हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ५)

This is a love story of before marriage and after marriage

   सोहमची आई अजून आल्या नव्हत्या घरून! सावी सोहम जवळ जाऊन बसली आणि त्याला तिने विचारले.

सावी,“कसा आहेस सोहम ?” 

सोहम,“ जिवंत आहे अजून!” तो रुक्षपणे म्हणाला.

सावी,“ते तर मला पण दिसतंय पण मी विचारत होते आता तुला बरं वाटतंय का? काल अदित्य सांगत होता की M. R. I. केलं तुझं! अजून तुझ्या ब्रेनवर  सूज आहे म्हणे! डोकं दुखतंय का तुझं खूप?” तिने काळजीने विचारले.

सोहम,“ तू इथेच काय करते आहेस अजून? मुबंईला का गेली नाहीस? मला वाटलं गेली असशील? तुझे प्रोजेक्ट राखडतील! तू जा मुंबईला आणि पुन्हा येऊ नकोस मला भेटायला!” तो चिडून बोलत होता.

सावी,“ by the way! आज तुला या I. C. U. मधून बाहेर काढणार आहेत!” तिने सोहमने बोललेले काहीच तिला ऐकू गेले नाही असे ती पुढे बोलली.

सोहम,“ मुद्दाम करते आहेस का तू? मी काय म्हणालो तुला? ऐकू आले नाही का? तू जा बरं सावी!” तो आणखीनच चिडून म्हणाला.

सावी,“ मी काय करायचं ते तू नको सांगू मला! ते माझं मी बघेन आणि शांत राहा उगीच चिडचिड केलीस तर बीपी वाढेल तुझा आणि मग अजून तुला I. C. U. मध्ये राहावं लागेल!” ती त्याला समजावत म्हणाली.

             सोहम यावर मात्र काहीच बोलला नाही. कारण त्याला माहित होतं की सावी बरोबर बोलत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोहम हॉस्पिटलच्या नावाने ही चिडत असे त्याला एक प्रकारची भीती वाटायची हॉस्पिटलची! आणि आता तो बरेच दिवस झालं I. C. U. मध्ये पडून होता त्याला कधी एकदा  यातून बाहेर पडेन असं झालं होतं.म्हणून तो शांत झाला आणि झोपला. सावीला त्याची ही विकनेस माहीत होती आणि तिची मात्रा लागू झाली होती.

        पुढे सोहमला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केले. दहा दिवस असेच गेले.रोज सावी सोहम जवळ न चुकता येऊन बसत असे. सोहमला ते आवडत नव्हते अर्थात तो तसं दाखवत तरी होता. या दहा दिवसांत सोहम सावीशी एक शब्द ही बोलला नव्हता. आज अकरावा दिवस होता पण रोज बरोबर सकाळी दहाला हॉस्पिटलमध्ये येणारी सावी आज अजून बारा वाजल्या तरी आली नव्हती. आदित्य सोहम जवळ होता. पण सोहमचे लक्ष मात्र रूमच्या  दाराकडे होते. त्याची केंव्हाची चुळबुळ सुरू होती. आदित्यला ते जाणवत होते आणि त्याची चुळबुळ का चालली आहे ते ही तो चांगलच ओळखून होता तरी त्याने सोहमला विचारले.

अदित्य,“ काही हवे आहे का सोम्या तुला? वॉश रूमला जायचं आहे का तुला?”

सोहम,“ आSs काही नको रे मला!” तो विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाला.

अदित्य,“मग काही दुखतंय का? डॉक्टरला बोलावू का?” त्याने विचारले

सोहम,“ तसं काही नाही रे! आई-बाबा नाही आले अजून  आणि तू कधी जाणार रे मुबंईला? किती दिवस झाले तू इथेच आहेस.डॅड ओरडतील की तुला!” तो विषय बदलत म्हणाला.

आदित्य,“ काका-काकूंना उशीर होणार आहे आज तुला रात्रीच काकांनी सांगितलं होतं की! ते मंदिरात जाणार आहेत ना तुझ्या नावाने काही तरी दान करायला! आणि तू माझ्या कामाची काळजी नको करू मी डॅडला सगळं सांगितलं आहे आणि भाई सांभाळून घेईल सगळं! तू तुझी काळजी कर! नसत्या उचापाच्या   हव्यात कशाला रे तुला!” तो त्याला जरा दम देत म्हणाला.

सोहम,“ अरे! किती दम देशील मला! आणि ती श्रेया नाही का ओरडत तुला? नुसता एंगेजमेंट करून बसलास किती दिवस झालं आणि या सहा महिन्यात तर माझ्याच मागे पळतो आहेस.I am sorry yar! माझ्यामुळे  तुला खूप त्रास झालाय या सहा-सात महिन्यात!” तो भावूक होत त्याचा हात हातात धरत म्हणाला.

अदित्य,“ श्रेया U. S. मध्ये आहे तिच्या कामा निमित्त वर्ष भरासाठी! तिनेच सांगितलंय मला तुझ्या बरोबर राहायला!

आणि मला तुझ्यामुळे त्रास झाला असे म्हणालास तर मुस्काड फोडेन तुझं!  अजून चार दिवस या हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल तुला! आणि माझी आई इंजिनिअरिंगला आपण असताना गेली तेंव्हा तू मला एक-दीड वर्ष सांभाळलंस तेंव्हा तुला पण त्रास झाला होता का रे नालायका?” तो चिडून म्हणाला.

सोहम,“किती चिडशील रे आद्या?” तो हसून  म्हणाला.

आदित्य,“ बरं आराम कर तू सोम्या! जास्त बोलू नकोस! तुझ्या ब्रेनची सूज आत्ता कुठे कमी झाली आहे डॉक्टरांनी जास्त बोलू नको म्हणून सांगितले आहे तुला!” तो काळजीने म्हणाला.

     सोहमने नुसती होकारार्थी मान हलवली आणि डोळे झाकले. तास भराने सोहमचे आई-बाबा आणि सावी डॉक्टरच्या केबिन मधून सोहमच्या रूममध्ये आले. डॉक्टरांनी तो विषय काढण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला होता त्यांना! आता सोहमचे बाबा सोहमवर बॉम्ब टाकणार होते पण सोहम याला कसा सामोरा जाणार होता. हे पाहण्या सारखे होते. सोहम त्या तिघांना एकत्र पाहून जरा चकित झाला होता तरी तो तसं काही जाणवू न देता शांत होता. सोहमचे बाबा त्याच्या बेडजवळ खुर्चीत बसले आणि गंभीर होत म्हणाले.

बाबा,“ बब्बू तुझ्याशी थोडं बोलायचं होत मला!” ते म्हणाले  

     सोहमला अंदाज आला की आज काही तरी गंभीर घडणार आहे कारण जेंव्हा कोणती तरी गोष्ट त्याच्याकडून त्याच्या बाबांना वदवून घ्यायची असे तेंव्हा ते त्याला बब्बू म्हणत.म्हणून तो जरा सावरून बसत म्हणाला.

सोहम,“बोला ना बाबा!”

बाबा,“ तुला सावी बरोबर राहायचे नाही तू तिच्यासाठी डिव्होर्स पेपर ठेऊन  आला होतास चंदीगडला येताना बरोबर का?” त्यांनी विचारले.

सोहम,“ हो! पण त्याचे आता काय? तो सावीकडे तिरकस पाहत म्हणाला.

बाबा,“ त्याच विषयी बोलायचे आहे मला तुझ्याशी! हे बघ तुला तिच्याशी फारकत घ्यायची आहे पण त्या आधी तू तिला आणि तुमच्या नात्याला एक चान्स द्यावा असे मला वाटते. तू सहा महिने तिच्या बरोबर राहा आणि मग काय ते ठरव!” ते त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत म्हणाले.

सोहम,“ बाबा मला हिच्या बरोबर सहा महिने काय पण सहा मिनिट पण नाही राहायचं!” तो चिडून म्हणाला.

बाबा,“ अच्छा पण तुला डिव्होर्स मिळवायचा असेल तर हिच्या बरोबर सहा महिने राहावेच लागेल! कारण तशी अटच आहे कोर्टाची विचार तुझ्या वकिलाला!” ते शांतपणे म्हणाले.

सोहम,“ मला नाही राहायचं आहे सावी बरोबर! Mutual understanding ने डिव्होर्स होऊ शकतो सहा महिने एकत्र न राहता ही!” तो चिडूनच बोलत होता.

बाबा,“ तरी माझं अस मत आहे की तू सावीला आणि तुमच्या नात्याला एक चान्स द्यावा. मत नाही तर तुला माझं ऐकावच लागेल!” ते म्हणाले.

सोहम,“ बाबा तुम्ही का मला हे सगळं करायला सांगताय? सावीने तुम्हांला गळ घातली असेल!” तो सविकडे रागाने पाहत म्हणाला.

       

    सावी खाली मान घालून उभी होती.

बाबा,“ तिने काही गळ वगैरे घातली नाही मला! तूच हिच्याशी तुझ्या मर्जीने प्रेम करून लग्न केलेस ना? मग त्याच नात्याला एक चान्स दे! मला काही माहीत नाही तू आणि सावी सहा महिने एकत्र राहत आहात! मी तुझा बाप आहे समजलं त्याच हक्काने सांगत आहे तुला मी!” ते त्याला दरडावत म्हणाले.

सोहम,“ बाबा का तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करताय?मला नाही राहायचे सावी बरोबर हो मी माझ्या पसंतीने प्रेम करून हिच्याशी लग्न केले पण मी नाही निभावू शकणार हे लग्न आणि तुम्हीं मला म्हणताय पण हिला विचारलं का हिला माझ्या बरोबर राहायचं आहे का ते?” तो आता जेरीस येऊन बोलत होता.

बाबा,“ काय ग सावी तुला राहायचं आहे का सहा महिने सोहम बरोबर( सावीने नुसती होकारार्थी मान हलवली) बघ ती तयार आहे!बच्चा संसार करणं इतकं सोपं नसतं रे! दोन लोक एकत्र आले की भांडनारच म्हणून लगेच विभक्त  होत नाही कोणी!तुम्ही दोघांनी ही तीन वर्ष प्रेम करून लग्न केलं ना मग लग्नाच्या एका वर्षात प्रेम आटलं का?चुका सगळ्यांकडून होतात पण लगेच त्या माणसाला आपण सोडून देतो का? ठरलं तर तू आणि सावी एकत्र राहत आहात सहा महिने! मला यावर कोणतेही अर्ग्युमेंट नको आहे!” ते दोघांकडे पाहत म्हणाले.

     सोहम काही तरी विचार करून म्हणाला.

सोहम,“ ठीक आहे बाबा मी तयार आहे पण माझी एक अट आहे.” तो म्हणाला.

बाबा,“ कसली अट?” त्यांनी विचारले.

सोहम,“ सहा महिन्यांनंतर सावीला डिव्होर्स द्यायचा की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय असेल! ही अट तिला मान्य असेल तर मी तयार आहे!”तो सावीकडे तिरकस पाहत म्हणाला. 

       त्याला वाटत होतं की सावी सारखी इगोष्टीक मुलगी त्याची ही अट मान्य करणार नाही.स्वतःच नाही म्हणेल आणि आपली या पेचातुन सुटका होईल. बाबांनी सावीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आता सावी बोलू लागली.

सावी,“ ठीक आहे मला सोहमची अट मान्य आहे” ती खाली मान घालून म्हणाली.

     हे ऐकून सोहम तर उडालाच आता मात्र त्याचा नाइलाज झाला.असं ही त्याच त्याच्या बाबांसमोर काही चालत नव्हतं.खरं तर सुभाषरावांनी कधीच कोणता निर्णय सोहमवर लादला नव्हता. त्यांनी त्याला स्वच्छंदी आयुष्य आज पर्यंत जगू दिलं होतं.पण आज मात्र त्याला सुभाषरावांचे म्हणजेच त्याच्या बाबांचे ऐकावे लागणार होते.कारण त्यांनी आज पहिल्यांदा त्याला काही तरी करायला सांगितले असेल. त्यामुळे सोहमने आता विचार करत आदित्यकडे पाहिले. आदित्यने त्याला नजरेनेच हो म्हण असे सांगितले. आणि सोहम म्हणाला.

सोहम,“ ठीक आहे बाबा मी तयार आहे पण माझी अट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा!” तो सावीकडे पाहून म्हणाला.

बाबा,“ ठीक आहे तर मग घरी गेल्या नंतर सहा महिने तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं आम्ही सहा महिने ज्या तारखेला होतील त्या तारखेला येऊ आणि तुझा निर्णय ऐकू मग पुढचं काय ते ठरवू.

     सावीने सोहमची अट निमूटपणे मान्य केली होती. त्याला तीन कारणे होती. एक म्हणजे तिला सहा महिने सोहमचा सहवास मिळणार होता ज्याला ती तरसली होती. दुसरे कारण म्हणजे  तिला कुठे तरी पुसटशी आशा होती की सोहमचे मन ती वळवू शकेल कदाचित सोहम तिला माफ करेल आणि तिसरे कारण म्हणजे समजा तिला सोहमने माफ नाही केले तरी जर सोहम आणि तिच्यात संबंध आले तर ती स्वतः मध्ये सोहमचा अंश रुजवू इच्छित होती आणि सोहम आणि तिच्या प्रेमाच्या त्या प्रतीकाला म्हणजेच मुलाला पाहून ती तिचे अख्खे आयुष्य घालवू शकत होती.

     सोहम मात्र आता आतून धुमसत होता. तो पहिल्यादा सावीकडून खूप जास्त दुखावला गेला होता. त्याचे रूपांतर नंतर नाराजीत झाले होते आणि सावीने सहा महिने एकत्र राहायला होकार दिल्यामुळे त्या नाराजीचे रूपांतर आता रागात झाले होते.

 आता मात्र सावीच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होणार होती.सोहमने तर त्याच्या प्रेमाची परीक्षा दिली होती आणि त्याने त्या परीक्षेत हार पत्करली होती. आता सावी आणि सोहमच्या नात्याचे भवितव्य येणारा काळ ठरवणार होता.

        प्रेमात हार किंवा जित ही परीक्षा देणाऱ्या व्यक्तीवर नाही तर परीक्षा घेणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजेच परीक्षा घेणारा व्यक्ती परीक्षा देणाऱ्या व्यक्तीला हरवत किंवा जिंकवत असतो. सोहमने त्याच्या प्रेमाची परीक्षा दिली होती आणि सावीने त्याला त्या परीक्षेत हरवलं होत आता परीक्षा देण्याची बारी सावीची होती आणि सोहम तिची हार व जित ठरवणार होता.

   सावीची सोहम कशी आणि काय परीक्षा पाहणार होता?सावी सोहमचे मन पुन्हा जिंकू शकेल का? आणि सावी आणि सोहमच्या नात्यात इतका दुरावा का निर्माण झाला होता?

क्रमशः


 

     

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

©Swamini (asmita) chougule





 

          







 

🎭 Series Post

View all