A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907defe8907015bba9b10dda67324b20d73d1adf961b16): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Hamsfars part 6
Oct 27, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ६)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ६)

 

 

      सोहमला तब्बल आज एका महिन्याने हॉस्पिटलमधून डिशचार्ज मिळाला होता.सावी सकाळीच सोहमच्या घरी तिचं समान घेऊन हजर होती. ती आज घरीच थांबली होती तयारी करण्यासाठी आणि सोहमला त्याचे आई-बाबा आणि आदित्य घरी घेऊन येणार होते. सगळ्या फॉर्मेलिटी होऊन त्याला डिशचार्ज मिळायला दुपारचे चार वाजणार होते..

  

         सावी आल्यापासून घर आवरत होती आणि निहाळत होती.सोहमचे घर म्हणजे काय तर त्याला ट्रस्टकडून मिळालेली  टू.बी.एच.के प्रशस्त कॉर्टर होती. समोर एक गाडी लावता येईल असे छोटेसे अंगण आणि त्या नंतर पोर्च दारातून आत गेले की मध्यम आकाराचा हॉल होता त्या नंतर एका बाजूला किचन आणि एका बाजूला दोन बेडरूम! घरात सगळे फर्निचर आधीच असावे असा सावीचा ते पाहून अंदाज होता.

 

     तिने  घरात आल्यावर पहिल्यांदा स्वच्छता केली.सगळीकडे पाहिले तर तिला देव्हारा कुठेच दिसला नाही फक्त हॉलमध्ये एक श्रीकृष्णाचा फोटो होता. सोहम आस्तिक असला तरी देवभोळा नव्हता आणि सावी तर नास्तिक होती. पण त्यांच्या मुबंईच्या घरात  एक छोटासा देव्हारा आणून सोहमने छोटीशी गणपतीची मूर्ती स्वतः स्थापन केली होती. त्याला जेंव्हा वेळ मिळे तेंव्हा तो त्याची पूजा करत असे. कमीत कमी रोज सकाळ संध्याकाळ तो देव्हाऱ्यात दिवा लावत असे.पण त्याने सावीला कधीच त्या बाबतीत जबरदस्ती केली नव्हती. 

 

            सावीने मात्र आज स्वतः मार्केटमध्ये जाऊन छोटा देव्हारा आणि सुंदर अशी गणेशाची मूर्ती, दिवा, आरतीचे ताट,पूजेचे  सगळे साहित्य आणले आणि किचनच्या एका कोपऱ्यात देव्हाऱ्याची स्थापना केली होती. या सगळ्या घटना क्रमात सावीची कुठे तरी श्रद्धा देवावर बसली होती.सहा वाजून गेले तरी अजून कोणीच आले नव्हते. सावीला आता चिंता वाटू लागली होती. तिच्या मनात आता अनेक शंकांचे पोळे  उठू लागले होते. म्हणून तिने आदित्यला फोन लावला. पण आदित्य फोन उचलत नव्हता. तिच्या मनात आता अनेक शंका-कुशंका येऊ लागल्या.सोहमची तब्बेत अजून बिघडली तर नाही असा विचार तिच्या मनात डोकावून गेला. तिने तो विचार लागलीच झटकला आणि देव्हाऱ्यात सांजवात लावली आणि हात जोडून देवा पुढे उभी राहिली. तो पर्यंत गाडीचा आवाज आला आणि ती औक्षणाचे तिने तयार करून ठेवलेले ताट घेऊन ती दारात गेली. आदित्य आणि सोहमच्या बाबांनी मिळून सोहमला धरून व्हीलचेअरवर बसवले. आई घरात आल्या तर सावीने त्याच्या हातात औक्षणाचे ताट दिले. हे पाहून सोहमच्या आई म्हणजेच निताताई सह सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. तरी तसं न दाखवता  सोहमच्या आईने म्हणजेच नीताताईंनी ताट घेऊन सोहमचे औक्षंण केले.

 

          सोहम घरी येऊन आठ दिवस झाले तरी तो  सावीशी अजून एक शब्द ही बोलला नव्हता कारण नीताताई म्हणजेच सोहमच्या आई त्याच सगळं करत होत्या. पण सावी मात्र सोहमचे डाएटनुसार जेवण त्याचे औषध-पाणी सगळं त्यांच्या हातात देत होती. सोहम बरोबर ती एकाच रूममध्ये राहत असून ही दोघात काडीचा ही संबंध नव्हता.सावी मात्र सोहमने साधी कुस जरी बदलली तरी त्याला रात्री उठून उठून पाहत असे.हे सगळं सोहमच्या आई पाहत होत्या. तरी त्या सावीवर विश्वास ठेवायला तयार नव्हत्या.

 

   सोहमचे बाबा मात्र अस्वस्थ होते कारण ज्या उद्देशसाठी त्यांनी सोहमला सावी बरोबर राहण्यासाठी तयार केले होते तो उद्देश पूर्ण होताना दिसत नव्हता. सोहमच्या बाबांनी  नीताताईंना खूप समजावले पण त्या सोहमच्या बाबांच ऐकत नव्हत्या. सोहमच्या बाबांच असं म्हणणं होतं की सावी आणि सोहमने दोघांनीच इथे राहावे. त्यांनी व नीताताई परत पुण्याला जावे पण नीताताईंचा सावीवर  विश्वास नव्हता की ती सोहमची नीट काळजी घेईल.म्हणून त्या सोहमला अशा अवस्थेत सोडून पुण्याला जायला तयार नव्हत्या. सुभाषरावांना म्हणजेच सोहमच्या बाबांना असे वाटत होते की हीच वेळ आहे सोहम आणि सावीला एकटे सोडण्याची कारण महिन्याभरत  सोहम बरा झाला की मग मात्र तो सावीला बोलणारच नाही आता जर त्याला सावी बरोबर एकट्याला सोडले तर मात्र सोहम पूर्णपणे सावीवर अवलंबून राहील आणि त्याला सावीशी बोलण्याशिवाय पर्याय नाही राहणार आणि दोघांमध्ये संवाद होईल आणि जवळीक वाढेल. शेवटी बाबांनी आदित्यला निताताईंना  समजावून सांगण्यासाठी फोन केला आणि मुबंईला परत गेलेल्या आदित्यने नीताताईंना फोन केला. रिंग गेली आणि निताताईंनी मोबाईल उचलला. 

 

      फोनवरून आदित्य बोलत होता.

 

आदित्य,“ हॅलो काकू! सोम्या कसा आहे आता?” त्याने विचारले.

 

नीताताई,“ तो बरा आहे आता! तू कसा आहेस आदि बेटा?” त्या मायेने बोलत होता.

 

आदित्य,“ मी ठीक आहे आणि सावी कशी आहे?” त्याने हळूच विषय काढला.

 

नीताताई,“ हो ती पण ठीक आहे.” त्या म्हणाल्या

 

आदित्य,“ मला तुमच्याशी थोडं बोलायचं होत काकू!” तो म्हणाला.

 

नीताताई,“ माहीत आहे तुला काय बोलायचे आहे माझ्याशी! त्यांनी फोन केला असेल तुला मला समजावून सांग म्हणून  बरोबर का?” त्यांनी विचारले.

 

आदित्य,“हो! काका बरोबर बोलत आहेत काकू हीच तर वेळ आहे  त्यांना एकट सोडण्याची!” तो म्हणाला.

 

नीताताई,“ तू म्हणतो आहेस ते कळतंय रे बेटा मला पण वळत नाही! माझा सावीवर अजिबात विश्वास नाही रे! मागच्या वेळी सोहम आजारी होता तेंव्हा तिने किती निष्काळजीपणा केला हे मी तुला सांगायला नको!

