रात्रीची जेवणं झाली. सगळे झोपायला गेले.सोहमच्या आई म्हणजेच नीताताई सोहमच्या बेडरूममध्ये आल्या. सावी कपडे घडी करत होती. सोहम बेडला टेकून काही तरी वाचत होता. निताताई सोहम जवळ बेडवर येऊन बसल्या आणि बोलू लागल्या.
नीताताई,“ आता कसं वाटतंय बब्बू तुला? डोकं अजून ही दुखतंय का?” त्यांनी मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले.
सोहम,“ थोडं दुखतंय! पण मी ठीक आहे आता आई!” तो म्हणाला.
नीताताई,“ काय ग सावी याच्या पायाचे प्लास्टर कधी काढणार आहेत?” त्यांनी सावीला विचारले.
सावी,“ अजून चार दिवसांनी काढायला बोलावले आहे आई!” ती उत्तरली.
नीताताई,“ मला तुमच्या दोघांशी थोडं बोलायचं होत!” त्या म्हणाल्या.
सोहम,“ बोल ना आई!” तो म्हणाला.
नीताताई,“ तुम्हांला तर माहीतच आहे. की सोहमच्या बाबांना अस्थमा आहे आणि आता थंडीचे दिवस आहेत या दिवसात त्यांना जास्तच त्रास होतो.या आठ दिवसात तर त्यांना खूपच त्रास झाला!” त्या म्हणाल्या.
सोहम,“मला हे तू आधी का नाही सांगितले आई?” त्याने काळजीने विचारले.
नीताताई,“ तुला सांगायला तुझी तब्बेत ठीक होती का?” बरं मी आणि तुझे बाबा उद्या पुण्याला जातोय आदिने आमची उद्या दुपारची फ्लाईट बुक केली आहे. चंदीगड मधील थंड हवामान तुझ्या बाबांना सूट होत नाही. त्यांना आणखीनच अस्थमाचा त्रास होतो आहे त्यामुळे!” त्या म्हणाल्या.
सोहम,“ पण आई मला तुमची गरज आहे!” तो नाराज होत म्हणाला.
नीताताई,“ हे बघ बब्बू तू असा जागेवर आहेस.माझं ही वय झालाय तुझ्या बाबांना जर काय झालं तर बिचाऱ्या सावीने कोणा-कोणाकडे लक्ष द्यायचं. आम्ही जातो उद्या अधे-मध्ये अजून येणारच की आणि तुझी काळजी घ्यायला सावी आहे बच्चा त्यामुळे मला तुझी काळजी नाही!” त्या सोहमच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवूत त्याला समजावत होत्या.
सोहम,“ ठीक आहे जा तुम्ही!” तो जरा नाखुषीनेच म्हणाला.
नीताताईंनी सुभाषरावांच्या तब्बेतीचे कारण पुढे केले त्यामुळे सोहम काहीच बोलू शकला नाही. नाही तर त्याने त्यांना जाऊ दिले नसते. नीताताई आणि सुभाषराव पुण्याला गेले.
आता घरात सावी आणि सोहम दोघेच होते. सोहम त्याचे कोणतेच काम सावीच्या मदती शिवाय करू शकत नव्हता त्यामुळे तो आता तुटक-तुटक का होईना सावीशी बोलत होता. सावीने ही त्याला जास्त फोर्स केले नाही. ती ही सगळी कामे शांतपणे करत होती.
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्या सारखा नेहमी खळखळाट करणारा सोहम तोच धबधबा उन्हाळ्यात आटल्यावर शांत होणाऱ्या त्याच धबधब्या सारखा शांत झाला होता. ही गोष्ट सावीला खटकत होती. त्याच्या अशा शांत होण्याला ती स्वतःच जबाबदार समजत होती. सोहम इतकी बडबड करायचा की सावी त्याला चिडून म्हणायची.
सावी,“ किती बडबड करतोस रे सोहम! तुझं तोंड दुखत नाही का?
त्यावर सोहमच उत्तर तयार असायचे
सोहम,“ माणसाने नेहमी खळाळत्या पाण्या सारख असावं सावी! आपल्याला पाहून आणि ऐकून दुसऱ्याला प्रसन्न वाटलं पाहिजे! ”
तोच सोहम आता कमालीचा शांत झाला होता. दोन दिवस शांततेत निघून गेले. एक दिवस रात्री सावी त्याचे जेवण घेऊन बेडरूममध्ये गेली. तर सोहम कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याने फोन ठेवला आणि तो सावीला म्हणाला.
सोहम,“ उद्या पासून मेड येईल कामाला तुला काही करावं लागणार नाही. खरं तर आधी तीच सगळी काम करत होती पण या काळात घराला लॉक बघून आली नाही!” तो रुक्षपणे म्हणाला.
सावी,“ ठीक आहे पण तुझं डाएटचे जेवण मीच बनवत जाईन!”तिने त्याच्या समोर जेवणाचे ताट धरले.
सोहम त्याचा डावा हात अजून ही हलवू शकत नव्हता. त्यामुळे जेवताना सावीला त्याच्या समोर ताट धरून बसावे लागे. सोहम जेवत जेवत सावीला म्हणाला.
सोहम,“ मेडिसीन्स ही कसे आणि कधी घ्यायचे ते मला सांग सावी मी माझं माझं घेत जाईन. तुला उगीच त्रास नको!”
सावी,“ का कडू मेडिसीन्स मी दिले तर आणखीन कडू लागणार आहेत का तुला! आणि मला काही त्रास होत नाही.तुझा एक्सिडेंट माझ्यामुळे झालाय! तू फालतू विचार करू नकोस तुझ्या तब्बेतीकडे लक्ष दे आणि अराम कर!” ती नाराजीने म्हणाली.
यावर सोहम काहीच बोलला नाही. पुढचे दोन दिवस असेच निघून गेले. आज सावीने तिचे आणि सोहमचे ही लवकरच आवरले होते आणि दिलजीतला बोलवून घेतले होते कारण आज सोहमच्या पायाचे प्लास्टर काढण्यासाठी आणि रेग्युलर चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये जायचे होते. सावीने दिलजीतच्या मदतीने सोहमला व्हीलचेअरवर बसवून गाडीत नेऊन बसवले आणि ती सोहमला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
तिथे डॉक्टरांनी सोहमचे चेकअप केले आणि त्याच्या पायाचे प्लास्टर ही काढले. पण पायाला सिव्हीयर फ्रॅक्चर असल्याने सोहमला त्यांनी पायावर जास्त भार देऊ नको असे सांगितले. तसेच कोणाच्या तरी मदतीने थोडे-थोडे चलायला सुरुवात कर असे ही सांगितले. त्यांनी सोहमच्या काही मेडिसीन्स कमी केल्या तर काही नवीन दिल्या आणि आठ दिवसांनी पुन्हा चेकअपला बोलवले. सोहमला जास्त मेंटल स्ट्रेस येणार नाही याची काळजी घ्यायला सावीला सांगितले.
प्लास्टर काढल्यामुळे बऱ्याच दिवसातून सोहम खुश दिसत होता. सावीने घरी जाताना दिलजीतला रस्त्यामध्ये त्याच्या घरी सोडले.दिलजीत उतरल्यावर सोहम सावीला म्हणाला.
सोहम,“ सावी इथून पुढे थोड्या अंतरावर एक कॅफे आहे तिथे चल! मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे!”
हे ऐकून सावीच्या मनात मात्र विचारांचे पोळे उठले. आता याला काय बोलायचे आहे. सोहम तेच बोलणार तू निघून जा वगैरे! सावी विचारांच्या तंद्रीत सोहमला घेऊन कॅफेमध्ये पोहोचली. तिने सोहमचा हात धरून सोहमने बोट दाखवले त्या कॉर्नर टेबल पाशी सोहमला नेऊन खुर्चीवर बसवले. वेळ तशी ऑड म्हणजे दुपारी बाराची असल्याने कॅफेमध्ये जास्त वर्दळ नव्हती. सोहमला पाहून तिथला एक तरुण वेटर त्यांच्या पाशी ऑर्डर घ्यायला आला आणि तो सोहमला म्हणला.
तरुण,“ ,क्या पाजी बहोत दिनो बाद आये आप! वैसे इतनी चोट आपको कैसे लगी?” सोहमच्या जखमांचे व्रण पाहून तो म्हणाला.
सोहम,“कुछ नही छोटासा एक्सीडेंट हो गया था! इसी वजह से नहीं आ पाया इतने दिन! मॅडम के लिए एक कैफीचिनो और मेरे लिए कोल्ड कॉफी लाना” त्याने ऑर्डर दिली.
तर सावी मध्येच म्हणाला.
सावी,“ नहीं भैया! इनके लिए भी कैफीचिनो लाना कोल्ड कॉफी नहीं!”
हे ऐकून तो तरुण हसत निघून गेला. सोहम मात्र यावर काहीच बोलला नाही. दोघांनी कॉफी घेतली. दहा मिनिटं झाली तरी सोहम शांतच होता शेवटी सावीच त्याला म्हणाली.
सावी,“ सोहम तुला माझ्याशी बोलायचे होते ना? मग बोल ना!”ती प्रश्नार्थक नजरेने म्हणाली.
सोहम,“ हे सगळं काय आहे सावी?” त्याने विचारले.
सावी,“ म्हणजे?” तिने न कळल्या सारखे विचारले.
सोहम,“ ठीक आहे तुला माझ्या तोंडून ऐकायचं असेल तसं तर तसं! हे मंगळसूत्र,जोडवी,बांगड्या, टिकली आणि हो हा पंजाबी सूट! काय आहे हे सगळं सावी?हा बदल कशासाठी सावी? तुला तर हे सगळं आवडत नव्हतं ना? आणि मी ही तुला या सगळ्याची जबरदस्ती कधीच केली नाही. तू जशी आहेस तशी तुला मी स्वीकारले! आणि आता तर प्रश्नच नाही! या सगळ्याला आता तर काहीच अर्थ नाही सावी! तू ज्या सोहमला शोधत आहेस तो सोहम तुला कधीच सापडणार नाही कारण तो सोहम मेला आहे सावी! Try to understand and go back to your life!”तो तिला समजावत म्हणाला.
सोहमने बोलले शब्द सावीच्या जिव्हारी लागले खास करून ‘ तू शोधत असलेला सोहम मेला आहे’ हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले पण ते लपवत ती म्हणाली.
सावी,“ म्हणजे तू मला पाहतोस तर! हो मला हे मंगळसूत्र, जोडवी,बांगड्या, टिकली आवडत नव्हते. कारण मला ही बाईला घातलेली बंधने वाटायची! यांचे महत्व मला उशिरा समजले सोहम! पण आता मला कळले आहे(ती मध्येच थांबत म्हणाली) जाऊदे सोहम तुला नाही समजणार आणि पंजाबी सूटच म्हणशील तर ते मी आधी पासून घालते हे तुला ही माहीत आहे! हा आता ऑफिसला जाताना जास्त फॉर्मल वापरते मी!आणि मुंबईला परत जायचं म्हणशील तर मी सहा महिने झाल्या शिवाय जाणार नाही!” ती ठामपणे म्हणाली.
सोहम,“ पाहतो म्हणजे काय गेल्या एक-दीड महिन्यापासून तू माझ्या समोर आहेस सावी! मी शुद्धीवर आल्यापासून तुझ्या तील बदल पाहतो आहे. खरंच हे सगळं तू नको करुस सावी प्लिज! तू मला कळायचं म्हणशील तर तू मला कधीच कळली नाहीस सावी आणि तो अट्टाहास मी सोडला आहे आता!” तो खिन्नपणे हसत म्हणाला.
सावी,“बरं चल! घरी जाऊन जेवण करायचं आहे आपल्याला अजून!” ती रिस्ट व्हॉच पाहत म्हणाली.
सावीने सोहमचा हात धरून त्याला गाडीत बसवले. दोघ ही घरी जाऊन जेवले आणि सोहम त्याचे काम करत बसला.सोहमने आता त्याच काम ऑनलाईन सुरू केलं होतं या एक्सिडेंटमुळे बरंच काम पेंडिंग होत. संध्याकाळी सोहम बेडरूममधून हळूहळू चालत डायनींग टेबल जवळ आला आणि त्याने किचनमध्ये डोकावून पाहिले. तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. सावी सांजवात लावून हात जोडून देवा समोर उभी होती. तिने सोहमला पाहिले आणि ती धावतच त्याच्या जवळ आली आणि त्याला धरून खुर्चीवर बसवले आणि ती फळ घेऊन येऊन खुर्चीवर बसत काळजीने म्हणाली.
सावी,“ कशाला आलास सोहम इथे? डॉक्टरनी तुला पायावर स्ट्रेस देऊ नको म्हणून सांगितले आहे ना!”
सोहम,“ किती दिवस झाले मी बेडरूममध्ये पडून आहे! कंटाळा आला म्हणून आलो बाहेर! बरं हा देव्हारा देव आईने आणले काय? आणि तू तर नास्तिक आहेस ना? मग ही सांजवात आणि पूजा?” त्याने आश्चर्याने विचारले.
सावीला आता सोहमला काय उत्तर द्यावे हेच सुचत नव्हते. ती तर त्याच्या मुळेच आस्तिक झाली होती पण सोहमला ती हे सगळं कसं सांगणार होती म्हणून त्याला टाळण्यासाठी ती त्याला सफरचंद कापून देत त्याला चिडून म्हणाली.
सावी,“तो देव्हारा आणि बाप्पा मीच आणले आहे आणि झाले मी आस्तिक आता! तुला कशाला रे नसत्या चौकशा फ्रुट खा आणि तुझं तुझं काम कर की!”
हे ऐकून सोहम रागाने उठला आणि तो बेडरूममध्ये निघून गेला. सावी विचार करत तिथेच बसली किती बदला आहे सोहम! हेच जर मी आधीच्या सोहमला बोलले असते तर माझ्या मागे लागून भुंग्या सारखी माझ्या मागे भुणभुण करून माझ्याकडून वदवून घेतलं असत याने सगळं! पण आता तो तोंड फुगवून निघून गेला आहे. आता त्याची मनधरणी करावी लागेल.असा विचार करत ती बेडरूमकडे निघाली. बेडरूमचे दार नुसते पुढे लोटलेले होते.सावीने दार उघडले आणि ती आत गेली आतून कसला तरी धूर आणि जळका वास येत होता. सोहम खिडकीत उभा होता. तिला पाहून तो चपापला आणि त्याने हात मागे लपवला. सावी त्याच्या जवळ गेली आणि त्याचा हात तिने स्वतःच्या हाताने धरून पुढे घेतला आणि पाहिला तर त्याच्या हातात सिगारेट होती. ते पाहून तिची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने सिगारेट त्याच्या हातातून घेतली आणि विजवली. ती रागाने त्याला बोलू लागली.
सावी,“ are you mad? महिन्यातून कधी तरी तू ड्रिंक करत होतास ते ठीक होत पण सिगारेट! हे घाण व्यसन तुला केव्हा लागले रे? तुला मेडिसीन्स सुरू आहेत आणि तू स्मोक करतो आहेस? याचा तुझ्या आरोग्यावर काय परिणाम होईल सोहम याचा विचार केला आहेस का तू?” तिने रागाने विचारले.
सोहम,“ हे बघ तुला याच्याशी काही देणं-घेणं नाही! By the way! Who are you for asking me that?” तो चिडून म्हणाला.
सावी,“who I am? I am your legally wedded wife you foolish man!” ती रागाने म्हणाली.
सोहम,“ you really think that! हे बघ सावी तू निघून जा तुला आधी ही मी अनेक वेळा सांगितलं आहे अजून ही सांगतो ज्या सोहमला तू शोधत आहेस तो सोहम मेला आहे. हे फक्त प्रेत आहे जे श्वास घेत म्हणून ते जिवंत आहे असं नाही.जेंव्हा एखादा माणूस आत्महत्या करण्याचा विचार करतो ना तेंव्हा तो मनाने मेलेला असतो! अपघात झाला तेंव्हा वाटलं बरं झालं सुटलो मी! पण तुम्ही लोकांनी मला सुखाने मारू सुध्दा दिले नाही. मेलो असतो तर हा पुढचा मनस्ताप तरी वाचला असता तुझा ही आणि माझा ही!” तो रागाने सावीने दंड धरून तिला भिंत्तीला टेकवत म्हणाला.
सावी,“ will you please shut up! खबरदार पुन्हा असं अभद्र बोलशील तर! तुझा राग माझ्यावर आहे तो माझ्या पुरता मर्यादित ठेव तो स्वतःवर काढू नको सोहम!तुझ्यासाठी मरण किती सोपं आहे ना! पण त्यांचा जीव तुझ्यावर आहे जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांचा विचार केलास का रे कधी? तुला काही झाले तर आमचे काय होईल? तुला काय माहीत रे आपल्या माणसाला एका एका श्वसासाठी झगडताना पाहून इच्छा असून ही त्याची कोणतीच मदत करता येत नाही.फक्त त्याला हतबल पाहत राहणं म्हणजे काय असत? एका एका क्षणाला आपण आपल्या व्यक्तीला गमावण्याची भीती वाटण म्हणजे काय? आई-बाबांनी आपला तरुणाताठा मुलगा असा मृत्यूशी झगडताना पाहणं आणि त्यांना क्षणा क्षणा त्याला गमावण्याची भीती वाटण म्हणजे काय असत!तू तर बेशुद्ध होतास रे आत पण बाहेर तुझ्यासाठी आम्ही झुरत होतो! तुझा मृत्यूशी चाललेला झगडा तुला होणारा त्रास उघड्या डोळ्यांनी हतबलपणे पाहत होती आम्ही! आपल्या माणसाला कायमच गमावण्याची भीती काय असते तुला भोगल्या शिवाय नाही कळणार सोहम! अशी स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करून अशी शरीराची अवहेलना करून तुला काय मिळवायचे आहे रे? इतकं काय झालंय पण तुला तुझ्या सारखे अनेक लोक आहेत या जगात ज्यांचे life partner शी पटत नाही ते जगतातच ना रादर दुसरे प्रेम शोधतात आयुष्यात! तू जर मनात आणलंस ना तर अशा पन्नास सावी उभ्या करशील की!” ती त्याला समजावत होती आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.
सोहम,“ इथं एका सावीला सांभाळू शकलो नाही तिचा विश्वास मिळवू शकलो नाही मी आणि पन्नास सावीच्या गोष्टी काय करतेस ग!मला दुसरे प्रेम ही नको आणि त्या पन्नास सावी ही नको!मी हरलो आहे प्रेमात! असले निरर्थक आयुष्य नको मला! त्या पेक्षा संपलेले बरे!” तो विमनस्कपणे म्हणाला.
सावी,“ पुन्हा तेच! सोहम तुला कळत कसं नाही रे की तुझ्या आयुष्यावर तुझा एकट्याचा अधिकार नाही.की तू कसा ही वागशील! या तुझ्या हृदयाच्या स्पंदनांवर आई-बाबा, आदित्य आणि हो माझा ही अधिकार आहे समजलं का तुला!” त्याच्या हृदयावर हात ठेवत ती म्हणाली.
सोहम,“ तू जा सावी! I hate you!” तो रागाने म्हणाला.
सावी,“अच्छा!मग तू मला का वाचवलेस रे सोहम अगदी स्वतः जीवपणाला लावून?तिने विचारले.
सोहम,“O please सावी कोणताही गैरसमज नको करून घेऊन ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होती दुसरं काहीच नाही! I hate you a lot !” रागाने म्हणाला.
सावी,“ बरं मी मान्य करते की मला तू वाचवणे एक प्रतिक्षिप्त क्रिया होती खुश! I glad to know that you hate me” ती नाटकीपणे हसून म्हणाला.
सोहम,“नीट ऐकलेस का? are you out of your mind! I said that I hate you!” तो आणखीन रागाने म्हणाला.
सावी,“ हो ऐकले मी सोहम! तू म्हणालास की तुला माझा तिरस्कार वाटतो! तिरस्कार वाटण ही एक भावना आहे सोहम आणि भावना असणे ही जिवंत असण्याची खूण आहे. म्हणजेच तू अजून ही जिवंत आहेस मनाने आणि शरीराने ही!” ती हसून म्हणाली.
सोहम आता मात्र निरुत्तरीत झाला आणि त्याचा रागाचा पारा अजूनच चढला त्याने सावीला ढकलले आणि तो बेडरूममधून निघाला आणि लंगडत घरातून बाहेर पडू लागला. सावी ही हॉलमध्ये आली आणि तिने त्याला विचारले.
सावी,“ सोहम संध्याकाळचे सात वाजले आहेत तू कुठं चाललास? मी या अनोळखी शहरात तुला कुठे शोधू?” ती काळजीने म्हणाली.
सोहम,“ तुला माझी काळजी करण्याची गरज नाही सावी! माझं डोकं आणि मन शांत झालं की मी येईन माझा माझा घरी!” तो असं म्हणून निघून गेला.
भांडण झाले किंवा सोहमला खूप राग आला की तो घरातून निघून जात असे आणि कुठे तरी एकटाच जाऊन बसत असे मन आणि डोकं शांत झाल की तो स्वतःच घरी निघून येत असे. ही त्याची खोड सावीला माहीत होती. पण सावीला सध्या त्याची काळजी वाटत होती कारण त्याची शारीरिक आणि मानसिक अवस्था ठीक नव्हती.
सावी डॉमीनेटिंग आणि तडफदार असली तरी ती एक loving and caring व्यक्ती होती. पण तिच्या काही नात्यांच्या बाबतीत चुकीच्या धारणा होत्या. ज्या हळूहळू दूर होत होत्या पण अशा चुकीच्या धारणा तयार होण्यात तिचा दोष नव्हता तर त्याला तिचा भूतकाळ जबाबदार होता. जो तिच्या वर्तमानात डोकावत होता आणि अर्थातच तिच्या भविष्यावर ही परिणाम करू पाहत होता. जो भूतकाळ तिने कोणालाच आजपर्यंत सांगितला नव्हता.अगदी सोहमला ही!
सोहमचे पुढचे पाऊल काय असेल? सोहमचा सावीच्या समजावण्याने स्वतः कडे आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल का? सावीचा भूतकाळ काय होता की तिने तो सोहमला ही सांगितला नव्हता ज्याचा परिणाम तिच्या आयुष्यावर आज ही दिसत होता?
या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.
©Swamini (asmita) chougule