हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ४)

This is love story of before marriage and after marriage

        सावी अदित्यकडून हे सगळं ऐकून आतून हादरली होती.ज्या सोहमवर आपण प्रेम केले ज्याच्याशी लग्न केले. त्याला आपण इतका त्रास दिला त्याच्यावर इतके मानसिक आघात केले की तो स्वतःला संपवायला निघाला होता. जर त्या दिवशी अदित्यने त्याला अडवलं नसत तर …..!  हा विचार करून तिचे डोके सुन्न झाले होते. तिला अपराधी वाटत होत आणि इतकं होऊन ही आज सोहमने आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीवपणाला लावला! का? अदित्य म्हणतो तेच खरं आहे मी सोहमच्या लायकीची नाही.I am not deserving him!

     ती रडत होती. सावी उठली आणि हॉस्पिटलमध्ये असलेल्या मंदिरात गेली. नास्तिक असलेली सावी प्रथमच देवा समोर हात जोडून उभी होती. ते पाहून सोहमचे आई-बाबा आणि अदित्य ही आश्चर्य चकित होते. ती मनोमन प्रार्थना करत होती. मी तुला कधीच मानले नाही. ना तुझ्या समोर हात जोडले पण आज मात्र मी तुझ्या समोर हात जोडून उभी आहे सोहमसाठी! तो तुला खूप मानतो. मंदिरात ही जातो. तू त्याला जीवनदान दे इतकच मागणे मी तुझ्याकडे मागते. हे माझे तुझ्याकडे पहिले आणि शेवटचे मागणे आहे.जर तू असशील तर दाखव तुझे अस्तित्व आणि माझ्या सारख्या नास्तिक मुलीला ही अस्थीक कर!

                   त्या चौघांना ही एक एक तास म्हणजे डोंगरा इतका मोठा वाटत होता आणि सोहमच्या तब्बेतीमध्ये सतत चढउतार होत होता. चाळीस तास जणू त्या चौघांची परीक्षाच घेत होते. कसे- बसे ते चाळीस तास निघून गेले.डॉक्टर वेळ पाहून सोहमला चेक करत होते आणि बाहेर ते चौघे डॉक्टर काय सांगतात. हे ऐकायला कानात प्राण आणून  उभारले होते. डॉक्टर आले आणि बोलू लागले.

डॉक्टर,“ Mr.soham is out of danger now! हाँ उन्हें स्टेबल होने में वक्त लगेगा!but he is safe now!” ते म्हणाले.

     हे ऐकून चौघांच्या ही जीवात जीव आला. सोहमच्या बाबांनी विचारले.

बाबा,“ लेकीन डॉक्टर उसे होश कब आएगा?”ते म्हणाले.

डॉक्टर,“ don't worry! उन्हें शाम तक होश आ जाएगा! आप अभी उन्हें देख सकते हैं और होश आने के बाद मिल भी सकते हैं!” ते म्हणाले.

       सोहमचे आई-बाबा त्याला पाहायला आत गेले. ते बाहेर आल्यावर त्यांना अदित्यने जबरदस्तीने सोहमच्या घरी संस्थेच्या प्युनला बोलावून घेऊन पाठवून दिले. मात्र सावी अजून तिथेच होती. सोहमच्या बाबांनी तिला ही घरी चल म्हणून आग्रह केला पण ती नाही गेली. सोहमच्या आईच्या डोळ्यात मात्र सावीने तिच्यासाठी राग पाहिला होता.अदित्य  सावीला म्हणाला.

अदित्य,“ सावी तू ही जायचं होतं ना काका-काकू बरोबर!”

सावी,“ सोहम उठल्या शिवाय मी कोठेच जाणार नाही आणि तू जे आज सांगितलंस ना त्यामुळे माझा कोणताच हक्क आता सोहमवर राहिला नाही. तू  म्हणतो ते पटलं मला अदित्य मी सोहमच्या लायकीची नाही.ज्या माणसाशी मी प्रेम करून लग्न केलं.ज्याने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं इतकं की त्याच्याशी इतकं वाईट वागून ही तो आज मला वाचवायला जाऊन मरणाच्या दारात जाऊन पोहचला! त्याच माणसाला मी इतका त्रास दिला होता की तो स्वतःला संपवायला निघाला होता. खरं तर मला स्वतःचीच किळस यायला लागली आहे आता!” ती विषन्यपणे बोलत होती.

आदित्य,“ बरं तुझं समान कुठे आहे?” त्याने विचारले

सावी,“ अ…. समान….. हं ते तर त्या ऑफिसमध्ये आहे!” तिने काहीसं आठवत सांगितले.

आदित्य,“ ठीक आहे तू असं कर इथे जवळच एक लॉज आहे तिथे राहा मी तुझं समान तिथे एक रूम बुक करून  पोहोच करण्याची व्यवस्था करतो.” तो म्हणाला.

सावी,“ हुंम्म” इतकच म्हणाली खरं तर ती काही विचार करण्याच्या आणि काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

    ती पुन्हा उठली आणि काचेतून सोहमला पाहू लागली. ती मनातून पूर्णपणे उध्वस्त झाली होती. आपण सोहमचे अपराधी आहोत ही भावना तिला आतून खात होती. ती खरं तर आली होती सोहमची माफी मागायला आणि त्याची समजूनत घालून त्याच्या हातापायापडून  त्याला माघारी घेऊन जायला पण आता मात्र तिने धरलेला सहा महिन्यांपासूनचा धीर सुटला होता. जणू ती एका भ्रमात जगात होती आणि तो भ्रम आज मोडला होता.संध्याकाळी सात वाजता सोहम शुद्धीवर आला. डॉक्टर त्याला तपासत होते. तो पर्यंत आदित्यने सोहमच्या बाबांना फोन केला.सोहमचे  आई-बाबा लागलीच वीस मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर बाहेर आले. सोहमच्या बाबांनी त्यांना विचारले.

बाबा,“डॉक्टर अब सोहम कैसा हैं? कोई घबराने की बात तो नहीं हैं ना?” त्यांनी काळजीने विचारले.

डॉक्टर,“ जी नहीं कोई घबराने की बात नहीं हैं। लेकिन mr. सोहम की केअर करनी होगी। वो अब भी स्टेबल नहीं हैं। आप उनसे मिलिए लेकिन ज्यादा बात मत करने दीजिए। और उन्हें स्ट्रेस हो ऐसी कोई बात मत कीजिए!”त्यांनी सांगितले.

       सोहमचे आई-बाबा त्याला भेटायला गेले. सोहमने त्यांची चाहूल लागताच  डोळे उघडले आणि तो कुसनुस हसला. त्याची आई त्याच्या बेड जवळ खुर्चीवर बसत म्हणाली.

आई,“बब्बू कसं वाटतंय आता?” त्या काळजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या.

सोहम,“ मी ठीक आहे!” तो इतकच अगदी क्षीण आवाजात म्हणाला.

बाबा,“ तू आराम कर बेटा आम्ही आहोत बाहेर!” ते डोळे पुसत म्हणाले.

       सोहम त्यांच्या लग्नानंतर दहा वर्षांनी नवस सायास करून झालेला एकुलता एक मुलगा. त्याला त्या दोघांनी लाडाकोडत वाढवले होते. त्याला कधीच कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही. घरात त्याला ते लाडाने बब्बू म्हणत. सोहम हुशार होता त्यामुळे  तर त्याच त्याच्या आई-वडिलांना जास्तच कौतुक होत.म्हणून जेंव्हा त्याने सावी बरोबर लग्न कारण्याची इच्छा व्यक्त केलं तेंव्हा ते दोघे लगेच तयार झाले. सोहम त्यांचा जीव की प्राण होता आणि सोहम ही सहसा त्याच्या बाबांचे बोलणे किंवा त्याची इच्छा टाळत नसे. आपल्या लाडक्य लेकाची अशी अवस्था पाहून दोघांचा ही जीव खालवर होत होता. ते बाहेर आले आणि आदित्य सोहमला भेटायला गेला.

आदित्य,“काय सोम्या असा कसा रे तू येडा! म्हणजे बघ एक्सिडेंट करून घेतलास पण एक तर हात तर पुढे करायचा! नाय तर पाय!नाय तर डोकं! तू तर सगळंच  केलंस की पुढे! अरे देवा थोबाडाला पण लागलंय की रे तुझ्या! आता या जखमांचे डाग राहिले तर पोरी तुझं हे देखणं तोंड पाहणार नाहीत की!” तो खोचकपणे म्हणाला.

सोहम,“ झालं तुझं कुजक बोलून? नाही म्हणजे  अजून काही राहीलय का? झालं असेल तर जा तू आधीच माझं डोकं खूप दुखतंय!” तो  वैतागून क्षीण आवाजात म्हणाला.

आदित्य,“ अरे तुला दुखतंय पण? मला वाटलं तू म्हणशील मर्द को दर्द नही होता! काय रे तुला खूप हौस आहे का या असल्या विचित्र मशिन्स लावून या असल्या I. C. U च्या बेडवर पडून आमचा जीव टांगणीला लावायची? मागे ही तू हेच केलं. मग ही हौस भागवायला मेडिकल क्षेत्रात जायचं ना कशाला इंजिनिअरिंग केलस! आम्ही मान्य केल की तू आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस तुझ्या शिवाय नाही राहू शकत आम्ही!” तो डोळ्यात पाणी आणून बोलत होता.

सोहम,“ आद्या किती बोलशील रे! बास कर की या वेळी चूक माझी नव्हती ती सावी…..!(त्याला  एकदम आठवले) आद्या सावी कुठं आहे?कशी आहे ती? तिला काही….” तो पुढे बोलणार तर आदित्यने त्याला मध्येच थांबले आणि तो बोलू लागला.

आदित्य,“ अरे हो हो! डॉक्टरने तुला जास्त बोलू नको म्हणून सांगितलं आहे. सावी ठीक आहे आणि ती बाहेर आहे!  तू तुझी काळजी कर आणि आराम कर!” तो त्याला काळजीने म्हणाला आणि बाहेर आला. सोहमचे आई-बाबा मंदिरात गेले होते. सावी त्याचीच वाट पाहत होती.त्याला पाहून तिने विचारले.

सावी,“सोहम ठीक आहे ना आदित्य?”

आदित्य,“ हो तो बरा आहे. तुझ्याबद्दल विचारत होता.जाऊन भेट त्याला!” तो म्हणाला.

सावी,“ नाही आदित्य मी नाही त्याच्या समोर जाऊ शकणार!त्याच्या समोर पण उभं राहायची माझी लायकी नाही!” ती रडत म्हणाली.

आदित्य,“ तुला ही चांगलं माहीत आहे सावी आम्ही किती ही सांगितलं की तू ठीक आहेस तरी तो विश्वास ठेवणार नाही! तुला सुखरूप पाहिल्या शिवाय त्याला चैन नाही पडणार! आणि तो अजून स्टेबल नाही त्याने जर तुझे टेन्शन घेतले तर… प्लिज त्याला एकदा भेटून ये!I am requesting you!” तो काळजीने बोलत होता.

सावी,“ तुला request करायची काहीच गरज नाही आदित्य! मी जाते!” असं म्हणून ती मनाची तयारी करत डोळे पुसून सोहमला भेटायला गेली.

     सावीची  चाहूल लागताच सोहमने डोळे उघडले आणि तिला पाहिले सावी खाली मान घालून त्याच्या बेडजवळ खुर्चीवर बसली. तिची मान खालीच होती. ती सोहमशी नजर  भिडवत नव्हती. पण डोळ्यातून मात्र पाणी वाहत होते. सोहम मात्र तीला पाहत होता.सोहमला या अवस्थेत सावीला पाहवत नव्हते. दोघ ही काहीच बोलत नव्हते. एक  भयाण शांतता होती तिथे पण त्या शांततेचा भंग सोहमला लावलेली ECG मशीन मध्येच बीप बीप आवाज करत करत होती. तो पर्यंत एक नर्स आली आणि तीला पाहून सोहम म्हणाला.

सोहम,“ नर्स इनके दाहीने हाथ की कोहनीं पर चोट लगी हैं प्लीज आप इनकी पट्टी कर दीजिए!” तो म्हणाला.

    आणि हे ऐकून  सावीने चमकून तिच्या उजव्या हाताचा कोपरा  पाहिला तर खरंच तिला बऱ्यापैकी लागलं होतं. जे या सगळ्या गोंधळात कोणाच्याच काय पण तिच्या ही लक्षात आले नव्हते. सावी आता जास्तच रडू लागली आणि तिने सोहमचा हात धरला तर सोहमने त्याचा हात लगेच काढून घेतला आणि तोंड फिरवले.

     नर्स सावीला घेऊन गेली व ड्रेसिंग करत म्हणाली.

नर्स,“ बहुत लकी हैं मैडम आप इतना प्यार करनेवाला हज्बंड जो मिला हैं! पिछले दो दिन से आप यही हैं लेकिन किसी ने भी नोटिस नहीं कि आपके हाथ की चोट! और आज आपके पतीने झट से देख लिया!  ऐसा पति हर किसी के नसीब में नहीं होता!” ती कौतुकाने बोलत होती.

     सावीने मात्र तिला काहीच उत्तर दिले नाही. ती मनातच म्हणाली. नशीब उपभोगायला पण अक्कल लागते. जी माझ्या जवळ नाही. 

         पुढचे आठ दिवस सावी रोज हॉस्पिटलमध्ये येऊन बसत असे ती सोहमला बाहेरूनच काचेतून पाहत असे. सोहमची तब्बेत आता हळूहळू सुधारत होती. आज नवव्या दिवशी त्याला I. C. U. मधून बाहेरकाडून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करणार होते.

               सावी आज मुंबईला निघाली होती. जाता जाता सोहमला पाहून जावे म्हणून तिने कॅब हॉस्पिटल बाहेर थांबवली आणि तिने काचेतून सोहमला पाहिले. सोहम झोपलेला होता. त्याला पाहताना तिचे डोळे भरून आले होते. डोळे पुसून ती वळली आणि जड अंतकरणाने निघाली. तर सोहमचे बाबा I. C. U. मधून बाहेर आले आणि तिला म्हणाले.

बाबा,“ सावी थांब! माझ्या मुलाला तू कोणत्या गुन्ह्याची शिक्षा देत आहेस ग?” त्यांनी विचारले.

  हे ऐकून सावी थांबली आणि ती वळून बाबांना म्हणाली.

सावी,“ शिक्षा तर  मी भोगत आहे बाबा माझ्याच कर्माची!” ती डोळे पुसत म्हणाला.

बाबा,“ मला तुझ्याशी बोलायचे आहे. बाहेर चल” ते अधिकाराने म्हणाले.

     सावी काहीच न बोलता गेली. हॉस्पिटलच्या बाहेर खूप मोठी बाग होती आणि तिथे ठिकठिकाणी बेंच होते. त्यातल्या एका बेंचवर ते दोघे ही जाऊन बसले. सोहमच्या बाबांनी पुन्हा तिला विचारले.

बाबा,“ सांग ना सावी माझ्या मुलाला तू कोणत्या गुन्ह्याची शिक्षा देत आहेस ग? त्याने तुझ्यावर जीवापाड प्रेम केले त्याची की तुझ्याशी लग्न करून त्याची अर्धांगिनी तुला बनवलं त्याची? की अजून  कशाची!” ते सावीला कठोरपणे जाब विचारत होते.

सावी,“ नाही बाबा सोहमने कोणताच गुन्हा नाही केला पण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तो मात्र माझ्या सारख्या दळभद्री मुलीवर प्रेम करून लग्न करून भोगत आहे! खरं तर मी त्याला आता शिक्षेतून मुक्त करत आहे. आता मी नाही दाखवणार माझे तोंड त्याला!” ती निश्चयाने म्हणाली.

बाबा,“ म्हणजे तुला वाटतंय तू बब्बूपासून लांब गेल्यावर तो सुखी होईल? मग तू माझ्या मुलाला अजून ही ओळखलं नाहीस सावी!” ते तिला पाहत म्हणाले.

सावी,“ त्याच्या सगळ्या दुःखाच कारण मी आहे बाबा!मी त्याच्या लायकीचीच नाही खरं तर!” ती म्हणाली.

बाबा,“ अच्छा! पण त्याच्या सुखाचे आणि आनंदाचे कारण ही तूच आहेस सावी! तुला काय वाटतं ग की तू त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तो सुखी होईल तर तसं नाही आहे सावी! तो ना दुसरं लग्न करेल ना सुखी होईल! एकटाच कुडत जगत राहील! जो मुलगा तुला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतो. तो खरंच तुझ्या शिवाय सुखी होईल का? तू रोज हॉस्पिटलमध्ये येतेस त्याला काचेतून पाहून समाधानी होतेस पण त्याच काय ग सावी? तो काही बोलत नाही पण त्याचे डोळे तुला रोज शोधत असतात ते एक बाप म्हणून मला जाणवत! तू असं त्याच्यापासून लांब जाऊन तुला नाही तर त्याला ही शिक्षा देत आहेस! हे तुझ्या लक्षात येत नाही का ग?” ते म्हणाले.

सावी,“ बाबा मी ही नाही जगू शकणार  त्याच्या शिवाय पण गेल्या वर्षभरात मी ज्या चुका केल्या आहेत त्या अक्षम्य आहेत. मी त्याच्या नजरेला नजर सुद्धा भिडवू शकत नाही. मी त्याच्या आयुष्यातून गेललंच बरं! खरं तर मी त्याच्या लायकीची नाही. तो खूप चांगला आहे पण मी नाही! I don't deserve him!”ती रडत म्हणाली.

बाबा,“ तू त्याच्या लायकीची आहेस की नाही हे पण तूच ठरवणार? तू कायम इथेच चुकत आलीस सावी! तू कायमच तुझ्या बाजूने विचार करतेस त्याच्या बाजूने ही विचार कर की जरा! त्याने एक वर्ष तुझं सगळं सहन केलं तुझं सगळं ऐकून घेतलं!त्याला सहन नाही झालं तेंव्हा तो स्वतःला संपवायला निघाला! का? याचा विचार त्याच्या बाजूने केलास का कधी? एव्हढे होऊन ही तुला वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली? शुद्धीवर आल्यावर त्याने पहिल्यांदा आदित्यला तुझ्याबद्दल विचारलं मला सांगशील; का? तुला पाहून आमच्या कोणाचेच लक्ष तुझ्या जखमेवर गेले नाही एवढंच काय पण तुझ्या तरी लक्षात आलते का? पण तुला पाहून तुझी जखम त्याच्या डोळ्यांना दिसली मला सांगशील; का? कारण त्याचे तुझ्यावर प्रेम आहे सावी अगदी तू त्याच्याशी कशी ही वागली तरी! माझा मुलगा आहे तो मी चांगलं ओळखतो त्याला!हा तो सध्या तुझ्यावर नाराज आहे तुझ्यावर रुसला आहे पण त्याचा इतका ही हक्क नाही का तुझ्यावर?” त्यांनी विचारले.

सावी,“  त्याचा माझ्या वरच्या हक्काच म्हणाल तर माझ्या प्रत्येक श्वासावर त्याचाच हक्क आहे पण माझा त्याच्यावर कोणताच हक्क नाही. माझ्या मधील अपराधीपणाची भावना मला त्याच्या समोर सुद्धा उभ राहू देत नाही. मी काय करू तुम्हींच सांगा?” ती रडत म्हणाली.

बाबा,“माझं ऐकशील का?” ते म्हणाले.

सावी,“ विचारायचं काय त्यात?” ती म्हणाली.

बाबा,“ तुमच्या नात्याला आणखीन एक संधी दे! माझ्या मुलासाठी!” ते म्हणाले.

सावी,“ म्हणजे?” तिने विचारले.

बाबा,“ म्हणजे सहा महिने सोहम बरोबर राहा! मला माहित आहे त्याचा तुझ्यावर राग आहे ! हा पण त्याचा राग मात्र तुला सहन करावा लागेल. तो प्रेम टोकाच करतो तर त्याचा राग ही तितक्याच टोकाचा असतो. हे तुला मी सांगण्याची गरज नाही. हा पण पुढे तुमच्या नात्याचे भवितव्य हे सहा महिने व सोहम  ठरवेल! मी त्याच्या निर्णयात ढवळाढवळ करणार नाही. पण सहा महिने तुझ्या हातात असतील त्याच मन वळवायला! बघ विचार कर!” ते म्हणाले.

सावी,“ पण तो तयार होईल आणि आई, आदित्य त्यांच काय?” तिने विचारले.

बाबा,“ सोहमच्या आईशी बोललो आहे मी आणि आदित्यला मी समजावेन आणि बब्बू (सोहम) काही झालं तरी माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही! तू तुझं काय ते विचार करून सांग!” असं म्हणून ते उठले.

       तर सावी काही विचार करून त्यांना म्हणाली.

सावी,“ ठीक आहे बाबा मी तयार आहे!”

बाबा,“ बरं मग हॉटेलवर माघारी जा आणि आज पासून रोज बब्बूला भेटायचं! त्याची तब्बेत अजून ही ठीक नाही अजून आठ-दहा दिवसाने मी हा विषय काढेन त्याच्या समोर! तू फक्त मान हलवायची! जा आता भेट त्याला!” ते म्हणाली.

         हे ऐकून सावी सोहमच्या बाबांच्या पाया पडली आणि पुन्हा हॉस्पिटलकडे निघाली.

सोहम सावी बरोबर सहा महिने राहायला तयार होईल? सावी सोहमच्या रागाचा सामना संयमाने करून हरलेली नात्याची बाजी पुन्हा जिंकू शकेल का?

क्रमशः

          


 

 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

©Swamini (asmita) chougule





 


 

    

🎭 Series Post

View all