(त्या हे बोलत होत्या तेंव्हा सावी त्यांना काही तरी विचारायला आली होती पण त्यांचे हे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात टचकण पाणी आले आणि ती माघारी फिरली. नीताताई पाठमोऱ्या असल्याने त्यांना सावी आलेली आणि गेलेली ही कळले नाही.त्या फोनवर बोलत होत्या)  त्या नंतर मागच्या वेळी ही तिने सोहमची खूप काळजी घेतली होती आणि आता ही ती त्याची काळजी घेते. मला हेच कळत नाही की निष्काळजीपणे वागणारी सावी खरी की सोहमची काळजी घेणारी सावी खरी!” त्या म्हणाल्या.

 

आदित्य,“ सावी कळणं  इतकं सोपं नाही काकू! हा पण मागच्या वेळी चूक सावीची नव्हती तर तुमच्या लाडक्या बब्बूची होती…..” आदित्य पुढे बोलत राहिला.

 

     इकडे सावी मात्र पोर्च मध्ये आराम खुर्चीवर बसून रडत होती तिला नीताताईंच्या बोकण्यामुळे  दहा महिन्यांपूर्वीचा मुबंईतील प्रसंग आठवत होता. ती भूतकाळात गेली.


 

        सोहम आणि सावी दोघे ही रोजच्या प्रमाणे ऑफिसमधून आले होते. एकाच ऑफिसमध्ये असून ही आज कामामुळे दोघांना बोलायला ही वेळ मिळाला नव्हता.सोहमचा चेहरा जरा उतरलेला दिसत होता.सावीने डबे किचनमध्ये  नेले आणि डबे उघडून सिंकमध्ये ठेवायला गेली तर सोहम आज दुपारी जेवलेलाच नव्हता. म्हणून तिने बाहेर येऊन सोहमला पाणी देत विचारले.

 

सावी,“ सोहम आज लंच का केला नाहीस?”

 

सोहम,“ नाही ग खावसच वाटलं नाही आज!” तो पाणी घेत सावीला म्हणाला.

 

सावी,“ बरं वाटत नाही का तुला?” तिने त्याच्या कपाळाला हात लावत विचारले तर तिला त्याचे डोके जरा गरम वाटले.

 

सोहम,“ काही नाही ग जरा कणकण वाटते.एखादी गोळी घेईन आज झोपताना बरं वाटेल!” तो म्हणाला.

 

सावी,“ बरं मी कॉफी आणते तो पर्यंत तू फ्रेश हो नाही तर पानं घेऊ का मी जेवायला? तुला भूक लागली असेल ना?” ती पुन्हा काळजीने म्हणाली.

 

सोहम,“ नको कॉफीच कर नंतर जेवू !” तो असं मी म्हणून बेडरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला.

 

       सावीने कॉफी केली. दोघांनी कॉफी घेतली नंतर जेवले.सावीने सोहमला घरात असलेली कणकणीची गोळी आठवणीने दिली.  पण दोन दिवस झाले तरी सोहमला ताप येतच होता. सावी मात्र आता काळजीत पडली आज ती सकाळी-सकाळीच आवरून तयार होऊन  सोहमला म्हणाली.

 

सावी,“ सोहम आपण आज ऑफिसला जायच्या आधी माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये चल!गेले तीन दिवस तुला ताप येतोय हे चांगलं नाही.” ती काळजीने म्हणाली.

 

सोहम,“ अग इतकं काही नाही झालं मला! मी संध्याकाळी येताना जाऊन येईन हॉस्पिटलमध्ये! आता लेट होईल ऑफिसला जायला आपल्याला! एक तर आज खूप काम आहे तुला तर माहीतच आहे की आज प्रेझेन्टेशन आहे माझे नवीन प्रोजेक्टचे!” तो तयार होत म्हणाला.

 

सावी,“ मग संध्याकाळी ऑफिसमधून आपण दोघे जाऊ हॉस्पिटलमध्ये मगच घरी येऊ!” ती डबे बॅगांमध्ये ठेवत म्हणाली.

 

सोहम,“ अग मी काय लहान आहे का? की तू माझ्या बरोबर येणार हॉस्पिटलमध्ये! मी जाईन माझा माझा तू नको टेन्शन घेऊ!” तो म्हणाला.

 

सावी,“ बरं पण नक्की जाशील ना? नाही म्हणलं तुला आधीच हॉस्पिटलचा तिटकारा आहे” ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.

 

सोहम,“ हो ग बाई जाईन मी आज संध्याकाळी घरी येण्याच्या आधी! किती काळजी करशील!” तो तिला मिठी मारत म्हणाला.

 

सावी,“बघ सोहम तुझ्या अंगात अजून ताप आहे आपण आज नको जाऊया ऑफिसला तू आधी हॉस्पिटलमध्ये चल!” ती त्याच्या गळ्याला हात लावत त्याला म्हणाली.

 

सोहम,“ वेडी आहेस का तू सावी! आज प्रेझेन्टेशन आहे माझं MD समोर ऐन वेळी कोण देणार ते? मी बरा आहे तू नको काळजी करू मी येताना जाईन म्हणलं ना हॉस्पिटलमध्ये!आणि तुझं तयार झालं का प्रेझेन्टेशन उद्या क्लायंट समोर आहे ना?” तो म्हणाला.

 

सावी,“ हो झाली आहे माझी तयारी! बरं चल लेट होतंय पण संध्याकाळी जर तू हॉस्पिटलमध्ये न जाता आलास ना तर मग मी उद्या तुला ऑफिसला नाही जाऊ देणार आणि मी ही नाही जाणार!” ती काहीशी चिडून म्हणाली.

 

सोहम,“ हो बाई! मी आज जाईन मग तर झालं!चल आता!” तो म्हणाला.

 

          संध्याकाळी सावी  ऑफिस बाहेर त्याची वाट पाहत होती.शेवटी तिने सोहमला फोन केला.

 

सावी,“ कुठं आहेस सोहम? किती वेळ झाला? तू हॉस्पिटलमध्ये कधी जाणार?”तिने विचारले.

 

सोहम,“तू घरी जा सावी मला वेळ होईल! मला बोलावलं आहे भेटायला M.D सरांनी!” तो म्हणाला.

 

      सावी घरी गेली.सोहमला घरी  यायला आज बराच उशीर झाला. जवळजवळ दहा वाजले रात्रीचे सावी त्याचीच वाट पाहत होती. सोहम आला. तो खूपच जास्त थकलेला दिसत होता.सावीने त्याला पाहून पाणी आणून दिले! सोहम सोफ्यावर बसून पाणी पीत म्हणाला.

 

सोहम,“ तू जेवलीस का सावी? अग आज सरां बरोबर मला बाहेर जावं लागलं.खूप खुश आहेत सर माझ्यावर!” तो उत्साहाने म्हणाला.

 

सावी त्याच्या जवळ बसली आणि त्याच्या डोक्याला हात लावत काळजीने म्हणाली.

 

सावी,“ तुला अजून ताप आला आहे सोहम बाकीचे सगळे राहू दे तू हॉस्पिटलमध्ये गेला होतास का ते सांग आणि डॉक्टर काय म्हणाले?”

 

सोहम,“ हो गेलो होतो मी! काही नाही व्हायरल फिवर आहे हे बघ मेडिसीन्स दिली आहेत” तो गोळ्या टी पॉय वर ठेवत म्हणाला.

 

सावी,“ प्रिस्क्रिप्शन कुठे आहे पण याचे? कशा आणि कधी द्यायच्या?” ती औषध पाहत म्हणाली.

 

सोहम,“ अग ते गाडीत राहील असेल! मला माहीत आहे कशा घ्यायच्या या गोळ्या ते मी घेईन!तू जेव मी मेडिसीन्स घेऊन झोपतो!” असं म्हणून तो औषधे घेऊन बेडरूममध्ये गेला.

 

  सोहम हॉस्पिटलमध्ये जाऊन आला आणि व्हायरल फिव्हर आहे म्हणल्यावर  सावीची काळजी जरा कमी झाली. ती जेवली आणि झोपली पण रात्री सोहमला जास्तच ताप आला. ती पुन्हा काळजीत पडली.रात्र भर ती गार पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवत होती. सकाळी जरा सोहमचा ताप उतरला. सावी उठली तरी सोहम अजून झोपलेलाच होता. ती अंघोळ करून आली तर सोहम तिला उठून बसलेला दिसला.

 

सावी,“ मी नाही जात आज ऑफिसला! तू  आराम कर मी तुझी ही लिव्ह सांगते आणि माझी ही!” ती त्याचा हात धरत म्हणाली.

 

सोहम,“ सावी तुझं आज प्रेझेन्टेशन आहे.तुला जावं लागेल आणि मी ठीक आहे मी नाही येत ऑफिसला आराम करतो आणि आता कमी झालाय ताप माझा!तू जा!” तो म्हणाला.

 

सावी,“रात्री तुला खूप ताप होता रे!” ती काळजीने म्हणाली.

 

सोहम,“ मी ठीक आहे. तू जा मी मेडिसीन्स घेईन आणि आराम करेन!” तो म्हणाला.

 

     सावी त्याला नाष्टा देऊन. जड पावलाने ऑफिसला सोहमच्या आग्रहामुळे गेली.तरी तिने स्वयंपाकिन मावशीला म्हणजेच उषाबाईंना सोहमला जेवायला घाल आणि जरा लक्ष दे म्हणून फोन करून सांगितले होते. 

      बाराच्या सुमारास उषाबाई आल्या आणि त्यांनी स्वयंपाक केला आणि सोहमला उठवायला बेडरूमध्ये गेल्या तर सोहम उठत नव्हता त्यांनी खूप हाका मारल्या शेवटी त्यांनी सोहम जवळ जाऊन त्याला हात लावून हलवले तर सोहमचे अंग तापाने भाजत होते. काही केल्या तो उठत नव्हता.शेवटी तिने  घाबरून सावीला फोन केला पण सावी प्रेझेन्टेशन मध्ये असल्याने तिचा फोन सायलेंटवर होता. तिने फोन उचलला नाही म्हणून तिने आदित्यला फोन केला आणि त्याला बोलवून घेतले. आदित्यने सोसायटीतल्या लोकांच्या मदतीने सोहमला हॉस्पिटलमध्ये नेले. तो पर्यंत उषाबाईचे मिस कॉल पाहून सावीने तिला फोन केला तर तिला सोहमला आदित्यने हॉस्पिटलमध्ये नेल्याची आणि सोहम बेशुद्ध असल्याची हकीकत तिला सांगितली. सावीने उषाबाईना हॉस्पिटलचे नाव विचारले आणि ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तर आदित्य तिला तेथे भेटला. त्याच्या कडून तिला कळले की सोहमला डेंग्यू झाला आहे.म्हणजेच सोहम सावीशी हॉस्पिटलमध्ये गेलो हे खोटे बोलला होता हे सावीच्या लक्षात आले होते. सोहमला आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले. सावीने त्याच्या आई-बाबांना बोलवून घेतले. डॉक्टरांचे असे म्हणणे होते की वेळीच लक्ष न दिल्याने त्याचा आजार वाढला आहे आणि आदित्य व सोहमच्या आईचा गैरसमज झाला की सावीने सोहमकडे लक्ष दिले नाही त्याच्या  तब्बेती बाबत निष्काळजीपणा केला. 

 

         सावी मात्र सोहमची काळजी घेत होती पण ती त्याला एक शब्द ही बोलली नाही.दुपारच्या वेळी  सावी सोहमला जेवण घेऊन आली होती. तेंव्हा सोहम तिला बोलतं करायचा प्रयत्न करत तो म्हणाला.

 

सोहम,“ सावी sorry ना यार! माझं चुकलं आता किती दिवस अबोला धरणार माझ्याशी! पण मी तरी काय करणार त्या दिवशी मला वेळच नाही मिळाला ग हॉस्पिटलमध्ये जायला नेमकं MD सरांनी मला डिनरला इंव्हाईत केलं मग मी नाही म्हणू  शकलो नाही ग त्यांना! तिथेच मला खूप उशीर झाला!” तो स्पष्टीकरण देत होता.

 

     इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारी सावी आता बोलू लागली.

 

सावी,“ झालं तुझं स्पष्टीकरण देऊन! जेव आता!” 

 

सोहम,“ मला जेवायचं नाही.” तो चिडून म्हणाला.

 

सावी,“ आधीच माझं डोकं फिरलं आहे. तू अजून फिरवू नको! जेव पटकन!मेडिसीन्स घ्यायची आहेत तुला! आज डिशचार्ज मिळेल तुला! आई म्हणत होत्या की त्या थोडे दिवस घेऊन जाणार आहेत तुला! मी तुझी पॅकिंग करून ठेवली आहे उद्या आराम करून परवा निघणार आहेत” तिने सांगितले.

 

सोहम,“काय? मला कोणी साधं विचारलं पण नाही सगळं परस्पर ठरवून मोकळ्या झालात दोघी तुम्ही!” तो अजून चिडून म्हणाला.

 

सावी,“ हो! तुला काय विचारायचं त्यात! जेव आता!” ती त्याला दम देत म्हणाली.

 

सोहम,“ तू मुद्दाम करते आहेस का? मला त्रास द्यायला?” तो रागातच म्हणाला.

 

सावी,“ o really! Do you think that? अरे मूर्खा या आजारपणामुळे तुला कमी त्रास झाला आहे का? की मी अजून तुला त्रास देईन. एक तर माझ्याशी खोट बोललास चार दिवस मागे लागून ही हॉस्पिटलमध्ये आला नाहीस! माणसाने किती निष्काळजी असावं त्याला ही लिमिट असते सोहम! तरी बरं उषाताईंना मी सांगून ठेवले होते म्हणून नाही तर काय म्हणता काय झाले असते! तुला ना कोणत्याच गोष्टीचे गांभीर्य नाही ना? त्यातून तुझा तो जिवलग मित्र आणि आई या दोघांचा गैरसमज झाला आहे की मीच तुझ्या तब्बेती बाबत हलगर्जीपणा केला म्हणून!” ती नाराजीने बोलत होती.

 

सोहम,“ काय?मी आईशी बोलेण की तुझा नाही माझाच हलगर्जीपणा आहे हा! मला नाही जायचं पुण्याला आणि मला इतकी लिव्ह मिळणार आहे का? Sorry ना सावी! इथून पुढे मी नाही बोलणार खोटं!” तो तिचा हात धरून तिला स्वतः जवळ बसवत म्हणाला.

 

सावी,“काही गरज नाही आईंना सांगायची त्यांना वाटेल तू माझी वकिली करतो आहेस! आणि जास्त लाडात नको येऊस आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. राहिला प्रश्न तुला माफ करण्याचा तर इतक्या सहजासहजी नाही सोडणार तुला! आई बरोबर तू जात आहेस कळलं का? तुझी एकदम पंधरा दिवसाची सिक लिव्ह मंजूर करून घेतली आहे मी तर आता जेवण कर औषध घे आणि झोप!” ती त्यांच्या पुढे जेवणाचे ताट धरत म्हणाली.

 

          सोहमला पुण्याला जायचे नव्हते तरी ना इलाजने तो गेला.  सोहम तिला फोन करत असे पण सावी तरीही 

 आठ दिवस रोज सोहमच्या बाबांना फोन करून त्याच्या तब्बेतीची चौकशी करत असे. आठ दिवसा नंतर सोहम दुपारी घरी आला. सावीला माहीतच नव्हतं ती लॉचकीने दार खोलून संध्याकाळी  घरात आली. पाणी पिऊन ती बॅग घेऊन बेडरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली तर सोहम बेडवर निवांत झोपला होता. त्याला पाहून सावीला आनंद तर झाला पण तो जे वागला होता त्या बद्दल तिला त्याला भांडायला वेळच मिळाला नव्हता. तिने बेडवर जाऊन त्याच्या हाताला चिमटा घेतला. तिच्या चिमटा घेण्याने सोहम हात चोळत उठला आणि सावीला म्हणाला.

 

सोहम,“ असं उठवतात का झोपलेल्या माणसाला आणि मी इतक्या दिवसातून आलो तर असं वागणार होय माझ्याशी!” तो  तिला मिठी मारत हसून म्हणाला.

 

सावी,“ सोड मला!नालायक कुठला!” ती स्वतःला त्याच्या मिठीतुन सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

 

सोहम,“ नालायक असलो तरी तुझाच आहे ना! Love you savee! मी तुला खूप मिस केलं” तो तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन म्हणाला.

 

सावी,“ I was also missing you!”ती असं म्हणून त्याच्या मिठीत विसावली.

 

सोहम,“मग का पाठवलीस मला मी नको म्हणत असताना?” त्याने तिच्या केसातून हात फिरवत विचारले.

 

सावी,“ तू इथे राहून आराम केला नसतास म्हणून! Love you!” अस म्हणून तिने त्याच्या ओठावर ओठ ठेवले.

 

     दोघे ही बराच वेळ एकमेकात विरघळत होते. सावी हे सगळं आठवून गालात हसून लाजत होती. नीताताईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती त्या स्पर्शाने भूतकाळातून वर्तमानात आली. सावीने मागे वळून पाहिले आणि ती त्यांना म्हणाली.

 

सावी,“ आई तुम्ही कधी आलात?” ती खुर्चीतून उठत म्हणाली.

 

नीताताई,“ तू जेंव्हा गालात हसून लाजत होती तेंव्हा! हुंम काही तरी आठवले वाटतं तुला म्हणून इतकी लाजत होतीस ती!” त्या तिला चिडवत म्हणाल्या.

 

सावी,“ असं काही नाही वो आई!” ती खाली मान घालून लाजत म्हणाली.

 

नीताताई,“ बरं आम्ही उद्या निघत आहोत पुण्याला आदिने उद्या दुपारची फ्लाईट बुक केली आहे आमची!” त्या म्हणाल्या.

 

सावी,“ अस अचानक का? राहा की अजून सोहमला तुमची गरज आहे!” ती म्हणाली.

 

नीताताई,“ त्याला माझी नाही तुझी गरज आहे सावी! खरं तर माझाच गैरसमज झाला होता तो आज दूर झाला आणि चूक तुझी एकटीची नाही सावी सोहमने पण चुका केल्या आहेत. पण तो या वेळी खूप दुखावला गेला आहे ग!  आता त्याला कसं मनवायच ते तुझं तू बघ बाई! हो पण मला परत आल्यावर तुम्हा दोघांना एकत्र पहायचे आहे समजलं!” त्या सावीचा हात हातात घेऊन मायेने बोलत होत्या.

 

 हे ऐकून आणि इतक्या दिवसाने कोणाचा तरी मायेचा स्पर्श अनुभवून ती त्यांना मिठी मारून रडू लागली. नीताताईंनी तिला शांत केले आणि तिची समजूत काढली.

 

    आई-बाबा जाणार आहेत हे कळल्यावर सोहमची रियाक्शन काय असेल? सावीची खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती जी तिला कशी जाणार? हे येणार काळच ठरवणार होता!


 

          

 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule