हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग ३)

This is a love story of before marriage and after marriage

    हॉस्पिटलमध्ये ऍम्ब्युलन्स आलेली पाहून तेथील वार्ड बॉयने लगबगीने स्ट्रेचर आणले. सोहमला दोन-तीन जणांनी मिळून स्ट्रेचरवर झोपवले.हॉस्पिटलमध्ये येऊ पर्यंत सोहमचे कपडे आणि सावीचे कपडे ही रक्ताने माखले होते.बराच रक्त स्त्राव झाला होता आणि अजून ही होत होता.सावी स्ट्रेचर बरोबर हॉस्पिटलमध्ये पोहचली तो पर्यंत डॉक्टर्स आले होते त्यांनी तिथेच सोहमची प्राथमिक तपासणी केली आणि त्याला ओ.टी. मध्ये नेण्यात येत होते.पण ओ.टीच्या दारात गेले तरी सोहमच्या हात सावीच्या हातात होता.सोहमने त्याच्या रक्ताने भरलेल्या हाताने सावीचा हात घट्ट धरून ठेवला होता आणि काही केल्या तो हात सावीला सोडवता येईना. शेवटी डॉक्टरांनीच जोर लावून त्याचा हात सोडवून घेतला आणि ओ.टीचे दार बंद झाले.सावी सुन्न होऊन फक्त ओ.टीच्या गोल काचेतून सोहमला पाहत होती.सोहम बेशुध्द होता.

          ती मनातल्या मनात स्वतःला दोष देत होती की ती का सोहमच्या असे मागे पळत होती.त्याची आपल्याला बोलायची इच्छा नव्हती तर आपण जरा त्याच्या कलाने घ्यायला हवे होते.नंतर त्याच्या घरी जाऊन आपण बोलू शकलो असतो पण नाही तुला तर सतत स्वतःचेच खरे करायचे असते सावी! आता त्याला काही झालं तर? नाही नाही मी त्याला नाही गमावू शकत! मी नाही जगू शकणार त्याच्या शिवाय! सहा महिने त्याचा दुरावा मला सहन नाही झाला! नाही त्याला नाही काही होणार!तो मला इतकी मोठी शिक्षा नाही देऊ शकत!पण त्याला काय गरज होती मला ढकलून माझ्यावरच संकट  स्वतःवर ओढून घ्यायचे?का केलंस सोहम तू असं? तू कायमच हेच करत असतोस! आज तू मला माझ्याच नजरेतून अजून उतरवलेस आणि तू माझ्या मनात आणखीन वरच्या स्थावर जाऊन बसलास! 

 

       हा सगळा विचार करत सावी अश्रू ढाळत होती. ओ.टीमध्ये मात्र डॉक्टर आणि नर्सेसची धावपळ सुरू होती.एक नर्स तिच्या जवळ आली आणि तिच्या बोलण्याने सावी भानावर आली.


नर्स,“मॅम आप पेशन्ट की कौन हैं?” 


सावी,“ मैं उनकी वाईफ हूँ!” सावी डोळे पुसत म्हणाली.


नर्स,“ ये फार्म भर दीजिए और भी कुछ फॉर्मेलिटीज हैं वो वहाँ रिसेप्शन पे जाकर पूरी कर दीजिए प्लीज!” ती म्हणाली.

         हे ऐकून सावी रिसेप्शनकडे निघाली तर सकाळचा क्लार्क तिला थांबवत म्हणाला.


क्लार्क,“भाभीजी आप रहने दीजिए मैं ये सब कर दूँगा।आप बस यह फॉर्म भर कर मुझे दीजिए क्योंकि यह फॉर्म s. s सर के रिश्तेदार ही भर सकते हैं।” तो म्हणाला.


       सावीने फॉर्म वाचला आणि ती जास्तच घाबरली.तिचा घाबरलेला चेहरा पाहून नर्स जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.


नर्स,“ये तो बस फॉर्मेलिटी हैं मॅम! आपके पति को हम बचाने की  पूरी कोशिश करेंगे बस आप उनकी सलामती की दूवा कीजिए!” 


   नर्सच्या बोलण्याने तिला जरा धीर आला आणि सावीने फॉर्म भरून सही केली आणि क्लर्क तो फॉर्म घेऊन फॉर्मेलिटी पूर्ण करायला  निघून गेला.तिला त्या क्लर्कचे आभार मानायचे ही भान नव्हते.ती ओ.टी. मध्ये त्या छोट्या गोल काचेतून सतत डोकावत होती.तिला त्यातून तितकस काही दिसत नव्हतं पण अधून मधून नर्स बाजूला झाल्यावर ऑक्सिजन मास्क लावलेला सोहमचा चेहरा आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारे डॉक्टर आणि नर्स दिसत.तब्बल तीन तासांनी ओ.टीचे दार उघडले व डॉक्टर बाहेर आले.सावी त्यांच्या पाशी गेली आणि त्यांना काही विचारणार तो पर्यंत डॉक्टरच बोलू लागले.आत्ता पर्यंत सावी बरोबर आलेले सोहमचे कलीग ही डॉक्टर भोवती जमा झाले होते.


डॉक्टर,“मिसेस सोहम आप आपने रिश्तेदारों को जल्द से जल्द बुला लीजिए। आपके पति की हालत बहुत क्रिटिकल हैं।हम कुछ भी नहीं कह सकते। उनके सर पर बहुत गहरी चोट हैं हाला की हमने स्टिचेस लगा दिए हैं।लेकिन M. R. I., के रिपोर्ट के मुताबिक उनके ब्रेन के दाई तरफ सूजन हैं। हात में भी गहरी चोट हैं और पैर फैक्चत हैं। अगले अड़तालीस घंटे अगर वो सर्व्हाईव्ह कर पाए तो ठीक वर्ना…..”डॉक्टर बोलता बोलता थांबले.


सावी,“वर्ना क्या डॉक्टर आप कहना क्या चाहते हैं?”  ती जवळ जवळ ओरडलीच.


डॉक्टर,“प्लीज खुद को सँभाइये मिसेस सोहम! हम आपको झूठी  उम्मीद नहीं देना चाहते।अगर मिस्टर सोहम अगले अड़तालीस घण्टे सर्व्हाईव्ह नहीं कर पाए तो हम कुछ भी नहीं कर सकते! उनकी जान बचाने के लिए हमें जो करना था हम कर चुके हैं। अब इससे ज्यादा हम कुछ नहीं कर पाएंगे। आप बस दुवा किजीए  की आप के पति की अगले अड़तालीस घंटे जैसे-तैसे साँसे चलती रहे। हम उन्हें I.C. U. में शिफ्ट कर रहे हैं। आप उन्हें कुछ देर में देख सकती हैं। लेकिन प्लीज जल्द से जल्द आप आपके लोगो बुला लिजिए।” ते म्हणाले.


      हे सगळं डॉक्टर कडून ऐकून सावी मटकन खाली बसली. ती खूपच घाबरली होती पण तिने धीर केला आणि आदित्यला फोन केला.हे सगळं होऊ पर्यत संध्याकाळच्या सहा वाजले होते.अदित्यने फोन उचलला.


सावी,“ आदित्य!” ती कसं बस रडू आवारात म्हणाली.


आदित्य,“ तुला किती वेळा सांगायचे की सोहम कुठे…” तो फोनवरून बोलत  होता. तो पर्यंत सावीने त्याला थांबवले आणि ती म्हणाली.


सावी,“ आदित्य! सोहमचा ऍक्सिडंट झाला आहे! तू आई-बाबांना घेऊन लवकरात लवकर चंदीगडला ये!” ती रडत बोलत होती.


आदित्य,“काय? पण तू चंदीगडला कशी? सोहम कसा आहे सावी?” तो काळजीने आणि आश्चर्याने बोलत होता.


सावी,“ मी सांगेन तुला सगळं पण प्लिज लवकर ये तू सोहम….” ती पुन्हा रडू लागली.


आदित्य,“ ok मी येतोय काका काकूंना घेऊन!” तो म्हणाला.



          आदित्य ऑफिसमधून निघाला. तो डायरेक्ट विमानाने पुण्याला पोहचला आणि सोहमच्या आई-बाबांना घेऊन तो  विमानानेच चंदीगडला निघाला. इकडे सोहमला I. C. U. मध्ये शिफ्ट करण्यात आले. सावी सोहमच्या बेड जवळ  खुर्चीवर जाऊन बसली. I. C. U मधील जीव घेणी शांतता पण त्या शांततेचा अधून-मधून बीप-बीप करत भंग करणारी सोहमला लावलेली E.C.G. मशीन भयंकर वाटत होती.त्याच्या तोंडाला ऑक्सिजन मास्क, हाताला लावलेली ड्रीप, डोक्याला बँडेज,हाताला बँडेज आणि चेहऱ्याच्या एका बाजूला खरचटले होते. सोहम निपचीत पडून होता. सोहमची अशी अवस्था पाहून सावीला गलबलून येत होते. आणि या सोहमच्या अवस्थेला ती स्वतःलाच जबाबदार धरत होती.सकाळी लहान मुलांबरोबर मनसोक्त फुटबॉल खेळणारा सोहम पण आपण त्याला भेटताच तो आता एका-एका श्वासासाठी कृत्रिम  ऑक्सिजनवर अवलंबून आहे. तो जीवन आणि मरणाची लढाई लढतोय याला आपणच जबाबदार आहे असं म्हणून ती स्वतःला दोष देत होती.ती विचारातून बाहेर आली डोळे पुसले आणि तिने सोहमचा हात धरला व ती त्याला बोलू लागली.


सावी,“ मला माहित आहे तुला माझे बोलणे ऐकू जाणार आहे. सोहम मी सहा महिने तुझा शोध घेऊन हे असं तुला पाहायला नाही आले रे!मला माहित आहे मी तुला खूप त्रास दिला.त्या दिवशी तूच दिलेल्या माझ्या सक्सेस पार्टीत ही मी  खरं काय ते न जाणून घेता तुझा अपमान केला तुला नाही नाही ते बोलले पण मी तुला इथे त्रास द्यायला नव्हते आले रे! मी फक्त तुझी माफी मागायला आले होते. तू प्रत्येक वेळी असं का करतोस? माझ्यावर आलेलं संकट तू का घेतलंस स्वतःवर?आता मी आई-बाबा आणि अदित्यला काय सांगू? मला मान्य मी चुकले खूप चुकले! मी नाही दाखवणार माझं तोंड तुला! मी इथे तुझी माफी मागायला येऊन ही चुकच केली बघ! पण माझ्या चुकांची अशी जीवघेणी शिक्षा नको देऊस रे मला!हवं तर माझ्या थोबाडीत मार पण असा शांत  पडून राहून जीव नको टांगणीला लावूस सोहम! तुला लढावं लागेल या तुझ्या कंडिशनशी! माझ्यासाठी नाही तर आई-बाबा आणि अदित्यसाठी! मी नाही दाखवणार माझं तोंड तुला परत निघून जाईन मी तुझ्या आयुष्यातुन लांब कुठे तरी पण सोहम असली शिक्षा नको रे देऊ मला!” ती रडतच हे सर्व बोलत होती.


      सोहम मात्र निपचीत पडून होता.जणू तो तिला असं शांत राहून शिक्षाच देत होता. सावी बराच वेळ त्याच्या जवळ बसून राहिली.नर्स आल्यावर ती बाहेर गेली.सावी सतत सोहमला काचेतून पाहत होती. तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता.रात्रीचे दहा वाजत आले होते.एक-एक करून तिच्या बरोबर आलेले सोहमचे सहकारी घरी निघून गेले होते.सकाळचा क्लर्क ज्याचे नाव दिलजीत होते तो फक्त सावी बरोबर थांबला होता. हॉस्पिटलने पोलिसांना कळवले होते. ते उद्या विचारपूस करायला येणार होते. रात्री बाराच्या दरम्यान अदित्य आणि सोहमचे आई-बाबा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सोहमला तिघांनी काचेतून पाहिले. त्याची अवस्था पाहून तिघे ही हवालदिल झाले होते.अदित्यने सावीला  विचारले.


अदित्य,“ सोहमचा ऍक्सिडंट कसा झाला सावी? डॉक्टर काय म्हणत आहेत त्याच्या तब्बेती बद्दल? इतकं कसं लागलं त्याला?”तो जरा रागानेच सावीवर प्रश्नांचा भडिमार करत होता.


        सावीने तिच्या आणि सोहममध्ये  काय-काय घडले आणि तिला वाचवायला जाऊन सोहमचा ऍक्सिडंट कसा झाला.हे थोडक्यात सांगितले. सोहमच्या बाबांनी तिला विचारले.


बाबा,“डॉक्टर काय म्हणत आहेत सावी?”त्यांनी काळजीने विचारले.


सावी,“ अट्टेचाळीस तासांची मुदत दिली आहे.जर या काळात सोहम सर्व्हाईव्ह करू शकला तर ठीक नाही तर … he is critical!” असं म्हणून ती रडू लागली.


     हे ऐकून सोहमचे आई-बाबा सुन्न होते.अदित्यने सावीला विचारले.


अदित्य,“सर्व्हाईव्ह करू शकला नाही तर म्हणजे काय सावी?” तो चिडून म्हणाला.


सावी,“ त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे! पण नाही होणार त्याला काही अदित्य….” ती रडत म्हणाली.


         तेव्हढ्यात त्याला तपासायला गेलेली नर्स बाहेर आली आणि डॉक्टरला घेऊन आली.सोहमच्या भोवती त्यांची एकच धावपळ उडाली होती आणि हे चौघे बाहेरून फक्त भेदरलेल्या नजरेने पाहत होते. डॉक्टर बाहेर आले. चौघे ही धावतच त्यांच्या पाशी गेले.अदित्यने विचारले.


अदित्य,“डॉक्टर सोहम अब कैसा हैं?” त्याने विचारले.


डॉक्टर,“ मिस्टर सोहम की हालत खराब होती जा रही हैं। उनके हार्ट बिट्स  लगादार कम हो रहे हैं।हम अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं।लेकिन ऐसे लगता हैं कि वो अपनी इस हालत से लड़ना ही नहीं चाहते! आप बस प्रार्थना कीजिए कि अगले चालीस घंटे ओ निकाल ले अब तक आठ घंटे गुजर चुके हैं। we are trying our best!” असं म्हणून डॉक्टर निघून गेले.


    सोहमचे आई-बाबा मात्र हे ऐकून सुन्न होते.अदित्यने मात्र त्याचा मोर्चा आता सावीकडे वळवला. तो रागाने सावीला बोलू लागला.


अदित्य,“ झालं का ग सावी तुझं समाधान सोहमला मृत्यूच्या दारात ढकलून? तुला गेल्या सहा महिन्यांपासून मी एकच गोष्ट  सांगतोय! सोहम पासून दूर राहा तू तुझं आयुष्य जग की! पण नाही तुला त्याच्यावर कोणत्या जन्मीचा सूड उगवायचा आहे काय माहीत? तू पोहचलीसच त्याच्या पर्यंत अजून समाधान झालं नसेल ना तर एक काम कर त्याच नरडं दाब एकदाच म्हणजे सोहमचा पण त्रास त्याच्या जीवाची तगमग आणि त्याचा त्रास पाहून आमच्या जीवाची होणारी तगमग पण वाचेल आणि तुला एकदाच समाधान मिळेल!” तो तिला रागाने बोलत होता पण त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे ऐकून आधीच खचलेली सावी अजूनच हुंदके देऊन रडू लागली.

          अदित्यच्या तोंडून हे ऐकून सोहमचे बाबा त्याला रागाने म्हणाले.


बाबा,“mind your languageअदित्य! सावी आमची सून आहे!”


अदित्य,“ हो माहीत आहे काका मला!सॉरी मी माझी मर्यादा ओलांडली पण हि तुमच्या मुला बरोबर कशी वागली हे….” त्याला मध्येच थांबवत बाबा म्हणाले.


बाबा,“ हो माहीत आहे सगळं आम्हाला सावीनेच सांगितले आम्हांला सगळं! त्या रात्री काय-काय झालं आणि तिने तिची चूक दहा वेळा कबुल देखील केली आहे.खरं तर सावी चुकली तिने सोहमने दिलेल्या तिच्याच सक्सेस पार्टीत तमाशा न करता त्याला एकांतात विचारायला हवं होतं सगळं पण सोहमची ही चूक आहेच की त्याने सावीला आधीच सगळं सांगितले असते तर सावीचा गैरसमज झाला नसता!”ते म्हणाले.


अदित्य,“  अरे वा सावी! तू तर सगळं सांगितलं आहेस की यांना पण ही तर फक्त नाण्याची एक बाजू आहे.अर्ध  सत्य जे तुमच्या तिघा पैकी कोणालाच माहीत नाही. जे फक्त मला माहित आहे आणि मी सोम्याला प्रॉमिस केलं होत की मी हे कोणालाच नाही सांगणार पण तो स्वतः ची काळजी घेईल या प्रॉमिसच्या बदल्यात! साल्याने त्याच प्रॉमिस कुठं पाळले! सावी सोम्याला काय-काय बोलली हे पण सांगितलंच असेल की तिने काका तुम्हाला पण सोम्यावर त्याचा काय परिणाम झाला याचा कोणी विचार केला का?”तो सावीकडे पाहत म्हणाला.


सावी,“म्हणजे?” तिने आश्चर्याने विचारले.


अदित्य,“ तू त्याचा सगळ्या समोर अपमान केला त्याला बोललीस पण तू जे विखारी शब्द वापरलेस याचा तू तरी शांतपणे विचार केलास का ग? काय म्हणालीस तू सोहमला की तुला त्याच्या अस्तित्वाची शिसारी वाटते! इतकं विखारी बोलण्यासारख असं काय घोड मारलं होत ग त्याने तुझं? आणि काय गुन्हा केला होता त्याने तुझा? तुझ्यावर प्रेम केलं हाच गुन्हा होता वाटत त्याचा! या तू वापरलेल्या शब्दाने त्याला घायाळ केले सावी! त्याच्या मनावर या तुझ्या शब्दांनी इतका खोलवर आघात केला की तो आत्महत्या करायला निघाला होता.आपण त्याला केंव्हाच गमावलं असत!” तो म्हणाला.


     हे ऐकून सोहमचे आई-बाबा आणि सावीला धक्काच बसला.


बाबा,“ काय बोलतोयस आदी तू?”  त्यांनी गंभीरपणे विचारले.


अदित्य,“हो! रात्री तमाशा करू  सावी तर निघून गेली सकाळी ऑफिसला! मी नेमका पुण्याला गेलो होतो त्या दिवशी पण मला सोहमच्या आणि माझ्या कॉमन मित्राने पार्टीत काय काय झाले ते सांगितले! म्हणून मी तो ऑफिसला निघायच्या आताच त्याला गाठावे आणि काय झाले ते विचारावे म्हणून सोहमकच्या घरी पोहचलो पण मी अजून गाडी पार्क करत होतो तो पर्यंत सोहम मला दोन मोठाल्या बॅगा घेऊन निघालेला दिसला.मला पाहून तो जरा चपापलाच होता.मी त्याला गाडीतून उतरून विचारले.


मी-“ सोम्या कुठे निघालास इतक्या मोठ्या बॅगा घेऊन?”


सोहम-“ अरे जरा काम आहे बिजनेस टूरला निघालो आहे!” त्याने नजर चोरून उत्तर दिले


मी-“ अच्छा पण दोन बॅगा कशाला लागतात रे बिजनेस  टूरला?” संशयाने मी विचारले.


सोहम-“ एक माझी आहे एकात जरा टाकाऊ समान आहे.ते टाकायचे आहे” 


मी-“खोटं बोलू नको सोम्या!तुझं काही तरी वेगळच चाललं आहे! तू टाकाऊ समान टाकणार? दाखव बॅगांमध्ये काय आहे?” मी बॅगा हिसकावून घेत विचारले.


सोहम-“ तुझं काय असत रे प्रत्येक गोष्टीत मध्ये-मध्ये मित्र आहेस ना मग मित्रच राहा! प्रत्येक गोष्टीत नाक नको खुपसू!” तो चिडून म्हणाला.


मी-“ आता तर मला पाहायचंच आहे” असं म्हणून मी बॅगा गाडीत ठेवल्या.

          पण सोहम तिथून निघून जाऊ लागला.मी त्याला अडवले त्या झटापटीत त्याच्या खिशात मला कसली तरी डबी लागली.म्हणून मी जबरदस्तीने ती त्याच्या खिशातून काढून घेतली. पाहिले तर काय स्लीपिंग पिल्सची डबी होती ती! सगळा प्रकार माझ्या लक्षात आला मी त्याला एक मुसकडात दिली आणि  हाताला धरून जबरदस्तीने गाडीत बसवले.त्याला माझ्या घरी घेऊन गेलो. सोहम शांत बसला होता. मी बॅगा खोलून पाहिल्या तर त्यात सगळे त्याचे समान आणि फोटो! मीच पुन्हा विचारले


मी-“ सोम्या काय आहे हे सगळं,? या स्लीपिंग पिल्स! हे तुझे सगळे समान! हे सगळे फोटो! काय करायचं काय आहे तुला नेमकं?”


सोहम-“तिला माझ्या अस्तित्वाची शिसारी येते!  मग मी काय करणार दुसरं!” तो थंडपणे म्हणाला.


मी-“ कुणाला? आणि काय करणार आहेस तू?”


सोहम-“ सावीला माझ्या अस्तित्वाची घृणा वाटते आद्या! या सगळ्या माझ्याच तर अस्तित्वाच्या खुणा आहेत ना म्हणून या  समुद्रात फेकून द्यावं म्हणलं” तो पुन्हा थंडपणे म्हणाला.


मी-“असं! आणि या पिल्स कशासाठी?”


सोहम-“ स्वतःच अस्तित्व मिटवण्यासाठी!” तो पुन्हा थंड पणे म्हणाला. 


मी-“काय बोलतोस सोहम तुझं तुला तरी कळतंय का भानावर ये जरा!” मी त्याला हलवून म्हणालो.


सोहम-“हो कळतंय मला! मी ज्या सावीवर प्रेम केलं जिच्याशी मी लग्न केलं तिचा विश्वास नाही जिंकू शकलो मी! तिला माझ अस्तित्व नको आहे  मग माझ्या जगण्याला काय अर्थ आहे का? त्या पेक्षा मी माझं अस्तित्व संपवलेलं बरं!” इतकावेळ शांतपणे बोलणारा सोहम आता रडू लागला.


मी-“ काय मूर्खपणा आहे सोहम! अरे सावीला तू ओळखत नाहीस का ती बोलली असेल रागात! तू का इतकं मानला लावून घेत आहेस!”


सोहम-“ मी हरलो आद्या! लग्नाला एक वर्ष झालं तरी मी नाही सावीचा विश्वास जिंकू शकलो रे! मला आता नाही वाटत की मी…..” तो बोलता बोलता थांबला


मी-“ काय तू? तू काका काकुंचा विचार केलास का? त्यांनी काय करायचं रे तुला काही झालं तर? त्याच्या उतार वयात त्यांना तू असलं दुःख देणार का?काय दोष आहे रे त्यांचा सांग ना? आत्महत्या करण म्हणजे पळपुटेपणा आहे. घबराट लोक हा मार्ग निवडतात आणि मी ज्या सोहमला ओळखतो तो घाबरट आणि पळपुटा नाही!You are not coward!”


सोहम-“मेला तो सोहम! ज्याला तू ओळखत होतास” तो चिडून म्हणाला.


मी-“ सोम्या वेडेपणा करू नकोस! कोणाचा नाही तर काका -काकूचा तर विचार कर त्याचा तू  एकुलता एक मुलगा आहेस त्यांना तुझ्या शिवाय कोणीच नाही! हे बघ आपण यातून मार्ग काढू  मी बोलतो सावीशी!”


सोहम,“ मला तिच्याशी काही बोलायचे नाही. मला नाही वाटत आमच्यात आता काही राहील आहे! मला इथून कुठ तरी पळून जावसं वाटतंय!”तो खिन्नपणे म्हणाला.


मी-“ मग त्यासाठी जीव द्यायची काय गरज आहे.तू चंदीगडला जाणार का?तिथे एका संस्थेत नेटवर्किंग मॅनेजरची गरज आहे.माझ्या ओळखीचे लोक आहेत तिथे. तुला हवं तेव्हढे दिवस तिथं काम कर पण त्या आधी माझ्या बरोबर चल!”


        सोहमने नुसती होकारार्थी मान हलवली. मी त्याला माझ्या ओळखीच्या सायकॉलॉजिस्टकडे घेऊन गेलो. मला भीती होती की तो डिप्रेशनमध्ये गेला आहे पण सुदैवाने तसं काही नव्हते. त्याच्या मनावर झालेल्या अनपेक्षित आघातामुळे तो एका मानसिक फेज मधून जात होता.त्याचे समोदेशन सायकॉलॉजिस्टने केले त्यामुळे तो जरा सावरला आणि मग वकिलाकडून डिव्हॉर्स पेपर तसेच नोकरीचा राजीनामा दिला आणि बँकेमधून  सावीच्या खात्यात पैसे जमा करण्याची सोय ही केली. सोहमने डिव्हिर्स पेपर बरोबर सावीसाठी चिठ्ठी लिहली व यांच्या घरात ठेवली.मी सोहमला घेऊन चंदीगडला गेलो आणि एक महिना त्याच्या बरोबर राहिलो. इथे ही त्याचे समोपदेशन करून घेतले इथल्या सायकॉलॉजिस्टकडून! तो निघाला थोडाफार त्या फेजमधून! 

            सावी शरीरावर केलेले घाव बरे होतात पण  आपल्याच माणसांनी मनावर केलेले आघात आणि जखमा  भरून येत नाहीत ग! तू केलेल्या आघातातून तो सावरू शकला की नाही हे तर त्यालाच माहीत! तरी मेहरबानी त्याने आत्महत्येचा विचार सोडून दिला! नाही तर आपण त्याला केंव्हाच गमावून बसलो असतो. पण सावी मी ज्या मार्गावरून सोहमला माघारी आणले होते ना आज पुन्हा तू त्याला त्याच मार्गावर नेऊन सोडले आहे आता तो माघारी येईल की नाही. काही सांगता येत नाही!” तो असं म्हणून रडू लागला.


         हे सगळं अदित्यकडून ऐकून सावी मात्र कोसळली आणि जमिनीवर बसून रडू लागली. सोहमच्या वडिलांनी आईला इशारा केला आणि त्या सावी जवळ गेल्या आणि तिला सावरून तिला त्यांनी खुर्चीवर बसवले. सावी मात्र फक्त रडत होती.

  

सावी आणि सोहममध्ये असं काय झालं होतं?  सावीने त्याला इतकं का दुखावलं होत की तो आत्महत्या करायला निघाला होता? सोहम आता वाचू शकेल का की सावी त्याला तिच्या चुकांमुळे कायमच गमावून बसणार होती?  

क्रमशः




 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.


©Swamini (asmita) chougule









 

 


🎭 Series Post

View all