A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907def232e4dbd33ab18489fa321981f8e67bc4f9bd9e8): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Hamsfars part 8
Oct 27, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ८)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ८)

 

         सोहमला बाहेर  जाऊन तास होत आला होता. सावीला आता चैन पडत नव्हते. सोहम तिला येतो मन आणि डोकं शांत झाल्यावर असे सांगितले होते पण तिला त्याची चिंता लागून राहिली होती.  एक तर तो खूप चिडून गेला होता आणि दुसरं त्याची तब्बेत म्हणावी तशी अजून ही ठीक नव्हती.म्हणून सावीने कपडे बदलले आणि ती घर लॉक करून बाहेर पडली. तिने गाडी काढली नाही कारण तिला गाडीतून सोहम दिसला नसता. ती पायीच निघाली. थोडं चालत गेल्यावर एक सुंदर असे गार्डन होते. तिथेच एका बेंचवर सोहम तिला बसलेला दिसला. त्याला पाहून सावीच्या जिवात जीव आला. हवेत चांगलाच गारवा होता.  ती त्याच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली.

 

सावी,“ घरी चल सोहम! जेवायची वेळ झाली आहे आणि चांगलीच थंडी पडली आहे”

 

     सोहम मात्र तिला काहीच न बोलता उठला आणि तो घराकडे निघाला. सावी त्याच्या बरोबर निघाली. दोघे ही घरी आले. तो पर्यंत नऊ वाजले होते. सावीने जेवण गरम केले आणि जेवायला घेतले. सोहम तो पर्यंत फ्रेश होऊन आला. सावीने जेवण वाढले. सोहम एक शब्द ही न बोलता जेवला. सावी नेमकं त्याच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होती पण सोहमच्या मूडचा तिला अंदाज येत नव्हता. सोहम जेवून बेडरूममध्ये  निघून गेला. सावी किचन आवरून बेडरूममध्ये गेली तर सोहम लॅपटॉपवर काही तरी काम करत बसला होता. सावीने त्याला काही न बोलताच मेडिसीन्स दिले आणि ती तिच्या जागेवर बसून कसले तरी मॅगझीन चाळत बसली. पण सावी रूममध्ये आल्या पासून सोहमची मात्र चुळबूळ सुरू होती. तो काही तरी बोलायची तयारी मनातल्या मनात करत होता.सावीच्या नजरेतून त्याची ही चुळबुळ सुटली नाही तरी ती तो काय बोलणार याची वाट पहात होती. तिने ठरवले होते की आता सोहमने जरी भांडण उकरून काढले तरी त्याच्या बरोबर भांडायचे नाही कारण आज ऑल रेडी सोहमला खूप जास्त स्ट्रेस आला होता आणि त्यांनी तो सहन ही केला होता. पण आता त्याला स्ट्रेस सहन होईलच हे मात्र सांगता येत नव्हते. कारण डॉक्टरांचे असे म्हणणे होते की सोहमला स्ट्रेस येईल असे काही ही करू नका कारण त्याच्या ब्रेनला झालेली इजा आणि त्यातून आलेली सूज जरी आता  नसली तरी त्याला काही दिवस जपणे क्रमप्राप्त होत. या सगळ्या विचारांच्या तंद्रीत सावी होती.त्यातच सोहमने हाक मारल्याने ती त्या तंद्रीतून बाहेर आली. सोहम बोलत होता.

 

सोहम,“ सावी ऐकतेस ना?” त्याने विचारले.

 

सावी,“ हे बघ सोहम जर तुला माझ्याशी भांडायचे असेल तर माझा मूड आता भांडण्याचा नाही आणि तुझे  जा जा वाल कॅसेट मला ऐकायचं नाही. मी झोपते आता तू ही झोप आजचा भांडणाचा कोटा ऑल रेडी पूर्ण झाला आहे.ठेव तो लॅपटॉप आणि झोप  आता!” ती काहीशी वैतागत म्हणाली.

 

सोहम,“ झालं तुझं बोलून! तुला असं का वाटतंय ग आज काल  की मी तोंड उघडले म्हणजे भांडायलाच उघडले?मला तुझ्याशी बोलायचे आहे आणि ते बोलल्या शिवाय मला झोप येणार नाही!” तो तिला पाहत म्हणाला.

 

सावी,“ बोल!”

 

सोहम,“ आज जे काही झाले त्यासाठी sorry!” तो खाली मान घालून तिला न पाहतच म्हणाला.

 

    एक मिनिट तर सावीला तिच्या कानावर विश्वासच बसला नाही पण दुसऱ्या क्षणी तिने आत्ता पर्यंत लावलेला कणखर असल्याचा मुखवटा गळून पडला आणि तिने सोहमला मिठी मारली आणि ती हुंदके देऊन रडत बोलू  लागली.

 

सावी,“ I am also sorry for everything!But I love you a lot!” असं म्हणून ती सोहमवर चुंबनाचा वर्षाव करू लागली.

 

      इतके दिवस तिने बांधून ठेवलेल्या भावनांचा आता कडेलोट झाला होता आणि तिला सोहमचा दुरावा आता असह्य झाला होता. त्यामुळे सोहम यावर कसा रियाक्ट होईल तिला झिडकारेल का?या गोष्टींचा विचार ही न करता ती त्याला बिलगली होती. सोहम ही वरून किती ही कठोर वागत असला तरी सावी  बद्दल त्याच्या मनात कुठे तरी प्रेम होतेच.शेवटी लोण्याचा गोळा आगी जवळ गेल्यावर वितळणारच ना! त्याने ही तिला आपल्या बाहू पाशात घेतले.

 

       दोघांच्या ही भावनांचा आवेग त्यांना एकमेकांच्या अधिकाधिक जवळ आणत होता आणि दोघे ही एकमेकांना सुखावण्याचा प्रयत्न करत होते. दोघांचा ही आवेग वाढत चालला होता आणि  सुखाच्या परमोच्च क्षणी सोहम त्याच्या वर वीज कोसळल्या सारखा सावी पासून वेगळा झाला आणि डोक्याला हात लावत उठून बसला. सावीला कळलेच नाही की सोहमला मध्येच काय झाले तिने उठून तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवत विचारले.

 

सावी,“ काय झाले सोहम? डोकं दुखतंय का?” ,तिने काळजीने विचारले

 

सोहम,“ don't touch me savi!” तो त्वेषाने तिचा हात झटकून म्हणाला.

 

सावी,“ पण झालं काय सोहम मध्येच तुला?” तिने आवंढा गिळत विचारले.

 

सोहम,“ सावी प्लिज!” तो ओरडला.

 

सावी,“ पण काय झालं सोहम! सांगशील का?”तिने शक्य तितक्या शांतपणे विचारले.

 

सोहम,“ मी काय तुझा असा फायदा घ्यायला आणि बायकोवर  समाज मान्य बलात्कार करायला कोणी नराधम नाही! सावी leave me alone!”तो ओरडला.

 

    सावीने सोहमवर काही महिन्यांपूर्वी जो शाब्दिक  वार केला होता त्याच शाब्दिक वाराने ती आज घायाळ झाली होती.शब्द म्हणजे दुधारी हत्यार असतात. समोरच्यावर आपण ज्या शब्दाने वार करतो तेच  शब्द आपल्याला ही घायाळ करतात. आज तिच्याच शब्दांनी सावी घायाळ झाली होती.सावीला सोहमला आणखीन स्ट्रेस द्यायचा नव्हता म्हणून ती उठली आणि डोळे पुसत हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसली. तिला आज सोहमवर काही महिन्यांपूर्वी जे शाब्दिक वार केले होते तो प्रसंग आठवला आणि ती पुन्हा भूतकाळात गेली.

 

       आज शनिवार होता आणि उद्या रविवार असल्याने दोघे  निवांत होते. सोहम आणि सावी रात्रीचे जेवण करून बेडरूममध्ये बसले होते. सोहम मोबाईल मध्ये काही तरी पाहत होता. सावी लॅपटॉपवर काही तरी काम करत होती.सावीची बोटे लॅपटॉपवर फिरत होती पण तिच्या मनात मात्र वेगळेच काहूर माजले होते.तिला आज तिच्या बॉसने झापले होते.खरं तर तिची चूक काहीच नव्हती. तिच्या टीम मेंबरची होती आणि तावडीत मात्र ती सापडली होती बॉसच्या! बरं हे सगळं ऑफिस सुटण्याच्या वेळी घडलं होत आणि सोहमला हे सगळं माहीत असण्याचा कारण नव्हतं कारण दोघे एकाच ऑफिसमध्ये एकाच डिपार्टमेंट मध्ये  काम करत असले तरी दोघे वेगवेगळ्या सब डिपार्टमेंट मध्ये होते.सोहम प्रोग्रामिंगच काम करत असे तर तर सावी कोडिंगचे काम करत असे. आज विनाकारणच सावीला बॉस कडून अपमान सहन करावा लागला होता. याच सगळ्या विचारात ती मग्न होती.त्यातच सोहम तिच्या जवळ येऊन तिच्याशी बोलत होता.त्याच्याकडे तिचे लक्षच नव्हते.तिने लॅपटॉप ठेवला. सोहम सवईने तिच्या जवळ आला होता.सावी ही त्याला यांत्रिकपणे प्रतिसाद देत होती.त्यामुळे सोहमने तिला खुलवायल सुरवात केली.

 

       पण अचानक सावीने सोहमला दूर ढकलले आणि ती त्याला म्हणाली.

 

सावी,“तुम्ही सगळे पुरुष एक जात सारखे! लग्न केलं की बायको म्हणजे तुम्हांला स्वतःची प्रॉपर्टी वाटते. तिला स्वतःच्या मर्जीने कधी ही आणि कशी ही वापरा आणि चुरगाळा! तुम्ही पुरुष याचसाठी लग्न करता का रे? लग्न झाले की पुरुष स्त्रीवर समाजमान्य बलात्कार करायला रिकामा!” ती त्वेषाने सोहमशी बोलत होती.

 

     सोहमच्या कानात मात्र तिचा एक एक शब्द शिशाचा रस ओतावा तास शिरत होता.त्याच मन तिच्या एका एका शाब्दिक वाराने घायाळ होत होतं.बरं त्याला हे ही कळत नव्हतं की त्याची चूक कुठे झाली. तो सावीच्या जवळ गेला तेंव्हा तिने ही त्याला प्रतिसाद दिला होता. त्या प्रतिसादाला त्याने तिचा होकार मानले होते. तो खूप जास्त हर्ट झाला होता.त्याच्या डोळ्याच्या कडा पाण्याने भरल्या होत्या. तो  उठला आणि हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन झोपला.

 

     सावीच्या तो पर्यंत लक्षात आले होते की तिने बॉसचा सगळा राग सोहमवर काढला आहे पण तो पर्यंत तिने सोहमला हर्ट केले होते. ती हॉलमध्ये सोहमची माफी मागावी व त्याची मनधरणी करावी म्हणून गेली तर सोहम तो पर्यंत झोपला होता.तिने ब्लँकेट आणून तिला पांघरले आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.थोडावेळ तशीच बसून राहिली आणि नंतर जाऊन बेडरूममध्ये झोपली.सगळी तिला जाग आली तेंव्हा आठ वाजले होते. ती बेडरूममधून बाहेर आली तर सोहम तिला सोफ्यावर पेपर वाचत बसलेला दिसला. सावी त्याच्या हातातून पेपर काढून घेत त्याच्या मांडीवर बसत त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफूण  बोलू लागली.

 

सावी,“I am really very sorry shona!मला माहित आहे की मी तुला काल रात्री खूप हर्ट केले.”

 

सोहम,“ o really you are feeling sorry for that?नव्हता तुझा मूड तर नाही म्हणायचे ना! लग्न होऊन आठ महिने होत आले आणि आपले रिलेशन तीन वर्षे जुने तुझ्यावर मी कधी तरी जबरदस्ती केली का ग सावी? तू तर मला डायरेक्ट बलात्कारी ठरवून रिकामी झालीस!” तो रागाने म्हणाला.

 

सावी,“ sorry ना खरं तर कोणाचा तरी दुसऱ्याचा राग तुझ्यावर निघाला रे sorry ना!” ती त्याच्या गालावर किस करत म्हणाली.

 

सोहम,“ म्हणजे?”त्याने विचारले.

 

सावी,“अरे! तो दाभोलकर सर आहे ना तो त्याने आज झापला आहे मला!खरं तर चूक माझी नव्हती संजूने कोडिंग मध्ये गडबड केली आणि या बाबाने झापला मला! मग काय खूप अपसेट होते मी पण तुझा आज मूड छान होता म्हणून नाही बोलले काही तरी खाल्लीच माती मी! Sorry ना!” ती म्हणाली.

 

सोहम,“ मी  काय अंतर्यामी आहे का मला हे सगळं माहीत असायला! पण तू जे बोललीस ते खूप चुकीचं होत सावी! I am really very Hurt!” तो तिला तोंड फुगवून म्हणाला.

 

सावी,“ आता अजून कशी माफी मागू तुझी! कान धरून sorry म्हणते sorry ना and I love you!”तिने खरच कान धरले.

 

सोहम,“ झाली का तुझं नाटकं सुरू! पहिल्यांदा वाट्टेल ते बोलायचं आणि नंतर हे असं cute face करून माफी मागायची!येडी कुठली!” तो हसून म्हणाला.

 

सावी,“ सॉरी!love you!” असं म्हणून ती त्याला बिलगली.

 

सोहम,“ तुझ्या डोक्यात असला कचरा येतोच कुठून ग?लग्न काय पुरुष बाईला वापरण्यासाठी करत असतो का? त्याला वासनाच शमवायची तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत की पुरुषाला ही आणि स्त्रीला ही त्यासाठी लग्नचं करायची काय गरज ग सावी? स्त्री-पुरुष लग्न एकमेकांना आयुष्य भराची साथ मिळावी म्हणून करतात. प्रत्येक माणूस प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम, माया, जिव्हाळा मिळवण्यासाठी लग्न केलं जातं. हा आता प्रजोत्पत्ती हा ही त्यामागे एक उद्देश असतो.  नवरा-बायकोच नात हळुवार फुलत असत. त्यात वासना नसते ग सावी प्रेम असत! पुरुष आणि स्त्री हे पुरुष आणि प्रकृतीचे प्रतीक असतात. ते एकमेकांच्या विरुद्ध नसतात तर ते एकमेकांच्या पूरक असतात. ते एकमेका शिवाय अपूर्ण असतात आणि एकमेका बरोबर ते पूर्ण होतात म्हणूनच तर स्त्रीला अर्धांगिनी म्हणतात ना! आणि हे असले समाजमान्य बलात्कार वगैरे शब्द कुठून सुचतात ग तुला असं काही नसतं आणि एखादा पुरुष असं करत असेल तर ते चुकीचे आहे. आणि तुझ्या या हार्ड डिस्क मधून हा कचरा काढून टाक रिसायकल बिन मधून पण डम कर तो!”  तो तिला मिठीत घेऊन समजावत होता.

 

सावी,“ I am lucky to have you! You are such a wonderful man! किती छान बोलतो रे तू असं वाटत ऐकत राहावं आणि तुला बरी इतकी माहिती स्त्री-पुरूष संबंधांबाबत! पण सगळेच पुरुष तुझ्या सारखे नसतात शोना! आणि सगळ्याच स्त्रीया माझ्या सारख्या लकी पण नसतात! I am sorry!” ती त्याला बिलगून म्हणाली.

 

सोहम,“ बास बास! उठ सावी माझे पाय दुखायला लागले आता तुझं वजन खूप वाढलय!” तो तिला मांडीवरून उठवत म्हणाला.

 

सावी,“ अच्छा! माझं वजन वाढलय तर! बरं चल ना!” ती सोफ्यावर बसत त्याला लाडाने म्हणाली.

 

सोहम,“ कुठे? तू जा चहा कर मी तो पर्यंत फ्रेश होऊन येतो नऊ वाजले बघ!” तो तिला घड्याळ दाखवत म्हणाला.

 

सावी,“ वाजुदेत आज कुठं जायचय आपल्याला! चल ना रात्रीचे काम करू आत्ता!” ती पुन्हा त्याच्या जवळ जात लाडाने म्हणाली.

 

सोहम,“ आत्ता! वेडी आहेस का तू जा चहा कर!आणि आता माझा मूड नाही!” तो उठून जात म्हणाला.

 

सावी,“चल ना सोहम!” 

 

      असं म्हणून सावीने सोहमला जवळजवळ ओढतच बेडरूममध्ये नेले आणि रात्री अर्धवट राहिलेला डाव पुन्हा रंगला. हे सर्व आठवून सावी रडता-रडता खुदकन हसली आणि भूतकाळातून वर्तमानात आली. ती विचार करत होती. आपण आपल्या माणसाला किती सहज काही ही आणि कसं ही बोलून जातो पण ते शब्द त्याच्या जिव्हारी लागून काट्या प्रमाणे मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात रुतून बसलेले असतात. जे आजाणतेपनी कधी तरी त्या माणसा कडून आपल्याला बोचतात. मुळात आपण आपल्या माणसाला असे शब्द देणेच चुकीचे जे काट्या सारखे मनात रुतून त्याच माणसाकडून आपल्याला परत बोचण्यासाठी!

     

      ती विचार करत सोफ्यावर डोळे झाकून पडली. पण काही केल्या तिला झोप लागत नव्हती.

 

      तिकडे बेडरूममध्ये सोहमची ही अवस्था वेगळी नव्हती. तो विचार करत होता की आपण सावीशी असे वागायला नको होते. ज्या भूतकाळातील चुकीची माफी तिने आधीच खूपदा मागितली होती आणि आपण ही तिला तेंव्हाच माफ केले होते. तीच चूक उकरून काढून तिला असं बोलणे आणि झिडकारने चुकीचे आहे. विचार करून त्याचे आता डोके दुखू लागले होते. त्याने हळूच बेडरूमचे दार उघडून पाहिले तर सावी सोफ्यावर थंडीमुळे आखडून झोपलेली त्याला दिसली. त्याने ब्लँकेट घेतले आणि सावीला पांघरून घातले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून तो म्हणाला.

  “ I am sorry savi!” 

 

     आणि तो पुन्हा बेडरूममध्ये जाऊन झोपला. सावी जागीच होती तिने ते ऐकले आणि गालात हसून ती झोपली.

 

सावीच्या भूतकाळत असं काय घडलं होत की तिच्या मनात असलेला पुरुषांबद्दलचा राग असा उफाळून येत होता? सोहम सावीला मागच सगळं विसरून पुन्हा स्वीकारू शकेल का?

  

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule