही झाले तरी ती त्याला हे सांगणार नाही.डॉक्टरने आज हॉस्पिटलमध्ये जे काय सावी बद्दल सांगितले होते त्यामुळेच त्याच्या मनात हे सगळे प्रश्न पिंगा घालत होते. त्याने त्याच्या प्रश्नांची उत्तरे आता आदित्य कडून घ्यायचे असे ठरवले व तो म्हणाला.

 

सोहम,“ नाही ग! बरं ठीक आहे मी उद्याची तयारी करतो!” असं म्हणून तो निघून गेला.

 

    सावीने मात्र सुटकेचा निःश्वास सोडला आणि ती किचनमध्ये वळली. आज डॉक्टरच्या सावीचे कौतुक करण्यामुळे सोहमच्या मनात मात्र सावी बद्दल असणारा राग बऱ्या पैकी निवळला होता कारण डॉक्टरने बोलेला शब्दनिशब्द  त्याला पटला होता. आणि त्याची परिणिती सोहमच्या मनात सावी बद्दलच्या ओढी मध्ये झाली होती. रात्रीची जेवणे झाली. सोहम लॅपटॉपवर त्याच काम करत होता. सावी किचन आवरून बेडवर येऊन कसलं तरी पुस्तक बेडला टेकून वाचत होती. ती ते वाचता वाचता तशीच झोपली. सोहमने त्याचे काम झाले म्हणून लॅपटॉप ठेवला आणि सावीकडे पाहिले तर ती पुस्तक तसेच हातात घेऊन बेडला टेकून झोपली होती. त्याने तिच्या जवळ जाऊन तिच्या हातातले पुस्तक अलगद काढून घेतले व बाजूला ठेवले आणि तिला तो हळूच मानेखाली हात घालून झोपवू लागला तर सावीची झोप चळवली आणि तिने डोळे उघडले तर सोहम तिच्या अगदी जवळ होता. इतका की त्याचा श्वास तिला तिच्या कपाळावर जाणवत होता. सोहमने तिला डोळे उघडलेले पाहिले आणि तिच्या कानात हळूच म्हणाला.

 

सोहम,“I need you!”आणि त्याने तिच्या ओठांवर अलगद ओठ ठेवले.

 

    सावीने ही तिला प्रतिसाद दिला पण  मागच्या अनुभवावरून सावी मनातून कुठे तरी घाबरली होती! पण तिने तसं काही न दाखवता ती अलगद त्याच्या मिठीत शिरली. पण या वेळी मात्र मागच्या वेळी सारख काहीच घडलं नाही आणि सोहम आणि ती किती तरी महिन्यांनी एकरूप झाले. आज किती तरी महिन्यांनी सावी सोहमच्या स्पर्श अनुभव होती आणि दोघे ही एकमेकांच्या सहवासात तृप्त होत होते. सोहम सावीला मिठीत घेऊन केव्हाच झोपला होता.  सावी अजून जागी होती. ती त्याचा समाधानी चेहरा न्याहळत होती. त्याला न्याहळत ती पुन्हा त्याच्या भूतकाळात पोहोचली.

 

           आज बारावीचा निकाल लागणार होता आणि सावी मात्र आतून बेचैन होती. या वेळी तिला टॉप करायचे होते. सोहम पेक्षा एक तरी टक्का तिला जास्त मिळवायचा म्हणून तिने वर्ष भर खूप मेहनत केली होती. सोहम मात्र निश्चिंत होता. कारण त्याची कोणाशीच स्पर्धा नव्हती. जो माणूस कोणाशीच स्पर्धा करत नाही त्याला कोणत्याही परिणामांची चिंता नसते.

 

डॉक्टरच्या बोलण्याचा सकारात्मक परिणाम सोहमवर दिसत होता पण तो सावीला स्वीकारण्यास पूर्ण मनाने तयार होईल का? सोहमला जेंव्हा कळेल की आदित्यने त्याच्या विषयी सगळं सावी आणि त्याच्या आई-बाबांना सांगितले आहे तेंव्हा त्याचे रियाक्शन काय असेल? भूतकाळात सावीला सोहम पेक्षा जास्त मार्क मिळाले होते का? आणि जी सावी सोहमला तिचा कट्टर प्रतिस्पर्धी समजत होती ती सावी सोहमच्या प्रेमात का आणि कशी पडली असेल?
 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule